श्री रामानंद बिडकर महाराज | Shri Ramanand Bidkar Maharaj

22 नोव्हेंबर 1838 मध्ये श्री रामानंद बिडकर महाराज ( Shri Ramanand Bidkar Maharaj ) यांचा जन्म पुण्यामध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराय बिडकर तर आईचे नाव गंगुबाई होते. त्याकाळी पुण्यामध्ये ब्रिटिशांची राजवट होती. बिडकर महाराजांचे वडील सरकारी दप्तरी कामकाजात होते परंतु रामानंद अवघे सात वर्षाचे असताना त्यांचा अकाली मृत्यू झाला.

त्यामुळे त्यांना वडिलांचे सुख जास्त काळ मिळाले नाही.त्यांना एक भाऊ व चार बहिणी होत्या परंतु एवढे मोठे कुटुंब वडिलांच्या जान्याने उघड्यावर आले होते. रामानंद त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान परंतु फार जिज्ञासू होते. तसेच लहानपणापासूनच त्यांना देवभक्तीची आवड लागली होती. परंतु त्यांच्यावर जबाबदारी पडल्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांचा मोठा भाऊ घर सोडून निघून गेला होता त्यामुळे आपोआपच कुटुंबाची जबाबदारी रामानंद वर आली होती.

लहानपणापासून रामानंद मध्ये भक्ती ठासून भरलेली होती. परंतु प्रापंचिक जबाबदारी मुळे जास्त आध्यात्मिक जीवन त्यांना जगता येत नव्हते. तरीही ते कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून अधून मधून देवभक्ती आणि अध्यात्मिक सेवा करत असत. कुटुंबाच्या मोठ्या जबाबदारी मुळे त्यांनी सराफी व्यवसायात प्रवेश केला. त्यांचा व्यवसाय लवकरच नावारूपाला आला होता.

त्यानंतर त्यांचा संसार सुरळीतपणे आणि समाधानकारक चालू होता. विवाहाचे वय झाल्यानंतर रंगुबाईशी त्यांचा विवाह पार पडला. परंतु त्यांचे काही केल्या संसारात आणि व्यवसायात लक्ष लागेना. कारण त्यांच्या अंगी धार्मिकता ठासून भरलेली होती आणि भक्तिमार्गाची त्यांना ओढ लागली होती. त्यांचे प्रारब्ध त्यांना भक्तिमार्गाकडे खेचत होते. मारुतीरायाचे ते आद्य उपासक होते.

परंतु एकदा एक व्यक्ती त्यांना पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी घेऊन गेला आणि त्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीची व सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची नेहमीच ओढ लागत असे. तसेच त्यांना सप्तशृंगी मातेचा भक्तिमार्गाकडे वळण्यासाठी कौल मिळाला होता. मध्यंतरी त्यांनी हनुमंत रायाची घोर तपचर्या केली. त्याच काळात त्यांना मारुती रायांकडून साक्षात दृष्टांत झाला. दृष्टांतातून त्यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या सेवेकडे जाण्याचे संदेश मिळाले.

त्यानंतर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच थेट अक्कलकोटला जाऊन स्वामी चरणी लीन झाले. संसारी खाणीतला हा दगड स्वामींनी पारखून घेतला आणि आपल्या खास शिष्यांमध्ये रामानंदाचा समावेश केला. लवकरच स्वामींनी रामानंदांना लौकिक संसारीक सुखातून मुक्त केले. पुढे रामानंद मध्ये वैराग्याची पात्रता निर्माण झाली. स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि स्वरूप सांप्रदायाची सुरुवात केली.

स्वरूप संप्रदाय म्हणजे ज्यावेळी आपण समाधी अवस्थेत जातो तेव्हा जीवात्मा आत्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. ही प्रक्रिया स्वामींनी रामानंद याला सांगितली. त्यातून तुला आपले खरे स्वरूप कळेल असे स्वामी म्हणाले. तसेच श्री रामानंद महाराजांना स्वामी समर्थानी सांगितले की ही आपली शेवटची भेट आहे , यानंतर आपली भेट होणार नाही.

श्री स्वामी समर्थ 1856 ते 1878 या कालावधीमध्ये अक्कलकोट मध्ये होते म्हणजे हा काळ सर्वसाधारण 22 वर्षांचा होता आणि रामानंदाचा जन्म 1838 चा होता. म्हणजे वयाच्या 17 ते 18 व्या वर्षी स्वामींचे प्रत्यक्ष सानिध्य रामानंद महाराजांना लाभले होते. स्वामींनी आमची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील असेही सांगितले होते. पुढे रामानंद महाराज बीडकरांनी स्वामींच्या आदेशानुसार नर्मदा परिक्रमा सुरू केली होती स्वामींच्या आज्ञेने त्यांना वैराग्य प्राप्ती झाली होती. जवळजवळ दोन ते अडीच वर्षे त्यांना नर्मदा परिक्रमा करण्यास लागले होते. नर्मदा परिक्रमा करून शेवटी ते पुण्यात आले .

पुण्यनगरीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका मठाची स्थापना करण्यास सुरुवात केली होती तसेच आपल्या गुरूच्या अज्ञाने आपल्या शिष्यांना धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा शिष्यवर्ग मोठा तयार झाला. सर्वसामान्य लोकांची सेवा करत रामानंद महाराज व त्यांच्या शिष्यांनी स्वरूपा संप्रदाय पुढे नेण्याचे काम केले. एकदा रामानंद बिडकर महाराज जंगलामधून प्रवास करत असताना त्यांच्या निदर्शनास एक वाघ दिसला. नेमके ते ध्यानाला बसणार आणि या काळोख्या अंधारात त्यांना वाघ दिसला. परंतु रामानंद महाराजांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्यामुळे तो वाघ एका बाजूने निघून गेला आणि त्यांच्या वरील संकट टळले.

त्यांनी आनंद अश्रू ढाळले आणि आपल्या स्वामींच्या कृपादृष्टीमुळे आपण आहोत असा त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्यांच्यावरील संकट टळले होते. त्यामुळे आणि समर्थांच्या अनुभूतीमुळे त्यांनी स्वतः बरोबर अनेकांना समर्थांच्या सेवेचा सल्ला देऊन कल्याण केले.
असेच एकदा नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना एक ब्राह्मण गृहस्त भेटले. तो फार आजारी असल्यामुळे तो नर्मदेमध्ये आत्महत्या करणार होता.

परंतु त्या अगोदर तो बिडकर महाराजांना भेटून त्यांनी त्याला मूळव्याधचा फार त्रास असल्याचे सांगितल्यामुळे महाराजांनी त्याला स्वामी समर्थ कृपेने रोगमुक्त केले होते. त्या ब्राह्मणाने स्वामींच्या आदेशानुसार नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि त्यानंतर गया, प्रयाग, काशी, औदुंबर, नरसोबाची वाडी अशा ठिकाणच्या तीर्थयात्रा पूर्ण केल्या आणि शेवटी आयुष्यभर स्वामी चरणाची सेवा केली.

आपला दैनंदिन व्यवहार पारदर्शक आणि प्रामाणिक असावा, तहानलेल्या पाणी आणि भुकेलेल्या ला जेवण द्यावे, आपले सर्वस्व स्वधर्माला अर्पण करावे, व्यवहारी नुकसान भरून काढता येते परंतु अध्यात्म नुकसान भरून काढता येत नाही असे अनेक अनमोल संदेश ते इतरांना देत होते. यानंतर महाराजांनी नाशिक शहरात प्रवेश केला. साधारणपणे इस 1907 ते 1908 दरम्यान त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वास्तव्य केले. काळाराम मंदिराच्या समोर त्यांनी एका दत्त मंदिराची स्थापना केली होती.

अर्थात ते हे सर्व गुरुच्या आज्ञेनुसार करत होते. अशा प्रकारे त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू असताना रामानंद महाराज बिडकर यांनी इस 1913 मध्ये समाधीस्थ झाले. परंतु त्याआधी 1911 मध्ये त्यांच्या धर्मपत्नी रंगुबाई यांचे निधन झाले होते. पत्नी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना वैराग्य प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पत्नी गेल्यानंतर दोन वर्षांचा काळ त्यांच्यासाठी फार कठीण गेल्याचे सांगितले जाते. त्यांनी जीवनभर गुरु आज्ञेनुसार आपली अखंड सेवा आपल्या शिष्यापर्यंत पोहोचवली होती. अशा प्रकारे थोर संत महात्मा रामानंद महाराज बिडकर यांच्या भक्तीमार्ग प्रवासाचा शेवट झाला. पुण्यामध्ये शनिवार पेठेत नदीच्या काठी श्री रामानंद महाराज बिडकर यांची समाधी आहे.

रामानंद महाराजांचे खास शिष्य श्री रावसाहेब म्हणजेच बाबा सहस्त्रबुद्धे हे होते. बाबा महाराज सहस्त्रबुद्धे यांचा आश्रम पुण्यामध्ये मॉडेल कॉलनी येथे आहे. तसेच शनिवार पेठेजवळ नेने घाटावर त्यांचा मठ आहे. त्यांच्या शिष्य परिवारामध्ये रावसाहेब सहस्त्रबुद्धे हे महत्त्वाचे सतपुरुष होते. त्यांची ही समाधी पुण्यातील शिवाजीनगर येथे आहे. त्यांनी रामानंद महाराज बिडकर यांच्या कडून इस 1911मध्ये अनुग्रह घेतला होता.

Leave a Comment