शीख धर्म | Sikh Religion


शीख धर्माची ( Sikh Religion ) सुरुवात पाचशे वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब भागात झाली होती. जगातील सर्वात तरुण म्हणजे अलीकडच्या काळात स्थापन झालेला हा धर्म आहे. पंजाब भाग हा इतिहासातील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यावेळी हिंदू मुस्लिम आणि जैन सर्व धर्मांनी आपली वेगवेगळी छाप सोडली होती. त्यात पंजाब मधील संस्कृती नेहमीच विशेष राहिलेली आहे आणि याच संस्कृतीचा परिणाम आजही शिखांवर दिसून येतो. दुनिया मध्ये शिखांची संख्या 30 मिलियनच्या आसपास आहे.

त्यातील 83% सीख आपल्या भारत देशात राहतात. त्यातील 60 टक्के सिख धर्मीय लोक पंजाब मध्ये राहतात. भारतातील एकूण लोकसंख्येच्या शीख धर्मीय लोकसंख्या 1.72% आहे. बाकी इतर देशांमध्ये सुद्धा विविध प्रांतात शीख धर्मीय लोक राहतात. इंग्लंड ,ऑस्ट्रेलिया कॅनडा , मलेशिया सारख्या देशांमध्ये अनेक शीख धर्माचे लोक राहतात. भारतानंतर शिखांची सर्वात जास्त आबादी कॅनडामध्ये सांगितली जाते. कॅनडातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 1.5 % शीख कॅनडामध्ये राहतात.

शीख धर्मामध्ये एकूण दहा गुरू होऊन गेले. हा धर्म या गुरूंच्या आधारे तयार झाला आहे. या सर्व गुरूंचे शीख धर्मामध्ये आपले वेगवेगळे महत्त्व आहे. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाचे गुरुनानक मानले जातात. गुरुनानक हे शीख धर्माचे पहिले गुरु असून त्यांचा जन्म सन 1469 मध्ये पंजाब मधील ननकाना साहेब शहरा मध्ये झाला होता. हे शहर सध्या पाकिस्तानचा एक हिस्सा आहे. जन्मापासूनच गुरुनानक हे फार वेगळे होते. लहानपणी ते मोठ्या आवाजात जरा वेगळेच हसत असायचे. मोठे झाल्यानंतर गुरुनानक सुलतानपूरला गेले आणि तेथे शाही भंडारा मध्ये नोकरी करू लागले. येथे नोकरी करत असतानाच लोकांमध्ये पसरलेले वाईटविचार,अंधश्रद्धा,गरीब श्रीमंतभेद, जातिभेद आणि वर्णभेद हे पाहून ते फार दुःखी व्हायचे. एकदा ते सुलतानपूर जवळील नदीमध्ये स्नान करत होते.

तेव्हा त्यांच्यासमोर एक चमत्कार घटना झाली होती. स्नान करत असताना ते अचानक ईश्वराजवळ पोहोचले आणि प्रत्यक्ष ईश्वरा बरोबर बोलने करून तीन दिवसांनी ते माघारी आले. परत आल्यानंतर ते लोकांबरोबर या झालेल्या प्रकाराबद्दल बोलू लागले. या दुनियेमध्ये कोणीही व्यक्ती हिंदू,मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचा वेगळा नाही. ही गोष्ट दुनियातील लोकांना ते यासाठी सांगत होते की त्यांना कोणत्याही जाती धर्मातील लोकांना वेगवेगळे पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. गुरुनानका नंतर या धर्मामध्ये आणखी नऊ गुरु आले. या सर्वांनी दुनियातील सर्व देव आणि सर्व मानव जाती एक समान आहेत असा   संदेश दिला होता.

गुरुगोविंद सिंग या धर्मातील दहावे आणि शेवटचे गुरु होते. त्यांनी खालसा शिखांना पाच गोष्टी म्हणजे केश, कंधा म्हणजे कंगवा, कारा म्हणजे कडे, कचेरा म्हणजे एक अंतर्वस्त्र आणि किरपान म्हणजे पोलादी सुरी अशा पाच वस्तू नेहमी वापरात नियमित सांगितल्या. या वस्तूंचे पालन करणारे शीख धर्मातील लोक आपणास आजही आढळतात. त्याबरोबरच त्यांनी शीख धर्मीयांचा धार्मिक ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब पूर्ण करून या ग्रंथाला अंतिम रूप दिले होते. हा ग्रंथ एक धर्मीयांचा जिवंत गुरु ग्रंथ मानला जातो.

या ग्रंथाच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे दोन शब्द आढळतात त्यातील पहिला म्हणजे ओंकार आहे. या शब्दाचा अर्थ ईश्वर सगळीकडे एकच असून हीच खरी वास्तविकता आहे असा सांगितला जातो. एकाच ईश्वरावर विश्वास असणे सर्वात मोठी आणि महत्त्वाची अस्था समजली जाते. तसेच ईश्वराच्या रूप निराकार निर्गुण असून त्याचे  प्रत्येक ठिकाणी वास्तव्य आहे. असे गुरु ग्रंथ साहिब मध्ये सांगितले आहे. गुरुनानक नेहमी ईश्वराला वेगवेगळ्या पर्यायाने समजले जाऊ शकते असे सांगायचे. जसे की ईश्वर कोणासाठी विष्णू असू शकतात तर कोणासाठी अल्लाह असू शकतात. किंवा इतर कुठलेही नाव असू शकते की ज्यावर लोकांचा विश्वास आहे.

त्यामुळे कोणाचा देव खरा आणि कोणाचा खोटा यावर लोकांनी वाद घातला नाही पाहिजे असेच गुरुनानक सांगायचे. शीख धर्म लोकांच्या कर्मानुसार आणि नरकात जाण्याच्या विश्वासावर आधारित नाही. या धर्मामध्ये पृथ्वीवरील माणसाच्या जीवनाला नरक मानले जाते. कारण त्यांच्या मते माणूस मेल्यानंतर त्याच्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे जीवन एखाद्या जाळ्याप्रमाणे असून ज्यामध्ये प्रत्येक मनुष्य या जीवन मरणाच्या चक्रामधून मुक्तता मिळवू इच्छितो आणि हे अहंकारातून मुक्त झाल्याशिवाय शक्य नाही. शीख धर्मामध्ये अहंकार नष्ट करणे याला मुक्तीचा रस्ता सांगितला आहे.

शीख धर्मामध्ये असे सांगितले आहे की, मनुष्य मायाजाळ मध्ये फसून ईश्वरापासून दूर जातो. जी गोष्ट ईश्वरापासून माणसाला दूर करते त्यालाच माया म्हटले जाते. गुरुनानक सांगतात की माया ही ईश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये एक भिंत आहे ती पाच वस्तूंपासून बनलेली आहे. त्या पाच वस्तू म्हणजे हौस, लालच, क्रोध, इच्छा, आणि अहंकार या आहेत. शिखांचे हे कर्तव्य आहे की या पाचही गोष्टीपासून दूर राहून जीवन जगायचे. जोपर्यंत मनुष्य या पाच गोष्टींना सोडत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळू शकत नाही. गुरुनानक सांगतात की दुनिया मध्ये कितीही अडथळे किंवा अडचणी आल्या तर त्या मनुष्याच्या अहंकार आणि मायेमुळे येतात.

 गुरुनानक  सांगतात की जो व्यक्ती मायेच्या चक्रामध्ये फसून आपले जीवन जगेल त्याला मनमुख असे म्हणतात आणि जो व्यक्ती मोह,माया आणि अहंकाराला सोडून प्रेम, सत्यता, समाधान आणि सहानुभूती पूर्वक ईश्वराचे ध्यान करत जगेल त्याला गुरुमुख असे म्हणतात. गुरुनानक देव यांनी सांगितले की शीख धर्माचे तीन स्तंभ आहेत. या तीनही स्तंभांना मानून कुठलाही मनुष्य गुरुमुख होऊ शकतो. पहिला स्तंभ म्हणजे “नामजपू” म्हणजे रोज बाह्यगुरुचे नाम जपत ईश्वरावर ध्यान लावले पाहिजे, दुसरा स्तंभ म्हणजे” किरत करो “ म्हणजे कडी मेहनत करून इमानदारीने जीवन जगावे लागेल, आणि तिसरा स्तंभ म्हणजे “वंडचकू “ म्हणजे आपण कमावलेल्या धनातून दुसऱ्याला मदत केली पाहिजे.

त्यामुळे शीख धर्माचे लोक आपल्या संपत्तीचा काही हिस्सा आपल्या समुदायांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वाटत असतात. आणि शिखानद्वारे गुरुद्वार मध्ये आणि दुसऱ्या काही ठिकानामध्ये चालवला जाणारा लंगर (अन्नदान ) त्याचाच एक हिस्सा आहे. त्यामुळे गुरुद्वार मध्ये कोणत्याही जाती धर्मातील लोकांना मोफत महाप्रसाद घेण्याची परवानगी असते.आपल्या भारतातील अमृतसर मध्ये स्थित असलेले “हर मंदिर साहिब “ शिखांचे सर्वात पवित्र स्थान आहे. त्याला सुवर्ण मंदिर ( Golden Temple ) नावाने सुद्धा ओळखले जाते.

या मंदिरातील लंगर जगातील सर्वात मोठा “फ्री किचन” म्हणून ओळखला जातो. येथे दररोज एक लाखापेक्षा जास्त भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. या ठिकाणी शीख धर्मातील हजारो लोक स्वच्छेने येथे मोफत सेवा करतात. आपल्यातील अहंकार मुक्त करण्यासाठी  शीख धर्मीय लोक येथे सेवा करतात असे सांगितले जाते. त्यांच्या सेवेमध्ये सफाई करणे, भांडी घासणे इत्यादी कामे असतात. त्याचप्रमाणे शिखांचे सर्वात मोठे कार्य शिखांचे कम्युनिटी मशहूर खालसाचे सांगितले जाते. कारण शिखांच्या याच कम्युनिटी खालसाने शीख धर्माला शेवटचा महत्वपूर्ण आकार दिला आहे.

ही गोष्ट आहे सण 1699 मधील. जेव्हा शिख धर्मीय लोकांवर मुघलांच्या हातून संपण्याचा धोका निर्माण झाला होता.त्या काळात गुरू गोविंद सिंग यांनी आपल्या साथीदारांना जमा करून आपल्या धर्माबद्दल शीख धर्मीयांच्या जीवनाविषयी कुर्बानी मागितली होती. त्यांचे हे बोलणे ऐकून तेथे जमलेल्या लोकांना फार वाईट वाटले. त्यातील फक्त पाच लोक आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून आपली कुर्बानी देण्यास तयार झाले. मग गुरुगोविंद यांनी त्या पाच लोकांना केसरी रंगाचे कपडे परिधान करण्यास सांगितले. आणि सर्व लोकांसमोर त्यांना “पंच प्यारे “म्हणून नाव देण्यात आले. त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांनी त्यांना गोड पाणी पिण्यास दिले त्याला अमृत म्हटले जाते.

ते पाच लोक वेगवेगळ्या जातीचे असून सुद्धा त्यांनी एकाच भांड्यातून अमृत पिले. ते पाणी पिल्यानंतर हे पाच लोक जातनिहाय कम्युनिटी चा एक हिस्सा झाले. त्यालाच “खालसा” हे नाव देण्यात आले. व ह्या लोकांनी आपल्या जातीचे आडनाव काढून “सिंग” कॉमन आडनाव लावले. त्यानंतर अशा प्रकारे शिखांची नवी खालसा कम्युनिटी अस्तित्वात आली. ज्यामध्ये शीख धर्मीय लोकांना जोडून एका समाजाप्रमाणे एकत्र आले.आज सुद्धा बरेच शिख लोक सिंग आणि गोर आडनाव मिळवण्यासाठी गुरुद्वार मध्ये अमृतनामाच्या वाटेने वावरत असतात.

Leave a Comment