दुर्गा म्हणजे दुर्ग, कठीण, जिला प्राप्त करणे सोपे नाही, आदिमाया शक्ती, चंडिका. अशा या दुर्गा देवीला हिंदू धर्मात प्रमुख स्थान असून तिला परमेश्वरी, जगदंबा,मातारानी,पार्वती,नवदुर्गा,भगवती अशा इत्यादी नावाने ओळखले जाते. अशा या दुर्गा मातेच्या आरतीमध्ये ( Durga Devichi Aarti ) देवीचे वर्णन आणि तिच्या अपारशक्तीचे महत्त्व सांगितलेले असून काहींच्या मते संत नरहरी सोनार यांनी देवीची आरती लिहिली आहे.
तर काहींच्या मते श्री समर्थ रामदास स्वामी यांनी ही आरती लिहिली आहे. आरती मध्ये तसा नरहरी शब्दाचा उल्लेख आहे परंतु आरती कोणीही लिहो आरतीचे फार सुंदर महात्मे असून तिचे मर्म समजून घेण्यासारखे आहे
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्म मरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥
जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी ।
सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी ॥ धृ ॥
त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी…
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा॥ जय देवी… —
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्म मरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥
अर्थ –
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्म मरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥
वरील काव्यातून दुर्गा मातेला प्रार्थना केली जाते की,हे दुर्गा माते तुझ्याशिवाय हे संसारी जीवन जगणे मुश्कील आहे. दुर्घट म्हणजे फार कठीण असणे. पुढे आंबा मातेला ( Amba Mata) अनाथनाथे म्हणजे दीनदुबळ्यांचे कैवारी समजून तुझी करुणा म्हणजे कृपा आणखीन विस्तारित कर आणि सगळ्यांचे संरक्षण कर अशी प्रार्थना केली जाते.वारी वारी जन्ममरणाते वारी म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मला सोडव, मला मुक्त कर. हारी पडलो म्हणजे मी आता थकलो, या संसारीक जीवनामध्ये मी आता थकून गेलो आहे. माझ्या संकट समयी तू नेहमी मदत कर, माझ्या संकटाचे तू निवारण कर.
जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी ।
सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी ॥ धृ ॥
अर्थ – देवी दुर्गा माते तुझा जय जयकार असो. हेमहिषासुरमर्दिनि म्हणजे पूर्वीच्या काळातील महिषासुर नावाचा भयंकर त्रास देणारा राक्षस ज्याचा वध आंबेने केला म्हणून तिचे गुणगान गाताना महिषासुरमर्दिनी म्हणजे त्याचा वध करणारी, त्याचा नायनाट करणारी किंवा त्याला हरवणारी असा केला जातो. एवढेच नव्हे तर देवीचे गुणगान करताना तिला सुरवर ईश्वर वर्दे म्हणजे सुरवरांना म्हणजे देवांना आणि साक्षात ईश्वराला सुद्धा शक्ती किंवा वर देणारी म्हटले आहे.
त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी…
अर्थ- वरील काव्यरचनेत असे सांगितले जाते की तिन्ही लोकांमध्ये म्हणजे पृथ्वी,अंतरिक्ष आणि आकाश अशा तिन्ही लोकांमध्ये तुझ्यासारखे कोणीही पाहण्यात आले नाही. तसेच चारही वेदांमध्ये तुझ्याबद्दल कोणी काहीही सांगितले नाही. तुझ्या बाबतीत या चारही वेदांचे प्रयत्न असफल झाले. तुला समजून घेताना सहा तत्त्वज्ञानांचे अनुयायी प्रभावी पडिले म्हणजे गोंधळात पडले. त्यांना तू समजली नाहीस. मात्र तू साध्या भोळ्या निष्ठावान भक्ताना लगेच पावते. त्यांची तू दया करते, संरक्षण करते. म्हणून परत हे सुरवर ईश्वर वर्दे, हे महिषासुर मर्दिनी तुझा जयकार असो.
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा॥ जय देवी…
अर्थ – प्रसन्न वदनी म्हणजे जिचे मुख प्रसन्न आहे, वंदन आहे. अशा या दुर्गा मातेला विनंती आहे की तुझ्या निजदासा म्हणजे एकनिष्ठ भक्तांना तू प्रसन्न हो. त्यांना तू क्लेशांपासून म्हणजे अडीअडचणी पासून संकटापासून सोडव . तोडी भवपाशा म्हणजे त्यांना संसार बंधनातून बाजूला कर आणि तू जर आमच्या अशा इच्छा पूर्ण करणार नाहीस तर कोण करील. नरहरी म्हणजे आरती म्हणणारा किंवा आरती लिहिणारा हा नरहरी तुझे गुणगान गाताना आणि तुझे महात्मे वर्णवताना तल्लीन झाला आहे.
म्हणजे मग्न झाला आहे. पदपंकजलेशा म्हणजे पद म्हणजे चरण आणि पंकज म्हणजे कमल. लेश म्हणजे अनु रेणू प्रमाणे चरण कमलांचे धुलीकन. अशा या चरण कमलांच्या धुलीकनात हा नरहरी तल्लीन झाला आहे. पुन्हा हे दुर्गा माते तुझा जय जयकार असो.