संत तुकडोजी महाराज | Sant Tukadoji Maharaj

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ( Sant Tukadoji Maharaj ) यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यात यावली या गावी झाला. जातीभेद आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे विशेष काम त्यांनी महाराष्ट्रात मध्ये केले. तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव माणिक बंडोपंत इंगळे हे होते तर त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. पुढे भट या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणू लागले. 19 मे 1909 रोजी त्यांचे बारशे घालण्यात आले होते त्या बारशाला संत गुलाब महाराज, आकोटचे हरिबुवा, माधानचे प्रज्ञाचक्षु आणि यावलीची काही महाराज मंडळी आली होती.

लहान बाळाचे नाव माणिक ठेवले व या सर्व मंडळींनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. चांदूर बाजार रेल्वे या गावी त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील आदकोजी नावाच्या साधू महाराजांनी तुकडोजी महाराजांचे नाव तुकड्या ठेवले असे पण सांगितले जाते. 1925 मध्ये महाराजांनी आनंदामृत या ग्रंथाची रचना केली. संत तुकडोजी महाराज आपल्या प्रवचन,कीर्तन आणि भजनातून समाजाचे प्रबोधन करत होते. त्यांनी खंजेरी वाजवून  उत्तम भजने आणि कीर्तने केली आणि आत्मसंयमनाचे विचार त्यांनी त्यांच्या ग्रामगीता या काव्यांमधून मांडले. तसेच त्यांनी 1935 मध्ये गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.

पुढे त्यांची गांधीजींशी भेट झाली आणि त्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने  २८ ऑगष्ट १९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली होती आणि पुढे 1942 च्या डिसेंबर मध्ये त्यांची कारागृहातून सुटका झाली. 1943 मध्ये झालेल्या विश्वशांतीनाम सप्ताहामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी ५ एप्रिल १९४३ रोजी श्री गुरुदेव मुद्र्नालयाची स्थापना  करून श्री गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. त्यानंतर  १९ नोहेंबर १.९४३ शुक्रवार रोजी त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली व शूद्रांसाठी व हरिजनांसाठी त्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी मंदिरे खुली केली. ते आपल्या काव्यरचनेतून सांगतात की..

गावा गावासी जागवा ।  भेदभाव समूळ मिटवा l
उजळा ग्रामोन्नति चा दिवा । तुकड्या म्हणे ।”

संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतल्या 40 व्या अध्यायात वाचन का आणि कसे वाचावे हे सांगितले आहे. या अध्यायाचं नाव ‘ग्रंथाध्ययन’ असे आहे. पुरताण काळी साधू, संत, ऋषीं,मुनी यांनी जगाचे कल्याण व्हावे, मनुष्य जातीचा उद्धार व्हावा, त्यांना ज्ञान मिळावे, त्यांच्या अडीअडचणी कमी व्हाव्यात यासाठी अनेक ग्रंथ लिहिले पण ते सगळे संस्कृत मध्ये होते आणि हे ज्ञान सर्वसामान्य माणसाला समजणें शक्य नव्हते म्हणून ते चालू बोली भाषेत रूपांतरित करणे गरजेचे होते आणि हे कार्य काही संतकवींनी केले अशाप्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीसुद्धा केले, तसेच त्यांनी मराठीसह हिंदी भाषेत सुद्धा काव्यरचना केल्या.

संत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी जिल्हा अमरावती  येथे आहे. भारत हा गाव खेड्यांचा  देश आहे, हे लक्षात घेऊन येथील गावांचा विकास झाला की देशाचा विकास होईल असे संत तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती आणि तसा त्यांना विश्वास होता. समाजातल्या सर्व धर्मपंथातील  लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांना काळजी होती. ग्रामविकास  आणि ग्रामकल्याण हे त्यांचे जणू ध्येयच होते. भारतातील खेड्यांची स्थिती त्यांना माहीतच होती, त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविल्या.

या उपाययोजना त्या काळी आणि त्यानंतरही योग्य ठरल्या हे आज आपणाला समजते. अशा गोष्टींतूनच त्यांचे कार्य जगभर पसरले आणि ते राष्ट्रसंत म्हणून गणले गेले. अमरावतीजवळ मोझरीचा गुरुकुंज आश्रम आणि ग्रामगीतेचे लेखन हे त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत लक्षणीय कार्य होते. ग्रामगीता ही तर जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होती.लहानपणी त्यांनी त्यांनी भिक्षेवर जीवन काढले होते त्यामुळे ते भजन करताना जी भिक्षा घेत त्यावरून स्वतःला ते तुकड्यादास म्हणत असत.

भारतातील खेडी गावे  विकसित  कशी होतील याविषयीच्या उपाययोजना तुकडोजी महाराजांनी जीवनभर अवलंबविल्या . ग्रामीण जनता सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावी. ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळून ते भरभराटीस यावेत. गावाच्या माध्यमातूनच देशाच्या गरजा भागवाव्यात यासाठी ते प्रयत्नशील होते त्याचे महत्व त्यांच्या ग्रामगीतेतून दिसते.जुन्या काळातील काही चालीरिती, अंधश्रद्धा, देवभोळेपणा या गोष्टी मिटवून टाकाव्यात आणि सामाज्यात जागृती व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. सर्वधर्म आणि सर्व पंथ समभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक आणि सर्वधर्मीय प्राथनेचा सततच पुरस्कार केला.

.संत तुकडोजी महाराज हे एक चांगले समाजसुधारक होते ते नेहमी समाजाच्या एकीवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा देण्याचा प्रयत्न आपल्या कार्यातून केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला होता.अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापनाही केली होती. गुरुकुंज आश्रमाची स्थापना करून त्यांनी आदर्श सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच तयार केली होती.

गुरुकुंजाशी संबंधित कार्यकर्ते त्यांचे कार्य आजही अखंडपणे नेटाने चालवत आहेत. महिलांसाठी न्याय व त्यांची उन्नती हेही त्यांच्या विचारातील आणि कर्तुत्वातील एक वैशिष्ट्य होते.कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्री वर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या प्रबोधनातून  समाजाला पटवून देण्याचे काम केले.तरुणांनी राष्ट्राचे संरक्षण करावे म्हणून तुकडोजी महाराज त्यांना मार्गदर्शन आणि उपदेश करत कारण तेच देशाचे भावी आधारस्तंभ आणि राष्ट्राचा कणा आहेत हे जाणून होते. तुकडोजींनी देशाचे तरुण नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे लेखन केले आहे.

तसेच या परोपकारी राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा नेहमीच तीव्र निषेध केला होता .संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनातून, काव्यांमधून आणि कवितांमधून  जाती भेद पाळू नये , अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत होते. ते प्रत्येक भजनाची सुरवात गुरुस्मरणाने करत आणि नंतर अंधश्रद्धा, व्यसनं, वाईट रूढी आणि परंपरा यावर प्रबोधन करत व नंतर खंजिरी या वाद्यावर ते मोठ्या आवाजात एकलय चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु झाल्यावर विविध धर्म आणि पंथातील लोक एकाग्रतातेने ऐकत असत.

त्यांच्याकडे सर्वधर्म समभाव असल्यामुळे सर्व धर्म आणि पंथांचे लोक त्यांचे अनुयायी झाले होते आणि म्हणूनच त्यांना राष्ट्र संत तुकडोजी महाराज या नावाने ओळख मिळाली . समाजाचे आणि गावचे हित कशात आहे हे त्यांनी आपल्या ग्रामगीता या काव्य ग्रंथातून सांगितले आहे. आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा करण्याच्याही कल्पना त्यांनी दिल्या होत्या . सामुदायिक प्रार्थना करावी व सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच गोवधबंदी व पशुसंर्वधन करावे ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. तुकडोजी महाराजांचा आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान  चळवळीत सुद्धा सहभाग होता.

1955 साली जपामध्ये, शांतता आणि धर्म या विषयावर एक जागतिक परिषद भरली होती त्यातही ते सहभागी झाले होते.  तसेच त्याकाळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी मोझरीला तुकडोजींच्या  गुरुकुंज या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी इ.स.१९ मार्च १९५६ रोजी रविवारी गेल्या होत्या. तसेच ज्यावेळी चीन युद्ध म्हणजे 1962 मध्ये व पाकिस्तानचे युद्ध इ. स.1965 मध्ये झाले त्याकाळात भारतीय जवानांचे मनोबल वाढवून त्यांना धीर देणे गरजेचे होते त्यासाठी संत तुकडोजी महाराज स्वतः युद्धभूमीवर गेले आणि तेथे त्यांनी वीरगीते गायली. ते फ़ार प्रयत्नवादि आणि देशप्रेमी होते.

तन,मन,धनाने त्यांनी प्रबोधनातून देशाची सेवा केली. म्हणूनच  त्यांना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हटले जाऊ लागले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन गुरुवार दिनांक 11/10/1968 रोजी अमरावती जिल्हातील मोझरी या गावी झाले आणि आपला देश या महान संताला मूकला. अशा या वंदनीय आणि महान संताला भारत देश कायम लक्षात ठेवील.

Leave a Comment