तीर्थक्षेत्र सोमनाथ | Tirth Kshetra Somnath

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असलेले सोरटी सोमनाथ मंदिर ( Tirth Kshetra Somnath ) गुजरातमध्ये गीर सोमनाथ जिल्ह्यात आहे . मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर नवव्या शताब्दी मधील असून महाभारत आणि भागवत पुरानामध्येही याचा उल्लेख आढळतो. येथे पूर्वीच्या काळात एक हजार किलो सोन्याची घंटा होती. मुघल साम्राज्यात या मंदिराला सतरा वेळा लुटले होते व सहा वेळा तोडले गेले होते. सध्याच्या काळात हे मंदिर झेड प्लस सुरक्षितेखाली आहे.

सोमनाथ मंदिरातील जे मूळचे शिवलिंग होते ते मुस्लिम आक्रमणादरम्यान महम्मद गजननी याने आपल्या सोबत नेले. त्यानंतर दुसरे शिवलिंग तयार करून ते पहिल्या शिवलींगाच्या जागेवर स्थापन करण्यात आले. सर्वात शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार केला. एक प्रख्यात तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले सोमनाथ वेरावल पूर्वीच्या काळात गुजरात मधील तीन बंदरांपैकी व्यापाऱ्यांचे मुख्य बंदर स्टेशन होते. समुद्र मार्गे व्यापार करणाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण होते.

येथून आफ्रिका आणि चीन देशातील जंज व सुफाला बीचवर जाता येत असे. तसेच भारतातील मध्यपूर्व आणि उत्तर पूर्व आशियामध्ये येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. गुजरात मधील द्वारका, ओरिसा मधील पुरी, तामिळनाडू मधील रामेश्वरम आणि चिदंबरम या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या तीर्थस्थळासोबत सोमनाथ मंदिराचा उल्लेख केला जातो. या तीर्थक्षेत्राचा उल्लेख स्कंद पुराण व शिव पुराण यामधेही केलेला आढळतो .सौराष्ट्र या नावावरून या स्थळाचे सोमनाथ व सोमेश्वर असे नाव झाल्याचे समजते.

अनेक वैदिक पौराणिक कथांमध्ये या तीर्थस्थळाची विशेष महती आढळते. येथील संगम भारतातील लोकप्रिय संगम आहे. पाचव्या शताब्दीतील कालिदास यांच्या कवितेतून प्रयाग, पुष्कर आणि गोकर्ण यांच्यासोबत सोमनाथ ( Somnath ) या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळण्यासाठी आणि सुखप्राप्तीसाठी अनेक भावीक या तीर्थक्षेत्री जातात. सोमनाथ मुख्य मंदिराशेजारीच सोमनाथ जुने मंदिर आहे. मुघलांच्या काळात सोमनाथ मंदिर उध्वस्त करण्यात आले होते त्यानंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी त्या मंदिराचा जीणोर्द्धार केला.

असे म्हणले जाते की भगवान शिव शंकर अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वप्नात येऊन येऊन त्यांना या मंदिराची पुनरपुनर्स्थापना करण्याचे सांगितले होते. या मंदिरात दोन शिवलिंग आहेत. त्यातील एक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे तर दुसरे स्वयंभू आहे. मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या जुन्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सर्वच भक्त जातात.सोमनाथ मंदिर जीर्णोद्धारात मारू गुजर वास्तुकलेत बांधलेले असून या वास्तु कलेला चैलक्य किंवा सोलंकी शैली असेही म्हणतात. कैलास महामेरू प्रमाणे या मंदिराचे स्वरूप आहे. गुजरात मधील सोमपुरा सलात कौशल्य कलेसारखे हे दिसते.

सातपुरा मधील श्री प्रभाशंकर भाई आणि ओघडभाई यांनी हे बांधलेले आहे. इस 1950 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला होता. मंदिराचे नक्षीकाम फार सुंदर असून मंदिर दोन मजली आहे. येथे भक्तांच्या सुविधासाठी सोमनाथ भक्ती ट्रस्टच्या वतीने मोठे अन्नछत्र उभारण्यात आलेले आहे , येथे भक्तांना मोफत अन्नप्रसाद दिला जातो .येथे सोमनाथ बीचवर उंच मोठी हनुमानाची मूर्ती आहे.

सोमनाथ मंदिराच्या ( Somnath Temple ) जवळच सोमनाथ बीच आहे. तसेच सोमनाथ बीचवर कॅमल रायडिंग हॉर्स रायडिंग इत्यादीचा आनंद भक्तांना घेता येतो. परंतु येथे जाण्यासाठी सोमनाथ बीचवर माफक फी आकारली जाते. तसेच संध्याकाळी सात वाजल्यानंतर बीचवर प्रवेश मिळत नाही. सोमनाथ तीर्थक्षेत्राजवळच त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी तीन नद्यांचा एकत्र संगम होतो. त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी आपणास बोटीने जावे लागते. बोटीने संगमावर जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी तीस ते पन्नास रुपये आकारले जातात.

फक्त पाच मिनिटात बोटीने संगमावर जाता येते. हिरण, कपिला आणि सरस्वती नद्यांचा हा संगम आहे. पूर्ण भारतात सरस्वती नदीचा संगम असलेले हे एकमेव ठिकाण आहे. त्याचप्रमाणे सोमनाथ मंदिरापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर पानगंगा प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे समुद्राच्या कडेला मोठे शिवलिंग आहे. स्वयं समुद्र या शिवलिंगाचा अभिषेक करत असतो. या ठिकाणी तीन शिवलिंग आहेत.

असे सांगितले जाते की द्वारकाहून श्रीकृष्ण या ठिकाणी येऊन राहिले होते. बहिल्याने पानगंगा येथून हरीण समजून कृष्णाच्या दिशेने बाण सोडला होता आणि तोच बाण या ठिकाणी कृष्णाला लागला होता.बहिल्या कृष्णाला माफी मागताना मूर्ती उभारल्या आहेत. येथे सुंदर कृष्णाचे मंदिर उभारले आहे तसेच सोमनाथ मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर गीता मंदिर म्हणजेच गोलभधाम आहे.

ज्यावेळी कृष्णाला बहिल्याचा बान लागला होता तेव्हा श्रीकृष्ण या ठिकाणी आले होते. याच ठिकाणाहून श्रीकृष्ण वैकुंठधामाला निघून गेले . गीता धाम जवळ हिरण नदी आहे, हीच हिरण नदी पुढे संगमाला जाऊन मिळते. येथे वल्लभाचार्यांचे एक बैठक स्थान आहे ,याच ठीकाणी राहून त्यांनी धर्म प्रसार केला होता. सोमनाथ मंदिरापासून जवळच त्रिवेणी संगम आहे .

तसेच त्रिवेणी संगमाजवळ पाच मिनिट अंतरावर सूर्यदेव मंदिर आहे तसेच तेथे पांडव गुफा आणि हिंगलाज माता मंदिरही आहे . येथे एक जुन्या काळातील मोठी विहीर आहे. मंदिरामध्ये मोठी दक्षिणेकडे पाहणारी शिवमुर्ती आहे तसेच एक नंदी आणि शिवपार्वती निशान आहेत. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील दृश्यांच्या चित्रकला आहेत. मंदिरांच्या खांबावरील नक्षीकाम माउंट आबू च्या लुना वासाई मंदिरासारखे आहे. सहिष्णुता आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून हिंदू धर्मीयांसाठी हे एक फार पवित्र आणि मोठे श्रद्धास्थान आहे.

सोमनाथ मंदिर अहमदाबाद पासून चारशे किलोमीटर अंतरावर, जुनागड पासून 82 किलोमीटर अंतरावर, पोरबंदर हवाई अड्ड्यापासून 130 किलोमीटर अंतरावर, दिव हवाई अड्ड्यापासून 82 किलोमीटर अंतरावर तसेच वेरावल रेल्वे जंक्शन पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. सोमनाथ जवळ राहण्यासाठी मोठे भक्त निवास आहे. प्रत्येक माणसासाठी येथे फार कमी 100 ते 150 रुपये फी आकारली जाते. येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन वेरावल आहे.

1 thought on “तीर्थक्षेत्र सोमनाथ | Tirth Kshetra Somnath”

Leave a Comment