भगवान महावीर | Bhagwan Mahavir

जैन धर्माचे 24 वे तीर्थकार भगवान महावीर ( Bhagwan Mahavir ) यांचा जन्म जैन धर्माचे 23 वे तीर्थकर पार्श्वनाथ यांच्या निर्वाणानंतर 188 वर्षांनी झाला होता. वैशाली राज्यात क्षत्रिय कुंडलपूर गावात वडील राजे सिद्धार्थ आणि आई त्रिशाला राणी यांच्या पोटी एका सुंदर गोंडस बाळाचा जन्म झाला होता.

या तेजस्वी बालकाचे नाव वर्धमान ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील ज्ञात्रिक कुळातील महान राजे होते. वर्धमान फार तेजस्वी आणि चतुर दिसत होते. पुढे त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरुकुल मध्ये शिक्षण घेण्यास पाठवण्यात आले. गुरुकुल मध्ये त्यांना त्यांच्या शिक्षकांनी काही शब्द पाठ करण्यास सांगितले. वर्धमान गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्वकाही चुपचाप करत असे. एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना रिकामे बसलेले पाहिले आणि म्हणाले की असा वेळ बरबाद करण्यापेक्षा मी दिलेले शब्द तू आठवत राहा.

मग वर्धमान ने सर्व शब्द पाठ करून टाकले. त्यानंतर मात्र त्याच्या शिक्षकांना त्याचे कौतुक वाटू लागले. त्याचवेळी एक म्हातारा ब्राह्मण गुरुकुल मध्ये प्रवेश करत होता.गुरुकुल मध्ये ते आल्यानंतर त्या ब्राह्मणाने शिक्षकांना व्याकरणातील काही अवघड प्रश्न विचारले. त्या ब्राह्मणाच्या प्रश्नांची उत्तरे ते शिक्षक देऊ शकले नाहीत. मग ब्राह्मण हसून त्या शिक्षकांना म्हणाले की, आचार्य कृपया आपण स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका. कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे आलेला हा नवीन बालक देऊ शकतो.

आपल्या परवानगीने मी या बालकाला प्रश्न विचारू शकतो का? शिक्षकाच्या परवानगी नंतर त्या म्हाताऱ्या ब्राह्मणांनी वर्धमान बालकाला असेच काही अवघड प्रश्न विचारले.वर्धमान याने त्या ब्राह्मणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे न डगमगता अगदी बरोबर दिली. हे पाहून ते शिक्षक चकित झाले होते. ब्राह्मण हसले आणि त्यांना म्हणाले यातून तुम्ही कृपया अपमानित होऊ नका. या बालकाचे रहस्य काही वेगळेच आहे.

एवढेच नव्हे तर त्या ब्राह्मणांनी हा वर्धमान ( Vardhman ) बालक भविष्यातील तीर्थंकर आहे असे सांगितले आणि सांगितले की तीर्थकर जन्मापासून अवधी ज्ञान घेऊन येतात. त्यानंतर शिक्षक वर्धमानला त्यांच्या वडिलांकडे घेऊन गेले. आणि राजा सिद्धार्थला ही सर्व घटना सांगून म्हणाले की वर्धमान जन्मताच शिक्षित आहेत. त्यांना गुरुकुलच्या शिक्षणाची गरज नाही. पुढे वर्धमान जसजसे मोठे होऊ लागले तस तसे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होत गेली. एक दिवस वर्धमान बागेमध्ये बसून मनशांतीचा आनंद घेत होते व झाडांना न्याहाळत होते. तेवढ्यात तिथे त्यांचा भाऊ नंदिवर्धन तेथे आले.

वर्धमाने नंदीवर्धन यांना विचारले की काय तुम्ही सांगू शकता का झाडाच्या काही फांद्या फार मोठ्या आणि काही फांद्या फार छोट्या दिसतात. तसेच काही खालच्या दिशेने झुकलेल्या आहेत तर काही वरच्या दिशेने वाढत आहेत. असे का बरे होत असेल.त्या सर्वांचे पोषण तर एकाच झाडाच्या खोडातून होत आहे. नंदीवर्धन गोवर्धन ला म्हणाले की मी यावर कधी विचार सुद्धा केला नाही.

मग वर्धमान ने त्याला सांगितले की, जी फांदी खोडातून भारी स्वरूपात बाहेर निघते ती फांदी खालच्या दिशेने येते आणि जी फांदी कमकुवत स्वरूपात खोडातून बाहेर निघते ती वरच्या दिशेने जाते.याप्रमाणेच जे लोक जास्त मोह ठेवतात ते कर्माने जड होतात आणि खाली येतात तसेच मोहात कमी पडणारे लोक कर्माने हलके राहतात व वरच्या दिशेने जातात. अशा प्रकारे गोवर्धन यांनी नंदीवर्धन यांना “अपरिग्रह” सिद्धांत समजावला. पुढे वयाच्या 28 व्या वर्षी गोवर्धन यांच्या माता-पित्यांचा देहांत झाला.

आई वडिलांच्या मृत्यूनंतर वर्धमान यांची वैराग्य स्वीकारण्याची इच्छा जागृत झाली. परंतु मोठे बंधू नंदीवर्धन यांच्या विनंतीवरून ते दोन वर्ष घरी राहिले. त्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी “श्रामणी” दीक्षा घेतली. त्यामुळे ते “समण “ झाले. त्यानंतर लोक त्यांना “महावीर स्वामी”असे म्हणू लागले.एकदा दीक्षा घेतल्यानंतर महावीर स्वामी मोरक गावापासून . चालले होते. तेथे जवळच एक आश्रम होता.

त्या आश्रमाचे मालक राजा सिद्धार्थ यांचा मित्र होता. त्यांनी महावीर स्वामींना एक चातुर्मास आश्रमात राहण्याची विनंती केली. तसेच महावीर स्वामींनी त्यांची विनंती मान्य केली. आश्रमामध्ये मुक्कामी असताना महावीर स्वामी आजूबाजूंच्या घटनांकडे लक्ष न देता जास्तीत जास्त वेळ ध्यान करत असायचे. ज्या झोपडी मध्ये महावीर स्वामी राहायचे त्या झोपडीला लावलेले गवत गाय आणि इतर जनावरे येऊन खात असायचे. तरीही महावीर स्वामी त्यांना हाकलवत नव्हते.

त्यामुळे एक दिवस आश्रम मधील काही संन्याशांनी ही बातमी आश्रमाच्या मालकाला कळवली. मग आश्रमाच्या मालकाने एक दिवस महावीर स्वामी यांच्याशी बोलताना म्हटले की, पक्षी सुद्धा आपल्या घरट्याची सुरक्षा करतात. परंतु तुम्ही राजकुमार असून सुद्धा आपल्या झोपडीची सुरक्षा करू शकत नाहीत. कृपया मी आशा करतो की,यानंतर तुम्ही तुमच्या झोपडीची आणि आश्रमाची देखभाल करताना दिसाल. मात्र या घटनेनंतर महावीर स्वामी यांनी आश्रम सोडून दिला. तसेच कोणत्याही एकत्र राहण्याच्या ठिकाणी न राहण्याचा निर्धार केला. तसेच त्यांनी एकूण पाच गोष्टींची प्रतिज्ञा केली होती.

त्यांच्या शरीरावर परिग्रहच्या नावाखाली साधी लंगोटी सुद्धा राहिली नव्हती. जास्तीत जास्त वेळ ते दररोज ध्यान करत असत. हातावरच जेवण घेऊन भोजन करायचे. गृहस्थ लोकांना ते काहीही मागत नव्हते. हळूहळू त्यांनी पूर्ण आत्मसाधना प्राप्त केली. एक दिवस संध्याकाळच्या वेळी महावीर स्वामी एका झाडाखाली निश्चल स्वरूपात ध्यान करत बसले होते. तेव्हा तेथून एक गवळी आपल्या गाईंना घेऊन येत होता. आणि त्यांना पाहून म्हणाला हे मुनी मी गावात दूध विकायला चाललो आहे.

कृपया मी परत येईपर्यंत माझ्या गाईंची देखभाल करा.त्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. एवढे बोलून महावीर स्वामींचे उत्तर न ऐकता तो तिथून निघून गेला. काही वेळाने तो तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिले की महावीर स्वामी जसे बसले होते तसेच बसलेले आहेत. मग त्यांने स्वामीला विचारले की मुनी माझ्या गाई कुठे आहेत. त्यांनी काहीच उत्तर न दिल्यामुळे गवळी तेथून निघून गेला आणि जंगलामध्ये रात्रभर आपल्या गाई शोधत होता. परंतु तो तिथून निघून गेल्यानंतर सर्व गाई चरून येऊन स्वामी महावीर यांच्याजवळ बसल्या होत्या. सकाळी गवळी स्वामी जवळ येताच त्यांना सर्व गायी तिथे दिसतात.

मग त्याच्या मनात येते की मला तंग करण्यासाठी या मुनीने माझ्या गाई लपवून ठेवल्या असाव्यात.म्हणून स्वामींना मारण्यासाठी त्याने कमरेची रस्सी काढली आणि हात उचलणार तोवरच एक ऋषीमुनी प्रगट झाले आणि त्यांनी त्या गवळ्याला स्वामी विषयी सांगितले कि, हे भावी तीर्थकर आहेत. त्यानंतर गवळ्याने माफी मागून स्वामींच्या चरणी लीन झाला. महावीर स्वामी यांनी सलग बारा वर्षे कठीण तपचर्या केली होती. बारा वर्षांच्या कठीण तपश्चर्या नंतर त्यांना जम्मक मधील ऋजपाठीका नदीच्या काठी असलेल्या एका साल वृक्षाखाली केवल आत्मज्ञान प्राप्ती झाली.

म्हणून त्यानंतर त्यांना “केवलीन” असे म्हटले जाऊ लागले. त्यानंतर त्यांची प्रसिद्धी आणि उपदेश सगळीकडे पसरू लागले. केवल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर महावीर स्वामी जनसामान्यांसाठी “अर्धमागधी” भाषेमध्ये उपदेश करू लागले. महावीर स्वामी यांनी त्यांच्या प्रवचनातून लोकांना अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तय आणि ब्रह्मचर्य यावर जास्त जोर देऊन उपदेश केला होता.हळूहळू त्यांचा संघ प्रगती करू लागला. देशात अनेक ठिकाणी भ्रमण करून महावीर स्वामींनी त्यांचे अनमोल आणि पवित्र संदेश पोहोचवले. त्यांच्या उपदेशाने तत्कालीन राजवंश अधिक प्रभावित झाले होते.

त्यामुळे अनेक राजांनी जैन धर्माला आपला राज धर्म म्हणून स्वीकारले. बिंबिसार आणि चंद्रगुप्त मौर्य यांची नावे प्रामुख्याने जैन धर्म स्वीकारण्या मध्ये घेतली जातात. तसेच ते स्वतः जैन धर्माचे ( Jain religion ) अनुयायी बनले होते. भगवान महावीर यांचे पुढे वयाच्या 72 व्या वर्षी पावापुरी येथे कार्तिक कृष्ण अमावस्येला निर्वाण झाले. त्यांच्या निर्वाण दिवशी घरोघरी दिवाळीला दिवे लावले जाऊन दिवाळी साजरी केली जाते.

Leave a Comment