संत सेना न्हावी | Sant Sena Nhavi

सर्व संतांनी ज्यांचा गौरव केला असे संत सेना न्हावी ( sant Sena Nhavi ) . राज दरबारी काम करत असतानाही भक्तीची वेळ टळू दिली नाही असे संत सेना न्हावी . तसेच त्यांच्या नावाने महाराष्ट्रासह पंजाब,राजस्थान, मध्य प्रदेश अशा इतर राज्यांमध्ये ही त्यांची मंदिरे आहेत व त्यांच्या नावाने संप्रदाय आहेत असे ते एकमेव संत होते अशा या महान संताचा जन्म रेवा संस्थानातील बांधवगड नावाच्या किल्ल्यावर विक्रम संवद या दिवशी 1357 साली झाला.

म्हणजेच हे ठिकाण सध्याच्या मध्य प्रदेशामध्ये आहे.जातीने नाभिक असलेले संत सेना यांच्या वडिलांचे नाव देविदास वैद्य आणि आईचे नाव प्रेमकुवंरबाई. पंढरपूरच्या विठ्ठलाला त्यांचे ते कुलदैवत मानत असत.त्यांच्या पत्नीचे नाव सुंदरा होते. त्यांच्या आई ह्या मूळच्या मध्य प्रदेश मधील असल्यामुळे त्यांचे नाव तसे आहे. त्यांच्या वडिलांचे गुरु स्वामी रामानंद मूळचे काशीचे होते की जे ज्ञानेश्वरांचे वडिल विठ्ठलपंत यांचेही गुरु होते. बांधवगड ही त्याकाळी बघेला राजवंशाची राजधानी होती. आणि या राजधानीचे पूर्वापार न्हावीपण हे संत सेना यांच्या वडिलांकडे होते. त्यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय होता.

त्यांचे कुटुंब पूर्वीपासूनच राजदरबारामध्ये राजाची सेवा करण्यासाठी होते. परंतु परंपरेने ते नेहमी पंढरपूरची वारी करत होते. काही दिवसांनी सेना न्हावी यांच्या आईवडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आणि वारीची परंपरा संत सेना यांच्यावर पडली तसेच राज दरबारी ही त्यांची त्यांच्या वडिलांच्या जागी नियुक्ती झाली . संत सेना यांनी न डगमगता नित्यनेमाने वडिलांची वारीची परंपरा पुढे चालू ठेवली आणि आपले राज दरबारी असलेले कामही चालू ठेवले.वडिलांप्रमाणेच संत सेनांचे गुरुही रामानंद स्वामी हेच होते.

रामानंद स्वामींनी संत सेना न्हावी यांच्यातील गुण ओळखले. त्यांच्या ज्ञानाचा व आचरणाचा समाजाला उपयोग होऊ शकतो त्यासाठी लोकांना भक्तीमार्गात आणण्याचे कार्य करावे असे सुचविले. आणि गुरूंच्या आज्ञेने  त्यांनी ते काम आयुष्यभर केले. ते लोकांची दाढी डोकी करण्यात पटाईत होतेच तसेच त्यांच्या कीर्तन व प्रवचनासही लोक गर्दी करत असत.तसेच अजूनही ते राजघरानं सेना न्हावी यांच्या वंशजांना मान देतं. तसेच सेना न्हावी यांच्या वंशजांकडून मूक मंत्र घेतला जातो. अशी माहिती मिळते.संत सेना न्हावी यांनी वैद्य द्वादशीला समाधि घेतली. त्या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. 

श्री रामनगरकर यांनी त्यांच्या रामनगरी या पुस्तकांमध्ये नाभिक या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ सांगितलेला आहे. ते म्हणतात की परमेश्वराने सुरुवातीला दोन मनुष्य निर्माण केले. आणि त्यांना सांगितले की जा पृथ्वीतलावावर आणि तिथेच राहा आणि जगा. मात्र जाताना त्यांनी दोघांना दोन वाट्या दिल्या आणि या वाटयांवर तुमचे जीवन तुम्हाला जगायचे आहे असे सांगितले,व एकास विचारले तू कसा जगणार या वाटीचा उपयोग करून?

तो म्हणाला या वाटीत मी भिक्षा मागून जगेन . दुसऱ्याला विचारले असता तो म्हणाला – ना – भीक, मी भीक मागणार नाही तर मी या वाटीचा उपयोग लोकांच्या हजामती करण्यासाठी करीन. म्हणून त्यांना ना -भीक वरून नाभिक असे नाव पडले. पुढे या नाभिक शब्दाचा अपभ्रंश होऊन न्हावी हा शब्द प्रचलित झाला. तसेच काही जण या समाजाला वारीक असेही म्हणतात. तो शब्द मात्र संत सेना न्हावी यांच्या अभंगातून प्रचलित झालेला आहे. “आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक  “ असा तो अभंग आहे. आणि वारीक म्हणजे वारी करणारे आम्ही. असे संत सेना यांना तेथे म्हणायचे होते.

 बारा बलुतेदारांपैकी एक असलेला ह्या नाभिकवंशी संत सेना यांनी अनेक अभंगांची आणि कवितांची रचना केली. त्यांच्या चरित्राची चर्चा करून, अभंगांचे सार्थ साधून, सविस्तर अशी प्रस्तावना करून कोल्हापूरच्या श्री माधवराव सूर्यवंशी यांनी त्यांची गाथा तयार केली. ते एका बँकेत अधिकारी होते. परंतु निवृत्तीनंतर त्यांनी या कामाचा ध्यास घेऊन संत सेना न्हावी यांच्या कार्याच्या अनेक गोष्टी केल्या. त्यातील एक म्हणजे ही गाथा होय. त्यांनी एकूण 257 अभंग सेना न्हावी यांच्या नावावरती लिहिलेले आहेत. आणि त्यांचे छान असे वर्गीकरण माधवरावांनी केलेले आहे.

अनन्य भक्ती वर एक, रूपाचे अभंग सात, विठ्ठलाचे वर्णन असलेले 21, नामाचे महात्मे सांगणारे 33, किर्तन विषयावर तीन, मोक्षाची तुच्छता आणि संत असण्याचे महत्त्व सांगणारा एक, शास्त्राचे दर्शन सांगणारे सहा, परमेश्वराला विनंती करणारे वीस, वत्सलतेने भक्ती करावी असे सांगणारे 12, भक्ती मुळे आनंद सांगणारे पाच, संतांविषयीचे 38, तीर्थयात्रेविषयीचे नऊ, संतांचे चरित्र सांगणारे तीन, मोक्षा विषयीचे दोन, लोकांना उपदेश करणारे 34, व्यवहाराविषयीचे 40, न्हाव्याच्या व्यवसायाविषयी चार, आणि काल्याचा अभंग एक, वासुदेव रूपकाचा एक, अंगाई वर एक, आणि आरत्या दोन असे एकूण 257 अभंग त्यांनी लिहिले.तसेच त्यांच्या 13 अप्रतिम गवळणीही आहेत. त्यांचे अनेक अभंग किर्तन रूपाने प्रबोधन केले जातात व आपुलकीने गायले जातात. 

 त्यांचा एक अभंग शिखांचा गुरु ग्रंथ “साहेब “ नावाच्या ग्रंथात समाविष्ट झालेला आपणास पहावयास मिळतो. त्यांच्या सर्व अभंगांची भाषा ही संत ज्ञानदेव व संत नामदेव यांच्या समकालीन वाटते. तसेच त्यांच्या अभंगांमध्ये फारशी भाषेतील शब्दांचा वापर आपणास आढळून येतो. तसेच काही मराठी शब्द व वाक्यप्रचार ही पाहावयास मिळतात. महिपतींचा भक्त विजय या हिंदू संतावरील ग्रंथ लेखनात संत सेना हे एक अध्यात्मिक नाभीक असून त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे त्यांचा जन्म खालच्या जातीत झाल्याचे सांगितले आहे. तसेच एका कथेत असे सांगितले आहे की, एकदा संत सेना यांना बांधवगडच्या राजाने आपली सेवा करण्यासाठी बोलावले होते.

न्यायालयाचे अधिकारी संत सेनाच्या घरी तसा निरोप घेऊन आले. परंतु त्यावेळी सेना हे आपल्या रोजच्या उपासनेमध्ये दंग होते. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीस मी घरी नसल्याचे सांग असे सांगितले होते. परंतु एका शेजाऱ्याने सेना घरीच असल्याचा निरोप राजाला दिला. त्यावेळी राजाने चिडून सेनाला पकडून साखळदंडाने बांधून नदीत फेकून  देण्याचा आदेश दिला.अशा परिस्थितीत साक्षात पांडुरंगाने राजाकडे जाऊन सेनाच्या रूपात राजाची सेवा करण्यास सुरुवात केली. संत सेनाने  म्हणजेच साक्षात पांडुरंगाणे राजाच्या मस्तकाला तेलाने मालिश करताना तात्काळ त्यांचे डोके दुखायचे थांबले .

तसेच  तेलाच्या कपात चतुर्भुज असलेल्या कृष्णाचे प्रतिबिंब राजाला दिसले. राजाला वर पाहिले असता  सेना दिसायचे व वाटीत पाहिले असता कृष्ण दिसायचे.त्यावेळी राजा गोंधळाला आणि अक्षरशः बेहोश झाला. आणि त्याच्या ते लक्षात येताच संत सेना नाही यांना  साखर दंडाने बांधलेले सोडून देण्याचा आदेश देऊन त्या सजेतून  मुक्त केले व त्यानंतर राजा संत सेना यांच्याकडे आपला तो एक अध्यात्मिक  गुरु या नजरेने पाहू लागले. तसेच मला परत एकदातरी  तेलात कृष्ण दाखवा असे म्हणायचे. मग हे संत सेना यांच्या लक्षात आले की स्वतः पांडुरंग माझ्या अनुपस्थितीत  येथे येऊन गेले आहेत. असे महान होते संत सेना न्हावी.

Leave a Comment