संत कबीर | Sant Kabir

 संत कबीर ( Sant Kabir ) यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीतील हाल या गावी सन १३९८ मध्ये  एका ब्राह्मण विधवेच्या पोटी झाल्याचे सांगितले जाते. तिला त्याचा जाहीरपणे संभाळ करणे शक्य नाही म्हणून तिने एका लाकडी पेटीत त्याला घालून सरोवरामध्ये सोडून दिले. तिथे निरू आणि निमा नावाचे एक मुस्लिम दांपत्य येते त्यांना ती पेटी सापडते. त्यांना स्वतःचे मूलबाळ नसल्याने तेच कबीरांचे शेवटपर्यंत पालन पोषण करतात. असे एका कथेत सांगितले जाते. परंतु काहींच्या मते संत कबीर हे पूर्ण परमात्मा असून ते अविनाशी आहेत.त्यांना जन्म आणि मृत्यू नाही.

असे संत ज्ञानेश्वर महाराजही सांगतात तसेच संत नामदेवांना कबीरांनी नाम दीक्षा देऊन त्यांना मोक्ष प्रदान केल्याचे सांगितले जाते. असे संत धर्मदास लिखित संत कबीर सागर या ग्रंथामध्ये सांगितले आहे. त्यांच्या जन्म आणि मृत्यू बद्दल अशी मत मतांतरे आपणास पहावयास मिळतात. परंतु त्यांचे कार्य हे स्पष्टच आहे. पुरोगाम्यांचेही पुरोगामी म्हणजे संत कबीर, विद्रोह्यांचेही विद्रोही  म्हणजे संत कबीर, बुद्ध, नाथ,सुपी या सगळ्या विद्रोह्यांची परिमिती म्हणजे संत कबीर, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा बेस म्हणजे संत कबीर असे त्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे.

ते उच्च कोटीचे साधक, प्रख्यात समाज सुधारक, आणि आदर्श कवी होते. असे फार मोठे आणि महान समजले जाणारे संत कबीर काळाच्याही पुढे असणारे म्हणून ओळखले जायचे. सर्व संतांमध्ये श्रेष्ठ गुरु म्हणून त्यांना मानले जात होते. तसेच धर्माची अतिशयोक्ती व अंधश्रद्धा यावर कडक टीका करणारे ते एक पुरोगामी संत होते. ते मानव जातीचे पुजारी होते. संत कबीरांकडे  कुठल्याही प्रकारचा धर्म, पंथ किंवा जातीभेद नव्हता व असा भेद करणाऱ्यांवर ते कडक टीका करायचे.

सर्वांनी सुखा समाधानाने जगावे, मानव जातीत मतभेद नसावेत, सर्व धर्मीय एकत्र असावेत  असे त्यांना वाटायचे व त्यावर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यामुळे त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे श्रेय मिळते. त्यांची भक्ती इतकी थोर होती की ते धर्मापलीकडील परब्रम्ह स्वरूप परमेश्वराला जाणत होते. तसेच तो निर्गुण निराकार आहे असे ते सांगायचे. संत रोहिदास हे संत कबीरांना आपला मोठा भाऊ मानायचे. त्यांनी उत्तर प्रदेशापेक्षा मध्य प्रदेशामध्ये जास्त कार्य केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशापेक्षा मध्य प्रदेशामध्ये कबीरपंथी लोक जास्त आढळतात. तसेच त्यांनी राजस्थान,हरियाणा,गुजरात, पंजाब ते पाकिस्तान पर्यंत कार्य केले.

त्यामुळे त्यांचे गायक आणि अभ्यासक जगभर आपणाला पाहावयास मिळतात. काशी मध्येही त्यांनी अनेक वर्ष कार्य केले व काशीमधील रामानंद स्वामी हे त्यांचे गुरु सांगितले जातात तसेच सिद्ध,गोरखनाथ, गहिनीनाथ, दादू, नानक,पिपा व हजारी प्रसाद द्विवेदी यांच्याकडूनही ते प्रभावित असल्याचे सांगितले जाते. पुढे रामानंदांच्या संगतीत त्यांनी राम आणि  रहीम ऐक्य साधण्याचे काम केले. मुसलमान व हिंदू मध्ये  एक भावना निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे त्यांना हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतिक मानले जाते. सर्व लेकरे एकाच परमात्म्याची आहेत असे ते नेहमी सांगत असत आणि हाच उपदेश करत त्यांनी भारतभर ब्राह्मण केले. देवाची भक्ती ही दुसऱ्यांना त्रास न देता करायची असते असे ते सांगायचे. असे सांगताना ते त्यांच्या दोहात सांगतात की,


 सहज मिले हो पाणी हैl 
  मांग से मिले ओ दूध है l
  खिंच के ले ओ खून है l


 पुढे ते कपड्यांचे विणकाम करू लागले. वस्त्र विणकाम करत असतानाच ते भजन करायचे, दोहे गायचे, तसेच कविता लिहायचे. देवावर त्यांचा फार विश्वास होता. एकदा त्यांचा बिनकामाचा धंदा होईना म्हणून ते आपल्या कामावर बसलेले असताना त्यांच्याकडे एक भिकारी वस्त्र मागण्यासाठी आला. त्यांनी विणकाम करून ठेवलेले वस्त्र त्यांना विकायचे होते परंतु त्यांनी ते वस्त्र त्या भिकाऱ्यास दान केले.

संत कबीरांचे दोहे आजही देशभर गायले जातात. त्याचप्रमाणे त्याचे पद्य आणि कविता फार प्रचलित आहेत. त्यांनी अनेक हिंदू देवतांवरील केलेले दोहे,विधाने,पदे आजही आपणासाठी उपलब्ध आहेत. त्यांचा मृत्यू इस 1598 मध्ये मगहर मध्ये झाल्याचे सांगितले जाते. आणि हे स्वतः त्यांनीच लिहून ठेवल्याचे सांगितले जाते.


  सकल जनम शिवपुरी गवांया l
  मरती बार मगहर उठ आया ll 


संत कबीर यांचे 8 प्रसिद्ध दोहे जीवनाचे खरे ज्ञान देतात-

  1. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।

कबीरदास इतरांना उद्देशून सांगतात जेव्हा मी दुसऱ्यांमध्ये  वाईट पहात असताना मला कोणीही वाईट दिसले नाही परंतु स्वतःच्या मनाला जेव्हा विचारले तेव्हा माझ्या इतका वाईट कोणीही नाही असे वाटले.
 

2. पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।

पोथी पुराने वाचून तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही त्यापेक्षा प्रेम या अडीच अक्षरापासून तुम्ही जगाचे ज्ञान घेऊ शकता व पंडित होऊ शकता.
 

3. माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,
कर का मनका डार दे, मन का मनका फेर।

हातातील माळा फिरवत आपल्या मनातील भाव बदलू शकत नाही अशा व्यक्तींना कबीर सांगतात माळा फिरवायचे सोडून मनातील विचारांचे फेर विचार करा.
 

4 . जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।

कबीरदास सांगतात साधूच्या जातीला महत्व नसून त्यांच्यामध्ये असलेल्या ज्ञानाचे महत्त्व मोठे आहे ज्याप्रमाणे तलवारीची म्याण महत्त्वाची नसून तलवार कशी आहे हे महत्त्वाचे.
 

5. निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय,
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।

 नेहमी निंदा करणाऱ्याला आपल्या सोबत ठेवा ते लोक आपल्यातील दोष दाखवत असतात त्यामुळे आपण आपल्या चुका सुधारून निर्मळ होतो.
 

6 बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर ॥
 यामधून कबीरदास म्हणतात. जर परोपकार केला नाही  तर फक्त मोठे होऊन काही उपयोग नाही. जसे खजुराचे झाड उंच वाढल्याने ते प्रवाशांना सावली देत नाही आणि त्याचे फळही फार उंचावर असतात.
 

7 कबीरा खड़ा बाज़ार में, मांगे सबकी खैर,
ना काहू से दोस्ती, न काहू से बैर।
मी कबीर या संसाररुपी बाजारात उभा असून मला कोणाविषयी दोस्ती नाही किंवा कोणाशी माझे वैर नाही मी सगळ्यांसाठी चांगलेच मागतो .

8 ऐशी वाणी बोलिये,मनका आया खोय l
 आवरून को शीतल करे, आपहूं शीतल होय ll

संत कबीर म्हणतात दुसऱ्याबद्दल कठोर वाणीने बोलू नका. त्यांना बरे वाटेल असेच बोला त्याने आपल्याही मनाला शांती मिळते.
   असे त्यांचे अनेक दोहे मानवजातीला प्रबोधन करणारे आहेत.

Leave a Comment