( अभंग क्रमांक- 306, 1064,1953,14, 2360 )
अभंग १
नाम साराचेही सार। शरणागत यमकिंकर ।।।।। उत्त्तमा उत्तम। वाचे बोला पुरुषोत्तम ।।२।। नाम जपता चंद्रमौळी। नामे तरला वाल्हाकोळी ।।३।।तुका म्हणे वर्णं काय। तारक विठोबाचे पाय ।।४।। तु. म. ३०६
अर्थ- हरीचे नाम साराचेही सार आहे म्हणून जो नेहमी हरीच्या नामाचे चिंतन करतो त्याला यमाचे किंकर सुद्धा साधकापुढे शरणागती पत्करतात. नाम हे चांगल्यात चांगले आहे. म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चितन करा, नाम प्रत्यक्ष शंकर (महादेव) जपतात. एवढेच नव्हे तर नामाने वाल्याकोळीही तरला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता किती वर्णन करावे, खरोखर विठोबाचे पायच मुक्त करणारे म्हणजेच तारणारे आहेत.
चिंतन– नामाचा महिमा सांगणारा तुकोबारायांचा हा गोड अभंग आहे. त्यांच्या वाडमयात बरेच महिमे सांगितले आहेत, संतांचा, गुरु यांचा,क्षेत्रांचा, संगाचा तसाच त्यांनी नामाचा महिमा या अभंगामधून सांगितला आहे. पण सर्व महिम्यापेक्षा वेद शास्त्र, पुराण व संत सांगतात नाम महिमा आगळा वेगळा आहे. नामाचे चिंतन करतांना काही मुद्दे समोर येतात, नाम मंगलात मंगल, पवित्रात पवित्र, गोडात गोड, उत्तमात उत्तम, सारात सार, चांगल्यात चांगले, बऱ्यात बरे, खऱ्यात खरे, श्रेष्ठात श्रेष्ठ, मोठ्यात मोठे, पुण्यात पुण्य व सोप्यात सोपे आहे. पण प्रस्तुत अभंगात दोनच मुद्दे येतात, नाम सारात सार आहे व नाम उत्तमात उत्तम आहे. त्यात महत्त्वाचा मुद्दा महाराज प्रथम चरणात सांगतात.
अभंग २
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ।। भाग्यवंता छंद मनी । कोड कानीं ऐकती ।।५।। ।।२।। विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ।।३।।तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती तो धन्य ।।४।। १०६४
अर्थ- संत तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा मंत्र सोपा आहे असे द्विवार सांगतो.आणि तोच समूळ पाप नाहीसे करनारा आहे.जे कोणी भाग्यवान आहेत त्यांच्याच मनास त्याचा छंद असतो व त्यांचेच कोड कौतुक ते आपल्या कानांनी ऐकतात. विठठल हे दैवत फार भोळे आहे. त्यासंबंधी कोणतीही इच्छा काळ धरीत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये विठ्ठल आहे तो कोणत्याही जातीचा जरी असला तरी तो धन्य आहे.
चिंतन – नामाचे सुलभत्व व सफलत्व सांगणारा हा तुकोबारायांचा अभंग आहे. प्रत्येक माणसास सुखाचीच अपेक्षा असते. हा महाभारताचा महासिध्दांत आहे.
अभंग ३ – नामे स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ।।१।। आणिके दुरावली करिता खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ।।२।। रामनामी जिहीं धरिला विश्वास । तिहिं भवपाश तोडियेले ।।३।। तुका म्हणे केले कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनी ||४|| १९५३
अर्थ- जे कोणी हरीचे नामस्मरण सर्वकाळ करतील त्यांना स्नानसंध्यादि क्रियाकर्माची प्राप्ति होऊन त्यांच्या संसारश्रमाचा परिहार होईल. हे मुख्य मर्म न जाणता अन्य साधनांची खटपट करुन पुष्कळ लोक देवापासून दुरावले आहेत. त्यांचे साधनश्रम व्यर्थ गेले आहे ज्यांनी रामनामाच्या ठिकाणी विश्वास धरला त्यांनी संसारसंबंधी सर्व पाश तोडून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी भाविक आहेत. त्यांनी नामसंकीर्तनाने कळिकाळास नम्र करुन त्याला आपले स्वाधीन ठेवले.
चिंतन- माणूस म्हणजे कर्मभूमी व भोगभूमी आहे. पशूपक्षी देह म्हणजे पापाचा भोग, इंद्रादिक देव पुण्याचा भोग, मात्र मनुष्य भोगभूमी असून कर्मभूमी आहे. संचिताप्रमाणे या जन्मात पापपुण्याचा भोग भोगावाच लागतो पण माणसाला मात्र क्रियमाण कर्माप्रमाणे कर्म करण्याचे स्वातंत्र्य देवाने दिले आहे. महाराज म्हणतात ही कर्मभूमी आहे.
अभंग ४
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनिया ।।१।। तुळसीहार गळा कासे पीतांबर। आवडे निरंतर हेचि ध्यान ।।२।।सवं मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ।।३।। तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख । पाहीन श्रीमुख आवडीने ।।४।। १४
अर्थ – विटेवर पांडुरंगाचे जे ध्यान आहे. ते सुंदर असून कमरेवर हात ठेविले आहेत. तुळसीचा हार गळ्यात आहे आणि कंबरेला पीतांबर धारण केला आहे. असे हे ध्यान मला नेहमी आवडते. माशाच्या आकाराप्रमाणे ज्याच्या कानांत कुंडले झळकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी धारण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे ध्यानच सर्व सुख आहे. त्याचे सुशोभित सुख मी आवडीने पाहीन.
चिंतन – तुकोबारायांच्या काही गाथ्यात हा एक नंबरचा अभंग आहे. मात्र देवडीकर गाध्यात हा अभंग चवदा नंबरचा आहे व हा गाथा वारकरी सांप्रदायास जास्त मान्यताप्राप्त आहे. काही ठिकाणी कीर्तन सुरू करण्यापूर्वी हा अभंग म्हणतात व कीर्तन सुरू झाल्यानंतर राम कृष्ण हरी भजन म्हणून
रुप पाहतां लोचणी । सुख झाले व साजणी ।।
हा ज्ञानोबारायांचा अभंग म्हणून, चिंतनाचा अभंग घेतात.
अभंग ५
रुपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन॥१॥ देहभाव हरपला । तुज पाहतां विठ्ठला ॥२॥ कळो नये सुखदुःख । तहान हरपली भूक ।।३।। तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शन मागुती ॥४॥ २३६०
अर्थ- माझे डोळे तुमच्या रुपाच्या ठिकाणी गढून गेले आहेत तुमच्या चरणी माझे मन स्थिरावले आहे. हे विदुना तुला पाहाण्याने माझा देहात्मभाव नाहीसा झाला तुझ्या बनाने मुखदुःखाचे भान नाहीसे झाले व्यानि झाल्याने प्रपंच परीवर्तन झाले आता पुन्हा प्रपंचात पडणार नाही.
चिंतन- रूपासक्ती सांगणारा हा महाराजांचा अभंग आहे. विठ्ठलाचे सुंदर रूप पाहिल्यानंतर मनावर व तनावर काय परिणाम होतात हे महाराज यामधून सांगतात . सर्वाद्वियांत दोधाचे विशेष महत्व आहे. विज्ञान, शास्त्रज्ञ सांगतात ८२% ज्ञानोपानी होते. ११% ज्ञान कानानी होते. ३.५% ज्ञान त्वचेने होते.२% जान नाकाने होते. परंतु आम्ही आमचे ध्यान देवाकडे लावले.
१) सामान्य लोकांना देवाचे दर्शन मूर्तीमध्ये होते. २) साधकास देवाचे दर्शन स्वप्नात होते.