संत तुकाराम बीज | Sant Tukaram Beej


महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच संतांपैकी माहाराष्ट्राच्या मातीला लाभलेले महान संत म्हणजे,संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांनी आपल्या अभंगा मधून कीर्तनामधून समाजप्रभोधनाचे काम केले, दिनदुबळ्यांना सोबत घेऊन सर्व जाती धर्माच्या गुण्यागोविंदाने राहण्याच्या संदेश त्यांनी आपल्या अभंगा मधून आपणास दिलेला आहे. संत तुकाराम महाराज सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त मेढ रोवणारे निर्भीड संत कवी होते.

संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत जगद्गुरू तुकोबारायांनी संपूर्ण जगाला अध्यात्माची शिकवन देऊन भक्ती मार्गाला लावले. शेतकऱ्यांना प्रथम कर्ज माफी करणारे पहिली व्यक्ती म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत.मानव असून सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दाखवणारे संत म्हणजे संत तुकाराम महाराज होय. फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन झाले. याच दिवसाला तुकाराम बीज म्हणून ओळखतात. संत तुकाराम बीज सोहळ्याला अनेक वर्षांची परंपरा आहे.सन 1650 साली संत तुकाराम महाराज आपल्या मधून निघुन गेले.

हा दिवस दुःखाचा नसून महाराजांची शिकवण त्यांचा उपदेश गाठीशी बांधून त्यांनी दाखवलेल्या परमार्थाच्या मार्गांवर जाण्याचा आहे अशी श्रद्धा भक्तांच्या वारकऱ्यांच्या मनात आहे.असे म्हणतात वर्षात एक तरी वारी करावी, ज्या लोकांना देहू ते पंढरपूर ची वारी करता येत नाही ते भाविक तुकाराम बीजेला देहू मधे येतात . तुकाराम बीज या सोहळ्या साठी राज्यभरातून लाखो भाविक दिंड्या सह देहू मधे दाखल होतात. दशमी पासून सुरु होणारा हा सोहळा रंग पंचमी पर्यंत चालतो.

बीजेच्या आदल्या दिवसापासूनच येथे भजन कीर्तनाचा हरिपाठा चे कार्यक्रम सुरु असतात. पहाटेपासून या सोहळ्यास सुरवात होते, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि पंढरीचा पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. इंद्रायणी च्या काठावर भाविकांचा जनसमुदाय नामघोष आणि टाळ मृदूंगाच्या गजरात भक्ती रसात न्हाहून निघतो. पहाटे काकड आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज्यांच्या शिळा मंदिराची पूजा होते. नंतर संत तुकाराम महाराज्यांच्या वैकुंठ गमन मंदिरातील जगद्गुरूंच्या मूर्तीची महापूजा होते.परंपरे नुसार संत तुकाराम महाराज्यांच्या पादुका विठ्ठल रुख्मीनी मंदिरातून सभामंडपात आणून पालखीत ठेवण्यात येतात.कीर्तन झाल्यानंतर देऊळवाड्या मधून पालखी संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिराकडे मार्गस्थ होते.

या वेळेस सारा आसमंत हरीनामच्या जयघोषाणे दुम दुमाला जातो. लाखो भाविक याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी राज्यभरतून देहू मधे येतात.वैकुंठ गमन मंदिरा मधे कीर्तनाची सेवा संपन्न झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नांदुरकीचे झाड हलते,दुपारी 12 वाजून दोन मिनिटांनी जगद्गुरू तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले बरोबर त्याच वेळेस हा वृक्ष हलतो, याची प्रचिती लाखो भावीक घेतात पांडुरंगाच्या नामघोष्यात वारकरी जसे तल्लीन होjऊन देहभान विसरून डोलतात तसेच हा वृक्ष दुपारी 12 च्या सुमारास डोलतो. वारकरी, भाविक वृक्षावरती पुष्प वृष्टी करतात. रंगपंचमीला शेवयाचा नैवदय दाखवून या सोहळ्याची सांगता होते.

संत तुकाराम महाराज संघर्षमय जीवन जगून सुद्धा अध्यात्म भक्ती मार्गाची कास न सोडता आपल्या अभंगा मधून कीर्तना मधून जगाला उपदेश करत राहिले. जय जय रामकृष्ण हरी हा उघड मंत्र त्यांनी जगाला दिला, त्यांचे साहित्य अध्यात्म आणि ज्ञानाचा महासागर आहे.मानव देह रूपात असूनही वैकुंठाला जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या भक्ती मधे होते. अश्या ह्या महान संताला माझे कोटी कोटी नमन, जय जय राम कृष्ण हरी.

Leave a Comment