संत मीराबाई | Sant Meerabai

    
संत मीराबाई ( Sant Meerabai ) यांचा जन्म कुडकी गावात राजस्थानमध्ये इ. स.1458  मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रतनसिंह राठोड होते. मिराबाईंचे वडील रतनसिंह हे त्या काळी तिथले वतनदार होते. आणि त्यांच्या आईचे नाव वीरकुमारी होते. मिराबाई अशा या राजपूत घराण्यातील राजकन्या होत्या. मिराबाईंच्या आई वडिलांचे लवकरच निधन झाल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला व  तिचे पालन पोषण केले.

तिची आजी श्रीकृष्णांची फक्त होती. त्यामुळे मीराबाईवर लहानपणापासूनच अध्यात्माचे वळण होते. त्याचप्रमाणे त्या राजघराण्यातील असल्यामुळे त्यांना त्यांच्या शास्त्रज्ञान शिक्षणाबरोबर घोड्यावर स्वार होणे,रथ चालवणे अशा इत्यादी कामांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. अशा पद्धतीने मिरा ही बालपणापासूनच भक्तिमय वातावरणात वाढलेली मुलगी होती. तसेच मीराबाईंना गायन करण्याचीही खूप आवड होती. आजही त्यांची हिंदू गायिका म्हणून ओळख आहे.

मीराबाईंनी सुमारे बाराशे ते तेराशे अशी प्रार्थना भक्तीगीते व भजने लिहिलेली आहेत. मिराबाई लहान असतानाच त्यांना एका साधूने श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली होती. त्या मूर्तीसोबतच ती सतत राहत असे. तिला लहानपणी कोणी जर तू कोणाशी लग्न करणार असे विचारले तर ती कृष्णाशी लग्न करणार असे म्हणायची. साधूने दिलेली कृष्णाची मूर्ती तिला फार आवडायची. अशी एक आख्यायिका आहे की ती मूर्ती साधूने दुरुस्तीसाठी परत नेहल्यामुळे एक दिवस ती मूर्ती  रडू लागली. मग दुसऱ्या दिवशी साधूने ती मूर्ती परत मिराबाईंना दिली. आणि नंतर ती कायम तिच्याजवळच राहिली. मिराबाई  मूर्ती प्रेमी बनली आणि शेवटी त्या मूर्तीशी स्वतःचं लग्न तिने लावले. असे त्या अख्यायिकेमध्ये सांगितलेले आहे.

संत मीराबाई दिसायला खूप सुंदर आणि रूपवान होत्या. त्याचप्रमाणे त्यांचे वागणे,बोलणे,भजन गाणे आणि अध्यात्माच्या ओढीमुळे पुढे त्या अनेक राज्यांमध्ये ओळखल्या जाऊ लागल्या. त्यानंतर मीराबाई जेव्हा वयात आली तेव्हा तिचा विवाह राणासिंग यांचा मुलगा भोजराज यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर मीराबाई कृष्णाची मूर्ती घेऊनच सासरी गेल्या. परंतु लग्न झाल्यानंतरही तिच्या भजन, पुजनात जराही खंड पडला नाही. पुढे त्यांनी कृष्णभक्ती तशीच चालू ठेवली. परंतु मिराबाईंच्या  सासरच्या लोकांनी तिची भक्ती आणि धार्मिकता मान्य केली नाही.

तरीसुद्धा संत मीराबाई थोड्याशाही डगमगल्या नाहीत. त्या दररोज घरातली कामे संपल्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरात जायच्या व मूर्तीची पूजा उपासना करायच्या. तसेच भजन,गायन व नृत्य सुद्धा करायच्या.राजवाड्यातील स्त्रियांना मीराचे वागणे आवडत नव्हते. एकदा मीराबाईंच्या सासूने तिला दुर्गेची पूजा करण्यास सांगितले तेव्हा मिराबाईंनी सांगितले की माझ्या प्रिय कृष्णाला माझे जीवन मी दिलेले आहे. माझी कृष्णाची पूजा झाल्याशिवाय मी दुर्गेची पूजा करू शकत नाही.अशा त्यांच्या स्वभावामुळे पुढे मिराबाईंची मेहुणी उदाबाई यांनी कट रचून तिने मिराबाईला बदनाम करायला सुरुवात केली.

मीराचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे असे रानापुत्राला तिने  सांगितले. व सतत त्यांच्या सासरच्या लोकांचे कान भरू लागली.शेवटी मिराबाईंच्या माहेरच्या लोकांनी सांगितले की तुम्ही चौकशी करा.म्हणजे सत्य सापडेल. काही स्त्रियांनी तुम्हाला मीराबाईबद्दल खोटे सांगितले आहे. हे ऐकताना राणासिग शांत झाला आणि रात्री मंदिरात मिराबाईच्या मागे गेला असता अनेक वेळा त्यांनी मिरेला भजन गाताना पाहिले. मिराबाईंना  सिंहासनाची कसलीही इच्छा नसतानाही  तिचा वेगवेगळ्या प्रकारे तिच्या सासरच्या लोकांनी छळ चालू केला  होता. मिराबाईंनी साधुसंतांची सेवा सोडावी, भजन गायनात तिने रंगू नये म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी तिला एकदा फसवून विष पिऊ घातले.

ती नेहमीच खाता पिता कृष्णाचे नाव घेत असल्यामुळे तिने ते विष प्राशन करतानाही कृष्णाचे नाव घेऊन प्राशन केले. तिने विष प्राशन केल्यानंतर तिच्या कृष्णाच्या मूर्तीच्या गळ्याचा रंग बदलून काळा निळा झाला. असे सांगितले जाते. परंतु मीरेला त्यावेळी काहीही झाले नाही. पुढेही असेच एकदा तिच्या नातेवाईकांनी एका छोट्याशा पेटीतून विषारी नाग तिच्याकडे पाठवला.  मीराबाईंनी ति पेटी उघडताच तिला एक कृष्णाची शालिग्रामची मूर्ती दिसली. अशा प्रकारचे छळ मिराबाईंच्या सासर कडून केले जाऊ लागले म्हणून मीराबाई फार असह्य  झाल्या.

पुढे 1527 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या एका लढाईत मीराबाईंचा पती भोजराज मरण पावला. मग मात्र मीराबाई फारच दुःखी झाल्या. त्यानंतर तर त्यांच्यावर सासर कडून असह्य अत्याचार झाले. मग मात्र मिराबाईंनी या छळाला कंटाळून एक दिवस त्या वैभवाकडे पाठ फिरवली आणि ती काही दिवस वृंदावन येथे येऊन राहिली. पुढे ती तेथून द्वारकेला गेली आणि तिथे तर ती कृष्णभक्तीत अधिकच रंगून गेली. पायी घुंगरू बांधून तिथे ती कृष्ण भक्तीत नाचायची सुद्धा.

पुढे मीराबाईंनी हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये अनेक पदरचना केल्या “ पद घुंगरू बांध मीरा नाची रे “ अशा अनेक तिच्या पदरचना प्रसिद्ध झाल्या. तिच्या लिखाणातील प्रत्येक पदाच्या शेवटी “ मीरा के प्रभू गिरिधरनार “ असा उल्लेख तिने केलेला आपणास आढळतो. पुढे मीराबाई भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत आणि कवित्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मीरा हा शब्द फारसी भाषेतून राजस्थानात आल्याचे सांगितले जाते.तसेच त्या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ म्हणजे श्रीमंत असा होतो. वृंदावनात आल्यानंतर मीराबाईंना वल्लभ संप्रदाय, विठ्ठल, नाथ, तुलसीदास इत्यादी नावे मिराचे दीक्षा गुरु म्हणून घेतले जातात.

पुढे भारताच्या कानाकोपऱ्यात मीराबाईंच्या भक्तीभावाने ओथंबलेली उत्कट पदे पोहोचलेली पाहून श्रेष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासारख्या महान गायकांनी व सर्वसामान्य भक्तांनी संत मीराबाईंच्या कविता भक्तिभावाने भजनाच्या रूपात गायल्या. आणि आजही त्या गायल्या जातात.“ ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन,ओ तो गली गली, हरीगुन गाणे लगी” अशा सुंदर रचना त्यांच्यावर उपलब्ध आहेत. एकदा संत मीराबाई राजस्थानच्या रस्त्यावरून अनवाणी चालत होत्या. चालत असताना तिच्या मार्गामध्ये अनेक मुले, स्त्रीया आणि भक्तांनी तिचे स्वागत केले. मिराबाईंची  वृंदावन येथे गोविंदा मंदिरात पूजा केली जायची.

एवढे त्यांचे कार्य महान होते. संत मीराबाईंनी सोळाव्या शतकामध्ये एकूण तेराशे अभंग आणि भजन लिहून ठेवलेले आहेत. तसेच अनुभव, गुण गौरव,लीला महात्म्य,विरह प्रार्थना, कृष्णविरह यावर त्यांची संख्येने अधिक पदे असून ती अगदी हृदय पर्शी आहेत. अशा पद्धतीने मीराबाईंनी कृष्णभक्तीत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते.

संत मीराबाई आपल्या आयुष्याच्या  शेवटच्या काळात द्वारकेत राहिल्या होत्या. इ.स. 1547 मध्ये मीराबाई गुजरात मधील डाकोर येथील रणछोडदास मंदिरात गेल्या आणि तेथेच त्या विलीन झाल्या. इ.स.1547 मध्ये रणछोडदास मंदिरात मीराबाईंचा शेवट झाला असे म्हटले जाते. एका अख्यायिकेनुसार मीराबाई मंदिरात जाताना लोकांनी पाहिल्या परंतु बाहेर येताना त्या परत कोणालाच दिसल्या नाहीत असे सांगितले जाते.

Leave a Comment