संत कान्होपात्रा | Sant Kanhopatra

 संत कान्होपात्रा ( Sant Kanhopatra ) यांचा जन्म पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढा या गावी झाला होता. इ. स.15 व्या शतकातील  संत कवी सांगितल्या जातात. श्यामा नायकीन नावाच्या अतिशय धनवान सुंदर गणिकेच्या पोटी कान्होपात्रा यांचा जन्म झाला होता. दिसायला फार सुंदर असलेल्या कान्होपात्रा ही श्रीमंत घराण्यात जन्मल्यामुळे ती खुप ऐशोआरामात  वाढलेली मुलगी होती. परंतु ती एका वेश्याघराण्यातील असल्यामुळे समाजात त्यांच्या घराला फार मान  दिला जात नव्हता.

पूर्वी वेश्यांना नायकीन म्हटले जायचे. कान्होपात्रा यांच्या पायी लहानपणीच पायात बांधलेले चाळ हे कोडकौतुकाचे नसून ते वेश्यावृत्तिला नृत्य शिकवण्यासाठी होते. सुंदर रूपवान आणि तारुण्याच्या जोरावर पैसे कमावण्याची फार मोठी संधी त्यांना होती आणि तिच्या आईचा पण तसाच हट्ट होता. गायन आणि  नृत्यांमध्ये तिने लहान वयातच कौशल्य मिळवले होते.आई गनिका असल्यामुळे कान्होपात्राने आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे तिला वाटत होते. परंतु कान्होपात्राला हा व्यवसाय आवडत नसायचा. कान्होपात्रा दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्या आईला तिचे लग्न श्रीमंत घराण्यात करून द्यायचे होते.

श्रीमंत घराण्याची नायकिन म्हणून कान्होपात्राने रहावे असे तिला वाटायचे.काही दिवसांनी मंगळवेढ्याचे पाटील किंवा मुख्याधिकारी असलेले सदाशिव मालगुजर यांची नजर कान्होपात्रा वर पडली. आणि कान्होपात्राचे गाणे,नृत्य बघण्याची त्यांची इच्छा झाली. असा निरोप कान्होपात्राच्या आईकडे मिळताच तिने काहीतरी सांगून कान्होपात्राला सदाशिव मालगुजर यांच्याकडे आणले. सदाशिव मालगुजर यांची पापी नजर कानोपात्रावर पडताच कानोपात्राला त्याची जाणीव झाली.आणि तिने नृत्य करण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु सदाशिव मालगुजर इतका वासनाधीन झाला होता की त्याने नंतर कानोपात्राला आणि तिची आई शामा यांचा छळ चालू केला होता. मग कान्होपात्राच्या आई श्यामाने कानोपात्राची माफी मागितली.

थोड्याच कालावधीत सदाशिव मालगुजर यांचे वैभव ओसरले.लवकरच त्यांची संपत्ती नष्ट झाली. त्यामुळे कानोपात्रा आणि तिच्या आईला होणारा त्रासही कमी झाला. काही दिवस असेच गेले. कान्होपात्राचे लग्न काही होईना. त्यामुळे कान्होपात्रा खूप उदास राहू लागली.अशावेळी कान्होपात्राने मंगळवेढ्यावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना  विचारले की, मी अशा वेश्या घराण्यात जन्माला आलेली मुलगी आहे. मी तुमच्यासोबत देवाला आले तर पांडुरंग मला स्वीकारतील काय? मला सुद्धा विठ्ठल भक्त होता येईल काय? असे ऐकताच वारकऱ्यांचे मन गहिवरले. वारकरी तिला म्हटले की विठ्ठल हा भक्ती करताना जात,धर्म,कुळ पाहत नाहीत.

तिथे फक्त भक्तांची भक्ती पाहिली जाते. असे ऐकल्यावर कान्होपात्रा खुश होऊन वारकऱ्यांसोबत पंढरपूरला गेली. पंढरपूरला जात असताना तिने तिच्या आईची ही परवानगी घेतली. आणि तिच्या आईने ही तिला परवानगी दिली  होती. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले आणि पांडुरंगाच्या चरणाशी ती एकाग्र झाली. मुळातच नायकिणीची मुलगी असल्यामुळे तिला नृत्य,गाणे उत्तम प्रकारे येत होते. सगळ्या प्रकारची गाणी म्हणणारी कान्होपात्रा लवकरच भजन कीर्तनात दंग झाली आणि  ती इतकी प्रसिद्ध झाली की तिची कीर्ती दूरवर पसरली.कान्होपात्राला नृत्य गाणे येत असून तिलाही गायन सौंदर्य मिळाले असते पण तिच्या मनात एक उपजत वैराग्याचा कोपरा होता आणि तो वाढतच चालला होता.

आणि त्यामुळे स्वबळावर तिला संत मंडळींमध्ये स्थान मिळत गेले. पुढे ती भक्तिमार्गात एवढी कार्यरत झाली की वारकरी भक्ती चळवळीचे यश कान्होपात्राला मिळाले. आणि वारकरी सांप्रदायामध्ये एका नायकीनीलाही आत्मसन्मान मिळाला. वारकऱ्यांनी उपक्षितांना न्याय दिला तसेच त्यांनी संत कान्होपात्राला ही न्याय दिला. जेव्हा कान्होपात्रांनी देहत्याग केला तेव्हा त्या अवघ्या पंधरा ते सोळा वर्षाच्या होत्या त्यामुळे त्यांचे अभंग संख्येने खूप कमी असून कान्होपात्रांचे केवळ 26 अभंग आहेत. अशा प्रकारे संत कान्होपात्रा विठ्ठल चरणी नतमस्तक झाली.आणि व्याकुळ भावनेने ती विठ्ठलाची विनवनी करू लागली.


 मज अधिकार नाहीlभेटी देयी विठाबाई l
  ठाव देई चरणापाशी lतुझी कान्होपात्रा दासी ll

कान्होपात्राने तिचे सगळे अस्तित्व विठ्ठलाच्या चरणी समर्पित करून दायत्व स्वीकारले होते. कान्होपात्रा पंढरपुरातच अभंग गात होत्या आणि तेथील हजारो वारकरी त्यामध्ये तल्लीन होत होते. पंढरपूर मध्ये एक वृद्ध महिला होती. तिचे नाव हौसाबाई होते. हौसाबाईने कान्होपात्राला एक झोपडी बांधून दिली होती.आणि कान्होपात्रा तिथेच राहत होती. रोज विठ्ठलाच्या मंदिराची स्वच्छता करायची, झाडलोट करायची आणि संध्याकाळी तिथेच भजन, कीर्तन करायची.असाच दिनक्रम चालू असताना एक दिवस बिदरच्या (कर्नाटक) तिचे कला नृत्य आणि  गायनाची कीर्ती पोहोचली. बिदरच्या बादशहाने कान्होपात्रांना आणण्यासाठी लोक पाठवले.

तेव्हा कान्होपात्रा फार घाबरली होती. ती म्हणाली की मी माझ्या विठ्ठलाचे एकदा दर्शन घेऊन तुमच्याबरोबर येते. आणि मंदिरात गेली असता विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन विठ्ठलाचा धावा करू लागली. “ पांडुरंगाला ती तिच्या रक्षणाची विनंती करू लागली “ सर्वांच्या रक्षणासाठी तू जसा पुढे येतो तसं माझ्या रक्षणासाठी ही ये. अशी गहिवरत होती.जर हे लोक मला घेऊन गेले तर माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल.तेव्हा कान्होपात्राने विठ्ठल मंदिरात


“नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वस्व फुटो पाहे ।।
हरिणीचे पाड व्याघ्रे धरियले
। मजलागी जाहले तैसे देवा ।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
। धावे वो जननी विठाबाई ।।
मोकलूनी आस, झाले मी उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयास ।।

हे भजन म्हणत पांडुरंगाचा धावा केला होता. तसेच पांडुरंगा मी माझ्या सर्व इच्छा सोडल्या आहेत. तू असा माझा अंत पाहू नकोस असे म्हणू लागली. शेवटी कान्होपात्राची ही विनवणी फळाला आली आणि कान्होपात्रेचे शुद्ध हरपले. आणि विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले डोके तिने वर केलेच नाही. तसाच तिने विठ्ठलाच्या चरणी आपला प्राण सोडला. जेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने हे पाहिले तेव्हा कान्होपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिण दिशेला त्याने पुरले. आणि चमत्कार म्हणजे त्या जागेवर लगेच तरटीचे  झाड उगवले.

आजही ते तरटीचे झाड त्या ठिकाणी आहे. ते झाड विठ्ठल मंदिराच्या आवारात आहे. असे कान्होपात्राचे मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले. आजवर विठ्ठल मंदिरा च्या आवारात महाराष्ट्रातील फक्त एकाच संतांची समाधी आहे आणि ती म्हणजे संत कान्होपात्रेची. विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या संत कान्होपात्रा विषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी. परंतु ते लिहून ठेवणारं कुणी नव्हतं. त्यामुळे त्यांचं खूप कमी काव्य उपलब्ध आहे. पण त्यांचं जे जे काही अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठलभक्तीच्या आविष्काराने आपण अक्षरश: दिपून जातो.

Leave a Comment