अथर्वशीर्ष ( Atharvashirsha ) श्री गणेश देवाच्या उपासनेचे सर्वोत्तम स्तोत्र असून ते संस्कृत मध्ये आहे. अथर्व वेदाचे शीर्ष किंवा उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय. अथर्व वेदांमध्ये श्री गणेश देवाला साक्षात ब्रह्मांडाचे सार तसेच सर्वोच्च देवता म्हणून संबोधलेले आहे. अथर्व वेद (Atharva Ved ) ग्रंथाचे पठण केल्याने बुद्धी, ज्ञान,धन आणि मानसिक शांती लाभते तसेच जीवन संकटमुक्त होते असे सांगितले जाते.
श्लोक 1
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षन् तत्त्वमसि ।
त्वमेव केवलङ् कर्ताऽसि ।
त्वमेव केवलन् धर्ताऽसि ।
त्वमेव केवलम् हर्ताऽसि ।
त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि ।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।।
अर्थ:- हे गणेश देवा तुला माझा नमस्कार असो, तूच खरा साक्षात ब्रम्हांडनायक आहेस. या सृष्टीचा तूच खरा करता आणि करविता आहेस. तुच या सृष्टीवर सर्व जीवांचे संरक्षण करतो. तुझ्यामध्येच सर्व विश्व व्यापलेले असून तूच सर्व काही आहेस. म्हणून देवा तू फार पवित्र साक्षी आहेस.
श्लोक 2.
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।।
अर्थ :- देवा तूच ज्ञानी आणि तूच सर्व काही सत्य सांगतो.
श्लोक 3
अव त्वम् माम् । अव वक्तारम् ।
अव श्रोतारम् । अव दातारम् ।
अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् ।
अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् ।
अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् ।
अव चोध्र्वात्तात् । अवाधरात्तात् ।
सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् ।।
अर्थ :- देवा तु माझा आहेस, तुच माझे संरक्षण कर, तु माझ्या प्रार्थनेचे किंवा विनंतीचे रक्षण कर. तसेच जे मी सांगितलेले ऐकतात त्यांचेहीं तु संरक्षण कर. जो मला काही देतो त्याचेही तु संरक्षण कर, जो कोणी माझे रूप धारण करतो ,त्याचेही तु संरक्षण कर. पवित्र वेदाचे उपनिषदाचे वाचन करणाऱ्यांचे तुम्ही संरक्षण करा. तसेच वेदांचे वाचन करणाऱ्याकडून ज्ञान घेणार्या सर्वांचे तु संरक्षण कर.चारही
दिशांनी वरील सर्वांचे देवा तु रक्षण कर.
श्लोक 4
त्वं वाङ्मयस्त्वञ् चिन्मयः ।
त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः ।
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।
त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि ।
त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।।
अर्थ:- देवा तुच खरा बुद्धिमान, ज्ञानी आहेस, तुच चिन्मय म्हणजे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण किंवा परमचेतना आहेस, तुच सर्वांच्या जीवनाचा आनंद आणि ब्रह्मज्ञानी आहेस, तुच सर्वांसाठी सच्चिदानंद आहेस, तुझे रुप अद्वितीय आहे, तुच एकमेव प्रकट कर्ता आहेस.तुच ब्रह्म आणि तुच ज्ञानविज्ञानाच्या ज्ञानाचा दाता आहेस.
श्लोक 5
सर्वञ् जगदिदन् त्वत्तो जायते ।
सर्वञ् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति ।
सर्वञ् जगदिदन् त्वयि लयमेष्यति ।
सर्वञ् जगदिदन् त्वयि प्रत्येति ।
त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।
त्वञ् चत्वारि वाव्पदानि ||
अर्थ :- तु या विश्वाचा निर्माणकर्ता आहेस, सर्व जगाचे तु संरक्षण करतोस, संपूर्ण जग तुझ्यामध्ये सामावलेले आहे, सर्व जगाचे सर्वस्व तुझ्यामध्ये दिसत आहे, तुच जल, तूच जमीन,तूच आकाश आणि तूच वायू आहेस, तसेच तुच चारही दिशांना व्यापलेला आम्हा सर्वांना दिसत आहे.
श्लोक 6
त्वङ् गुणत्रयातीतः ।
(त्वम् अवस्थात्रयातीतः ।)
त्वन् देहत्रयातीतः । त्वङ् कालत्रयातीतः ।
त्वम् मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।
त्वं शक्तित्रयात्मकः ।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
त्वम् ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम्
इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वञ चन्द्रमास्त्वम्
ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्
अर्थ :- प्रभू श्री गणेश देवा तु सत्त्वगुण, रजगुण आणि तमगुण या तीन गुणांपासून वेगळे आहेस. तु तीनही काळापासून म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ पासून दूर आहेस. तसेच तू तिनही देहांपासून वेगळा आहेस, तु जीवनाच्या मूळ तत्त्वावर चालतो. तुझ्यामध्ये धर्म,उत्साह व मानसिक या तीनही शक्ती समाविष्ट आहेत. त्यामुळे योगी, ऋषी, मुनी, साधू आणि महागुरू फक्त तुझेच ध्यान करतात.तु ब्रह्मा, विष्णू, महेश,रुद्र, इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्र आहेस. तुझ्या मध्ये सर्व सगुण आहेत.
श्लोक 7 .
गणादिम् पूर्वमुच्चार्य
वर्णादिन् तदनन्तरम् ।
अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ।
तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् ।
गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् ।
अनुस्वारश्चान्त्यरूपम् ।
बिन्दुरुत्तररूपम् ।
नादः सन्धानम् । संहिता सन्धिः ।
सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः ।
निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता ।
ॐ गँ गणपतये नमः ।।
अर्थ :-तुझे गण उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण उच्चारण करावे.ॐ कार उच्चारण करावे. तसेच तुझा पूर्ण मन्त्र ॐ गं गणपतये नम: मंत्राचे नेहमी मनःपूर्वक भक्ती भावाने उच्चारण करावे.
श्लोक 8
एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नो दन्तिः प्रचोदयात्
अर्थ :- तू एकदंत विघ्न हरवणाऱ्या देवा, तुझ्या वक्रतुंड चे मी ध्यान नेहमी करतो. म्हणून तू मला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि सुबुद्धी दे.
श्लोक 9
एकदन्तञ् चतुर्हस्तम्,
पाशमङ्कुशधारिणम् ।
रदञ् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम्,
मूषकध्वजम् ।
रक्तं लम्बोदरं,
शूर्पकर्णकम् रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्,
रक्तपुष्पैःसुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनन् देवञ्,
जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतञ् च सृष्ट्यादौ,
प्रकृतेः पुरुषात्परम् ।
एवन् ध्यायति यो नित्यं
स योगी योगिनां वरः ||
अर्थ :- देव श्री गणेश एकदंत आणि चार भुजा धारण केलेला आहे. म्हणजे पाश, अंकुश, दंत आणि वर मुद्रा गणेश देवाने धारण केल्या आहेत. गणेश देवाच्या ध्वजा वर एक मूषक धारण केलेले दिसते. ते लाल कलर चे वस्त्र आहे. आणि त्याच्या कपाळी चंदनाचा लेप लावलेला आहे. श्री गणेश देवाला लाल फुले अर्पण केली जातात सर्व इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणून श्री गणेशाला ओळखले जाते. तो सृष्टी निर्माता आहे. म्हणून महायोगी श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात.
श्लोक 10
नमो व्रातपतये, नमो गणपतये,
नमः प्रमथपतये,
नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय,
विघ्ननाशिने शिवसुताय,
वरदमूर्तये नमः ||
अर्थ :– व्रातपति म्हणजे दीनदुबळ्यांचा आणि मोठ्या समूहाचा पालन पोषण आणि संरक्षण कर्ता श्री गणेश देवाला माझे नमन. त्याचप्रमाणे गणपतीच्या इतर नावांचे नामस्मरण करून प्रथम पती, एकदंत, विध्नविनाशक, लम्बोदर, शिवतनय श्री वरद मूर्ती या सर्वांना माझे नमन.
श्लोक 11
एतदथर्वशीर्षं योऽधीते ।
स ब्रह्मभूयाय कल्पते ।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।
स सर्वतः सुखमेधते ।
स पञ्चमहापापात् प्रमुच्यते ।
सायमधीयानो दिवसकृतम्
पापन् नाशयति ।
प्रातरधीयानो रात्रिकृतम्
पापन् नाशयति ।
सायम् प्रातः प्रयुञ्जानोऽअपापो भवति ।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति ।
धर्मार्थकाममोक्षञ् च विन्दति ।
इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् ।
यो यदि मोहाद्दास्यति
स पापीयान् भवति ।
सहस्रावर्तनात् ।
यं यङ् काममधीते
तन् तमनेन साधयेत् ।।
अर्थ :- जे हे अथर्वशीष पठण करतील ते सर्व विघ्नांपासून दूर राहतील. ते नेहमी आनंदी राहतील, तसेच पाच महापापापासून मुक्त होतील. अथर्वशीर्षाचे संध्याकाळी पठण केल्याने दिवस भरातील कर्मापासून होणारे दोष दूर होतात. तसेच सकाळी पठण केल्याने रात्रीचे दोष दूर होतात. आणि निरंतर पाठ करणारे पूर्ण दोषमुक्त होतात. तसेच ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्षावर विजय प्राप्त करतात. अथर्वशीर्षाचे 1000 वेळा पठण केल्याने भक्त सिद्धी प्राप्त करून महायोगी बनतात.
श्लोक 12
अनेन गणपतिमभिषिञ्चति ।
स वाग्मी भवति ।
चतुथ्र्यामनश्नन् जपति
स विद्यावान् भवति ।
इत्यथर्वणवाक्यम् ।
ब्रह्माद्यावरणम् विद्यात् ।
न बिभेति कदाचनेति ।।
अर्थ :- जे भक्त अथर्वशीर्षाचे पठण करतात त्यांची वाणी स्वतःची दास बनते. तसेच जे चतुर्थीचा उपवास करतात व ओम गणेशाय नमः चा जप करतात ते विद्वान होतात. जे गणपतीला संपूर्ण विश्वाचे ब्रम्हांडनायक समजतात ते भयमुक्त होतात.
श्लोक 13
यो दूर्वाङ्कुरैर्यजति ।
स वैश्रवणोपमो भवति ।
यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति ।
स मेधावान् भवति ।
यो मोदकसहस्रेण यजति ।
स वाञ्छितफलमवाप्नोति ।
यः साज्यसमिद्भिर्यजति
स सर्वं लभते, स सर्वं लभते ।।
अर्थ :- जे गणपतीचे दुर्वांकुरे पूजन करतात ते कुबेराला प्रसन्न करतात. जे गणपतीची पूजा करतात ते यशस्वी होतात, गुणवंत होतात, तसेच गणपतीला जे मोदक प्रसाद अर्पण करतात यांना त्यांच्या मनाप्रमाणे फळ मिळते. जे भक्त समिधाने श्री गणेशाचे हवन करतात त्यांना सर्व काही मिळते.
श्लोक 14
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा,
सूर्यवर्चस्वी भवति ।
सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ
वा जप्त्वा, सिद्धमन्त्रो भवति ।
महाविघ्नात् प्रमुच्यते ।
महादोषात् प्रमुच्यते ।
महापापात् प्रमुच्यते ।
स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति ।
य एवम् वेद ।।
अर्थ :- जे भक्त आठ ब्राह्मणांना उपनिषदांचे ज्ञान देतात ते भक्त सूर्यासारखे तेजस्वी राहतात. तसेच सूर्यग्रहण वेळी,नदीच्या तिरावर किंवा आपल्या इष्ट समीप जे भक्त उपनिषदांचे पठण करतात त्यांना सिद्धी प्राप्त होते. तसेच त्यांचे जीवन अडचणी मुक्त होते. त्यांची पापे कमी होतात. ते समृद्ध व विद्वान होतात. अशी ही ब्रह्मविद्या आहे.
शान्तिमन्त्र
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः ।
भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः
व्यशेम देवहितं यदायुः ।।
अर्थ :- हे श्री गणेश देवा आमच्या कानात तू असे शब्द पाडावे त्यामुळे आम्हाला ज्ञान, बुद्धी मिळेल आणि निंदा व दुराचार पासून आम्ही दूर राहू. तसेच कायम समाजाच्या सेवेत आमचे मन रमेल. त्याचप्रमाणे आम्ही वाईट कर्मा पासून नेहमी दूर राहू. तसेच आम्ही देवाच्या भक्तीत रमून जाऊ. आमचे आरोग्य नेहमी आपल्या कृपेने चांगले राहू दे.आम्ही भोगापासून दूर राहू आणि आमच्या शरीरात, मनात आणि धनात भगवंत वास करू दे.
- प्रार्थना –
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्योऽअरिष्टनेमिः
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। - अर्थ : देवा तुझी कीर्ती चारही दिशेला पसरली आहे, तुझी देवांचा देव इंद्रदेव सारखी कीर्ती झाली आहे.तू ज्ञानाचा सागर आहेस. तुझ्यामध्ये बृहस्पती प्रमाणे शक्ती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या कृतीला दिशा दिली जाते त्यामुळे संपूर्ण मानव जातीला त्याचा फायदा होतो.