आदी शंकराचार्य ( Adi Shankaracharya ) यांच्याशिवाय सनातन धर्माची कल्पनाही करता येत नाही. आठव्या शताब्दी मधील सनातन धर्माचे आदिगुरू तसेच धर्मगुरू म्हणून जगद्गुरु आदी शंकराचार्य यांचे नाव घेतले जाते. तसेच त्यांना शिव अवतार, शंकराचार्य योगी, श्रीमद् गुरु, धर्मचक्र प्रवर्तक, यतीचक्र चुरामुनी, धर्म सम्राट आणि भगवान सुद्धा संबोधले जाते. त्यांनी विलुप्त झालेला हिंदू धर्म पुनर्जिवित करून वैदिक पटलावर एकत्र आणला.
त्यांनी जे 32 वर्षात केले ते 1000 वर्षात कोणी करू शकले नाही. शंकराचार्यांना भगवान शिव शंकराचा एक अवतार मानले जाते. तसेच अवतार मानण्या मागे फक्त श्रद्धाभाव नसून त्यांनी ज्या कालखंडामध्ये जन्म घेतला होता त्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या शैलीत काम केले असे काम साधारण व्यक्ती कोणीही करू शकत नाही. वैदिक काळाचा अंत होत असताना म्हणजेच उत्तर वैदिक काळामध्ये ज्याप्रमाणे सनातन धर्मात निज स्वार्थासाठी, वर्ण व्यवस्थेसाठी आणि कर्मकांड साठी कृती घडत होत्या त्यामुळे सनातन धर्म पतन मार्गाकडे चालला होता.
लोक अध्यात्माला आणि ईश्वर भक्तीला सोडून जादूटोणा, पाखंड आणि तंत्र मंत्र यावर जास्त भरवसा ठेवू लागले होते. तसेच या काळात सर्वात जास्त वर्णभेद, गरीब श्रीमंत भेद, जातीभेद आणि धर्मभेद असे भेदभाव होऊ लागले होते. त्यामुळे धर्म परिवर्तनाचा प्रकार फार वाढला होता. अशावेळी सनातन धर्माला पुनर्जीवित करण्यासाठी एका दिव्य पुरुषाची आवश्यकता होती.
त्याचवेळी केरळ राज्यामध्ये कालडी नावाच्या गावात पिता शिवगुरु आणि माता आरंब्या यांच्या पोटी ब्राह्मण कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव त्यांनी शंकर असे ठेवले. लहानपणापासून ते वेदक होते आणि पुढे त्यांना संन्याशी बनण्याची तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्या गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी आरंभ्याशी विवाह केला होता. विवाह नंतर अनेक वर्ष झाले तरी त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्यानंतर काही वर्षांनी ते जेव्हा वयस्कर होऊ लागले तरीही त्यांना संतान प्राप्ती झाली नाही म्हणून ते परत शिव उपासना करू लागले.
शिव उपासनेची फलप्राप्ती म्हणून पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या मुलाला भगवान शिव शंकराचा अवतार समजून त्यांनी मुलाचे नाव “शंकर” असे ठेवले. पुढे याच तेजस्वी बालकाने केवळ धार्मिक एकीकरण करून एकात्मतेचे काम केले. तसेच एका राजाप्रमाणे देशाचे बौद्धिक आणि सैनिक सशक्तीकरण केले. त्यांच्या कार्याच्या एकूण 32 वर्षाच्या काल खंडामध्ये हे सर्व त्यांनी केले होते. आदी शंकराचार्य यांच्या जन्म वर्षाबद्दल अनेक मतभेद आढळतात. परंतु त्यांचे सनातन धर्मातील जे चार मठ आहेत त्यांनी जो शंकराचार्य यांचा कालखंड काढला आहे तो इसवी पूर्व 480 ते इसवी पूर्व 520 पर्यंतचा सांगितला जातो.
परंतु अशी कुठलीही तारीख त्यांच्या जन्मा बाबत प्रमानीत नाही. आदी शंकराचार्य यांचे वडील आणि आजोबा हे सुद्धा वेदांचे परिपूर्ण अभ्यासक होते.त्यामुळे फार लहान वयातच शंकराचार्य यांना वेदांचे ज्ञान प्राप्त झाले होते. सांगितले जाते की आदी शंकराचार्य यांना वयाच्या आठव्या वर्षी वेदांचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते. तसेच वयाच्या 12 व्या वर्षी सर्व शास्त्रात ते पारंगत झाले होते. तसेच वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी प्रस्थान त्रयीच्या माध्यमातून भाष्य केले होते. प्रस्थान त्रयी म्हणजे भगवद्गीता, ब्रह्म सूत्र आणि 11 उपनिषदे याच्यावर त्यांनी भाष्य केले होते. पुढे पुढे वयाच्या 32 व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली होती.
आदी शंकराचार्य यांनी जीवनाच्या पहिल्या सोळा वर्षाच्या आयुष्यात त्यांनी असे जीवनाचे सत्य मांडले होते आणि परिपूर्णता केली होती की पुढील 16 वर्षे सनातन धर्मासाठी केलेले कार्य पूर्णत्वास जाईल. शेवटच्या सोळा वर्षांमध्ये त्यांनी चार वेळा संपूर्ण भारत भ्रमण केले होतेआणि सनातन धर्माची विचारधारा मोठी शिष्टता, शालीनता, आणि सौम्यता बाळगून इतर धर्मांच्या समक्ष शास्त्राच्या माध्यमातून ठेवली. तसेच संपूर्ण भारताला एकसूत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांनी भारताच्या चारही दिशेला चार मठांची स्थापना केली. तसेच दशनामी आणि दंडी स्वामी अशा दोन प्रकारच्या संन्यास घेणाऱ्या पद्धती तयार केल्या. देशात जे चार मठ त्यांनी तयार केले.
जसे की उत्तर भारतात ज्योतिर्मठ, पश्चिम भारतात द्वारका शारदा मठ, दक्षिण भारतात शिंगेरी मठ, आणि पूर्व भारतात गोवर्धन मठ. हे चारही मठ वेगवेगळ्या चार वेदांचे रक्षण करतात. “ज्योतिर्मठ” अथर्ववेदाचे संरक्षण करतो म्हणजे अथर्व वेदाचे जितके काही ग्रंथ आहेत त्या सर्वांचे संरक्षण म्हणजे अथर्व वेदाचे ज्ञान, विज्ञान, प्रेषित करणे इत्यादी करतो, तसेच पश्चिम दिशेचा “द्वारका मठ” सामवेदाचे संरक्षण करतो, पूर्वेचा “गोवर्धन मठ” ऋग्वेदाला संरक्षित करतो आणि दक्षिणेचा “शिंगोरी मठ” यजुर्वेदाचे संरक्षण करतो.अशा प्रकारे एकता आणि एक सूत्रता वाढवण्यासाठी एका मठात एकाच वेदाचे शिक्षण असे आदी शंकराचार्य यांचे व्हिजन होते. तसेच त्यानंतर त्यांनी दशनामी संन्यास व्यवस्था तयार केली.
संन्यास घेण्याचा अर्थ होतो की भौतिक दुनिया पासून दूर जाणे आणि अध्यात्माच्या दिशेने ब्रह्माचे अनुकरण करणे. परप्रांतीय भारतीयांना लवकर गुलाम बनवत होते म्हणून संन्याशांचे सशक्तिकरण करणे त्यांना आवश्यक वाटत होते. त्यामुळे त्यांनी ही दशनाम संन्यास व्यवस्था आणली होती. हे दशनाम संन्यास म्हणजे वन, आरण्य, गिरी, पर्वत, सागर, तीर्थ,पुरी,आश्रम, भारती आणि सरस्वती.
यातील वन आणि आरण्य होते ते जंगलात राहून आदिवासींना शिक्षित करत होते. तसेच गिरी आणि पर्वतावरील संन्याशी पर्वतांचा आश्रय घेऊन तेथील जनजातींना सुशिक्षित करत होते.
तसेच सागर संन्याशी समुद्रकाठी राहून त्या परिसरातील लोकांना शिक्षित करत असायचे. तसेच तीर्थ आणि आश्रम संन्याशी सनातन धर्मातील जेवढे तीर्थ आणि आश्रम आहेत तेथे सनातन धर्मासाठी योगदान देत होते. त्याचप्रमाणे पुरी नावाचे संन्याशी सनातन धर्माच्या जितक्या काही पुरी,ज्योतिर्लिंग,शक्तिपीठ आणि धाम आहेत अशा ठिकाणी राहून सनातन धर्माचे महत्त्व वाढवत होते.
तसेच भारती नावाचे संन्याशी भारताच्या गुरुकुलामध्ये राहून व सरस्वती नावाचे संन्याशी भारताच्या विश्व विद्यालयांमध्ये राहुन सनातन धर्माचे रक्षण करत होते. या दशनामी संन्याशी व्यवस्थेच्या व्यतिरिक्त आदी शंकराचार्यांनी दोन सेना आणखी उभ्या केल्या होत्या. एक म्हणजे दंडी स्वामी आणि दुसरी म्हणजे नागा संप्रदाय. दंडी स्वामी वैदिक ज्ञानाचे रक्षण करत होते आणि सनातन धर्मावर लागलेल्या आरोपांचे शास्त्रार्थ आणि ज्ञान विज्ञानाच्या मार्गाने निवारण करत होते. त्याचप्रमाणे नागा साधू संप्रदाय भारतावर होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध शस्त्र विद्या मध्ये पारंगत केले जायचे.
अशा प्रकारे आदी शंकराचार्य यांनी केवळ बौद्धिक युद्ध नव्हे तर सैन्य युद्धाने सुद्धा भारताला तयार केले होते. कारण भारताच्या इतिहासाला पाहून त्यांना माहीत होते की जितके शास्त्र महत्त्वाचे आहे तितकेच शस्त्र सुद्धा महत्त्वाचे आहे. एवढे करून सुद्धा त्यानंतर सनातन धर्मातील लोकांना संघटित करण्यासाठी शंकराचार्य यांच्यासमोर फार मोठी समस्या उभी राहिली होती. त्यावेळी सनातन धर्मात षट दर्शन होते, तीर्थक्षेत्रांचे दर्शन होते तसेच याशिवाय अनेक प्रकारचे संप्रदाय होते.
त्यामुळे ते आपापसात वेगळे होऊन तंटा करायचे.. जसे षट दर्शन, सांख्य योग मधील माणसा, न्याय वैशेषिक,वेदांत या सर्व दर्शनाची विचारधारा वेगवेगळी होती.याशिवाय आपले जे संप्रदाय होते शैव ,वैष्णव,शाक,गणपती आणि सौर यांचेही जे इष्ट देवता होते म्हणजे त्यांच्या साकार भगवंताचे रूप होते त्यांच्यामध्ये सुद्धा भेद होता.
त्यामुळे सनातन धर्मातील विभिन्न संप्रदायामध्ये लवकर सामंजस्य होत नव्हते. म्हणून शंकराचार्यांनी सर्व दर्शनाचा एक मध्य काढून “अद्वैत दर्शन” म्हणून सर्वांसाठी एकाच प्रकारचे दर्शन तयार केले आणि संदेश दिला की, देशात जेवढे काही दर्शन आहेत त्या सर्वांचे सार म्हणजे “अद्वैत दर्शन” होय. त्याचप्रमाणे त्यांनी देशात जेवढे काही संप्रदाय होते त्यांनाही एकत्र करून “पंचदेव उपासना” आणली. त्यामुळे जो कोणी भक्तिमार्गात जाईल तो पाच देवांची उपासना करेल असा त्याचा अर्थ सांगितला गेला.
विष्णू,शिव,शक्ति,गणेश,आणि सूर्य देवाची उपासना यामधे येते. यामुळे वेगवेगळ्या संप्रदायातील लोक एकत्र येऊन सर्व सांप्रदायातील देवांच्या पूजा,उपासना आणि भक्ती करू लागले. त्यामुळे भारत आणखी संघटित झाला. त्यामुळे आपल्या बौद्धिक शारीरिक आणि अध्यात्मिक क्षमतेचा असा सदुपयोग करून आदी शंकराचार्यांनी सनातन धर्माचा दिवा लावून भारत प्रकाशमय केला.
पूर्वीच्या पाल साम्राज्यात म्हणजे सध्याच्या उत्तराखंड मध्ये शिवा अवतार आधी शंकराचार्य यांनी शेवटचा श्वास घेतला होता. अद्वैत वेदांत आणि नाथ संप्रदाय साहित्य मध्ये त्यांच्या कार्याचे दर्शन घडते. अनेक धार्मिक लोक त्यांच्या शृंगेरीचे शंकराचार्य पीठ, ओरिसा मधील जगन्नाथ पुरी चे गोवर्धन पीठ, द्वारका मधील शारदा मठ, बद्रीकाश्रम मधील ज्योतिर्रपीठ अशा ठिकाणी दर्शनासाठी जातात. काही लोक शारदा पिठाला आणि द्वारका पिठाला कालीमठ असे म्हणतात.