संत गोस्वामी तुलसीदास | Sant Goswami Tulsidas

संत तुलसीदास ( Sant Goswami Tulsidas ) यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील चित्रकूट जिल्ह्यामध्ये राजापूर येथे इस 1497 मध्ये शके 1554 विक्रम सावंत म्हणजे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात सातव्या दिवशी गंगा नदीच्या काठी एका छोट्याशा गावात रामानंद संप्रदायाच्या एका कुटुंबात झाला होता.

त्यांच्या आईचे नाव हुलसीदेवी आणि वडिलांचे नाव पंडित आत्माराम दुबे असे होते. तुलसीदास यांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी ते रडले नाहीत तर त्यांनी राम हा शब्द उच्चारला म्हणून त्यांना “रामबोला” असे म्हटले जाते. एक दिवस त्यांचे वडील पंडित आत्माराम दुबे आपल्या मित्रासोबत घराच्या बाहेर चिंताग्रस्त बसलेले होते. त्यांचे मित्र त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगून काळजीतून त्यांचे मन वळवून त्यांना चिंतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

कारण आत्माराम यांच्या पत्नीची त्यादिवशी प्रसुती होणार होती. त्या क्षणी घरातून एक स्त्री येऊन पंडितजींना सांगते की तुम्हाला मुलगा झाला आहे परंतु तुमची पत्नी बेशुद्ध आहे. अशी बातमी ऐकून पंडितजी आपल्या पत्नीसाठी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवात करतात परंतु तरीही त्यांची पत्नी हुलसीदेवी मरण पावते. त्यावेळी पंडितजी एका ज्योतिष्याला बोलून बाळाचे ग्रह नक्षत्र तपासतात.

त्यावेळी ज्योतिषी सांगतात या बाळाचे ग्रह नक्षत्र ठीक नाहीत. हे बाळ पूर्ण परिवाराच्या नाशाचे कारण बनेल. तुम्ही याला कुठेतरी सोडून द्या. पंडितजी त्या ज्योतिषाला म्हणतात की बाळाला कोठेतरी सोडून देणे योग्य आहे का ? ज्योतिषी म्हणतो असे बाळ काय कामाचे जे जन्मताच आपल्या आईला खाते.

तसेच त्याच्या ग्रह नक्षत्रानुसार हे तुम्हाला सुद्धा खाऊन टाकेल. ज्योतिषाच्या सांगण्यावरून पंडितजी घाबरून जाऊन या बाळाचा त्याग करतात. परंतु त्यांच्या पत्नीची प्रसुती करणाऱ्या स्त्रीला त्या बाळाची फार दया येते. त्यामुळे ती त्या बाळाला आपल्या सोबत घेऊन जाते. साऱ्या गावाला या ज्योतिषाच्या भविष्यावर विश्वास होता. त्यामुळे त्या स्त्रीला गावातील अनेक लोक सांगत होते तरीही ती स्त्री त्या बाळाला अखेर आपल्याकडे घेऊन जाते. त्या बाईच्या घरचे बाळाला पाहून तिला दोष देऊ लागतात.

परंतु सर्वांना ती विनंती करते की या बाळाच्या पित्याने त्याचा त्याग केला आहे.आता तो अनाथ झाला आहे. ईश्वर कृपेसाठी कृपया मला या बाळाचा सांभाळ करू द्यावा. त्या बाईचे पतीही तिच्यावर खूप रागावतात. तरीही ती आपल्या पतीला विनंती करते की या अनाथ बाळाला आपला पुत्र म्हणून आपण सांभाळू. पुढे दहा दिवसांनी तिचा पती पंडित आत्माराम यांना म्हणतात की खरेच हा मुलगा फार अमंगल आहे. पुढे काही दिवसातच तो मुलगा दहा वर्षाचा असताना त्या स्त्रीला सर्पदंश होतो आणि त्या बाळाचा संभाळ करणारी ती स्त्री मरण पावते.

मग मात्र त्या स्त्रीचा पती त्या मुलाला घरातून बाहेर काढतो. मग हा मुलगा घराबाहेर दूर जाऊन एका झाडाखाली झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला फार भूक लागते म्हणून तो एका व्यक्तीच्या घरी जाऊन दरवाजा वाजवतो. त्या घरची बाई बाहेर आल्यानंतर तो तिला जेवण मागतो. ती बाई घरात त्याच्यासाठी दूध आणायला जाते परंतु दुसरी शेजारीन तिला सांगते की मुल फार दुर्भागी आहे. जो कोणी याला मदत करेल किंवा सांभाळेल ती व्यक्ती मरण पावते.

त्यानंतर हा मुलगा पण म्हणतो की मी यापुढे कधी भीक मागणार नाही. परंतु भूक लागल्यानंतर त्याला दुसऱ्या दरवाजावर जाऊन भीक मागावीच लागत असे.परंतु तो कुठेही गेला तरी लोक त्याला आत्मारामचा मुलगा म्हणून भीक घालत नव्हते. पुढे हा मुलगा गावातील एका मंदिरात जाऊन मुक्काम करतो. नेमके त्याच दिवशी मंदिरात बाबा हरिदास येतात. आणि त्या मुलाविषयी चौकशी करतात.

मग मंदिराचे पुजारी त्यांना सांगतात हा आत्माराम पंडितांचा दुर्भागी मुलगा आहे. तसेच वाईट नक्षत्रावर याचा जन्म झालेला असून याचा कोणी सांभाळ केल्यास ती व्यक्ती मरण पावते. हे ऐकून बाबा नरहरी दासांना या मुलाची दया येते. मग ते या मुलाला म्हणतात ऐक मुला प्रभू श्रीराम हे सर्वांचे रक्षक आहेत. तू त्यांना शरण का जात नाहीस. मुलगा त्यांना विचारतो श्रीराम कोठे असतात. त्यांना मी कसे भेटू.

मग बाबा नरहरी दास त्याला आपल्याबरोबर घेऊन जातात आणि प्रथम त्याला “ श्रीराम जय राम जय जय राम “ हा मंत्र शिकवतात. त्यानंतर तो मुलगा बाबा नरहरी दास यांची प्रत्येक गोष्ट मानू लागतो. नंतर बाबा नरहरी दास त्याला आपला शिष्य बनवून घेतात. तेव्हापासून तो आपल्या गुरुचे चरण स्पर्श केल्याशिवाय कोणतेही काम करत नसे. शिष्य झाल्यानंतर त्या मुलाचे नाव बाबा नरहरी “रांगोला” असे ठेवतात. पुढे बाबा नरहरी त्या बालकाला नेहमी प्रभू श्रीरामाच्या कथा ऐकवतात.

हा मुलगा प्रभू श्रीरामांच्या कथा ऐकून फारच प्रसन्न होत असे. तसेच पुढे तो स्वतः या कथा वाचण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याला हे वाचन करणे फार कठीण जात असे. म्हणून बाबा नरहरी त्याला वाराणसीचे आचार्य श्री गुरु शेष सनातन यांच्याकडे घेऊन जातात. वाराणसी येथे गेल्यानंतर बाबा आचार्य यांना या मुलाला शिष्य करून घेण्याची विनंती करतात. त्यांच्या विनंतीवरून आचार्य सनातन या मुलाला आपला शिष्य बनवून घेतात व त्याला शिक्षण देण्यास सुरुवात करतात. पुढील दहा वर्षात हा मुलगा आचार्य गुरु शेष सनातन यांच्याकडून वेद,पुराण, धार्मिक ग्रंथ आणि शास्त्र विद्येचे शिक्षण ग्रहण करतो.

एक दिवस आचार्य गुरु शेष सनातन शिष्य रांगोला याला म्हणतात की, बस आता तुझे शिक्षण पूर्ण झाले. रांगोला म्हणतात आपल्यामुळे मी मनुष्यासारखे जीवन जगायला लागलो आहे. मला आज्ञा द्या. मी आपली काय सेवा करू शकतो. आचार्य सनातन त्याला म्हणतात आता तू जा या पृथ्वीवर श्रीराम यांच्या महिमेचा प्रचार करा. रांगोला म्हणतात गुरुदेव हे तर माझे परम कर्तव्य आहे.

आचार्य सनातन म्हणतात हे कर्तव्य पार पाडण्यासोबत तू गृहस्थ बन. त्यानंतर रांगोला आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार आपल्या जन्मगावी जाऊन अत्यंत भक्ती भावाने राम कथा सांगू लागतात. त्यानंतर लोक त्यांना “तुलसीदास” नावाने ओळखू लागतात. लवकरच त्यांची ख्याती आजूबाजूच्या दूरवर परिसरात पोहोचते. येथे जवळच असलेल्या गोंडा जिल्ह्यात नारायणपूर गावात पराशर ब्राह्मण दीनबंधू पाठक राहत होते. त्यांच्या घरी एक दिवस एक व्यक्ती येऊन सांगतो की, त्यांची मुलगी रत्नावली हिच्यासाठी तुलसीदास यांच्यासारखा वर कुठेही मिळणार नाही.

मग पाठक दिन बंधू त्याला म्हणतात की, असे ऐकले आहे की तुलसीदास फार गरीब आहे. मग तो व्यक्ती त्यांना म्हणतो की ब्राह्मणाचे सर्वात मोठे धण “व्यक्ती ज्ञान” असते. आणि तुलसीदास ज्ञानाचे भंडार आहेत. त्यामुळे तुमच्या मुलीसाठी हा वर योग्य आहे. त्या व्यक्तीचे हे वैचारिक मोलाचे शब्द ऐकून पाठक दिन बंधू या लग्नासाठी तयार होतात. पुढे लवकरच तुलसीदास यांचा रत्नावलीशी विवाह संपन्न होतो. तुलसीदास आपल्या पत्नीवर अपार प्रेम करत होते. त्यामुळे रत्नावलीच्या मैत्रिणी तिला नेहमी चिडवत असायच्या. एक दिवस घरामध्ये रत्नावली फार रागात होती.

तुलसीदास ( Tulsidas ) यांनी विचारले आज काय झाले तुला. ती म्हणाली माझ्या मैत्रिणी म्हणतात की माझ्या मैत्रिणी म्हणतात तुम्ही माझ्यावर फार प्रेम करता,तुम्ही माझ्यावर काहीतरी जादू केली आहे. तुळशीदास म्हणतात हो केली आहे काय झाले. रत्नावली म्हणाली तुम्ही फक्त प्रेमात गुरफटले आहात. तुमच्या गुरुंनी प्रभू श्रीराम यांचा प्रचार करण्याचे काम विसरलात का? तुलसीदास आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून गंभीर होतात. काही दिवसांनी रत्नावलीच्या माहेरुन तिच्या घरचा एक व्यक्ती रत्नावलीला माहेरी घेऊन जाण्यास येतो. रत्नावली त्याला म्हणते माझे पती आल्याशिवाय मी माहेरी येऊ शकत नाही.

ते एक-दोन दिवसांसाठी बाहेर गेलेले आहेत. तो व्यक्ती म्हणतो की उद्या भाऊबीज आहे. त्यामुळे उद्या तुझी तेथे कमी दिसेल. त्यानंतर रत्नावली आपल्या माहेरी जाण्यास तयार होते. परंतु जाण्या अगोदर तुळशीदास यांना एक पत्र लिहून ठेवते. त्या पत्रात मी लवकरच येईल असे लिहिलेले होते. परंतु तुलसीदास यांना रत्नावली शिवाय राहवत नसल्याने ते थेट तिच्या माहेरी जाऊन बायकोला घेऊन आले.

पुढे पत्नीच्या पाठिंब्यामुळे तुलसीदास अनेक वर्ष वाराणसी आणि अयोध्या परिसरात राम भक्ती आणि राम महिमेचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यामुळे ते फारच प्रख्यात झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत वाराणसी येथील गंगा नदीच्या पुलाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. वाराणसी येथील हनुमान मंदिरात त्यांना राम दर्शन घडल्यामुळे आजही तेथे तुलसीदास अदृश्य स्वरूपात उभे आहेत असे म्हटले जाते. हिंदी साहित्य मध्ये एक महान कवी म्हणून तुलशीदास यांची ओळख आहे. त्यांनी भारत भ्रमण केले होते.

अनेक साधुसंतांच्या भेटी घेऊन त्यांनी त्यांच्या ज्ञानात अधिकच भर टाकली होती. पुढे बद्रीनाथ, द्वारका, पुरी,रामेश्वरम आणि तिबेट मानसरोवर अशा ठिकाणी त्यांना साक्षात भगवंताचे दर्शन घडल्याचे सांगितले जाते. त्यांच्या ग्रंथात ते हनुमंतराय आणि श्रीराम यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचे सांगतात. त्याचप्रमाणे तुलसीदास यांना वाराणसी मध्ये माघ मेळ्याच्या दरम्यान एका वडाच्या झाडाखाली याज्ञवल्लक्य आणि भारद्वाज ऋषी यांचे दर्शन घडले होते.

तसेच येथे तुलसीदासांनी याज्ञवल्लक्य आणि भारद्वाज ऋषींना रामचरित मानस ऐकवले होते. तसेच तुलसीदास यांच्यामध्ये अनेक चमत्कार घडवून आणण्याची शक्ती होती. एकदा असेच त्यांनी एका मृत ब्राह्मणाला पुन्हा जिवंत केल्याची कथा सांगितली जाते. तसेच एका मुघल सम्राट आणि तुलसीदासांना फतेहपूर सिक्री येथे कैद करून नमन करण्यास सांगितले. यावेळी अनेक वानर एकत्र येऊन त्यांनी रक्षकांना ओरबाडले आणि तटबंदी वरून दगडफेक केली. तुलसीदासांना कैदेतून मुक्त केल्यानंतर वानर सेना तिथून निघून गेली. त्यावेळी तो सम्राट त्यांच्यापुढे नतमस्तक झाला होता.

संत तुलसीदास यांनी वाराणसीच्या प्रल्हाद घाटावर अनेक कविता लिहिल्या तसेच त्यांना काशी विश्वेश्वर मंदिराजवळ शिव आणि पार्वती यांनी दर्शन देऊन आशीर्वाद दिल्याचे सांगितले जाते. तसेच शिवपार्वतीने त्यांना अयोध्येला जाऊन कविता लिहिण्याची आज्ञा केली होती. शिव पार्वतीने तुमच्या कविता सामवेदाप्रमाणे फलदायी ठरतील असे त्यांना आशीर्वाद दिले होते.त्यानंतर तुलसी दासांनी अनेक म्हणी आणि कवितांच्या रचना केल्या.पुढे इस 1574 मध्ये चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या आठ दिवसानंतर रामनवमीच्या दिवशी त्यांनी रामचरितमानस स्वतः लिहिण्यास सुरुवात केली होती.

पुढे दोन वर्ष,सात महिने व 26 दिवसात हे महाकाव्य त्यांनी पूर्ण केले. हे महाकाव्य त्यांनी पूर्णत्वास आणलेला दिवस विवाह पंचमीचा म्हणजे प्रभू श्रीराम आणि माता सीता देवी यांच्या लग्नाचा दिवस होता. पुढे संत तुलसीदास यांनी शिव पार्वती म्हणजे विश्वनाथ आणि अन्नपूर्णा देवी यांना काशी विश्वनाथ मंदिरात रामचरितमानस वाचून दाखवला. संत तुलसीदास यांनी रामचरितमानस याबरोबर रामलाला नहच्छू, बरवाई रामायण, पार्वती मंगल म्हणजे पार्वती देवीचे लग्न , जानकी मंगल म्हणजे जानकी देवीचे लग्न आणि रामग्य प्रार्थना अशा महत्त्वाच्या ग्रंथ रचना केल्या.

त्याबरोबरच कृष्ण गीतावली, साहित्य रत्न, दोहावली, वैराग्य सांदीपनी आणि विनय पत्रिका ( Vinay Patrika )अशा अनेक काव्यरचना त्यांनी केल्या. शेवटच्या काळात म्हणजे इस 1607 नंतर संत तुलसीदास यांनी “हनुमान बाहुकची” आणि “ विनय पत्रिका”या ग्रंथाची रचना केली.हनुमान बाहुकची मध्ये त्यांनी त्यांच्या आजाराची आणि दुःखाची नोंद केल्याचे आढळते. तसेच विनय पत्रिका मध्ये कलयुगाकडून त्यांना झालेल्या त्रासाची नोंद आढळते. त्यांच्या या ग्रंथांवर साक्षात प्रभू श्रीरामाची स्वाक्षरी आहे असे तुलसीदास म्हणतात.

शेवटी ते 111 वर्षाचे असताना 30 जुलै 1623 मध्ये श्रावण महिन्यात उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये बनारस, अवध सुबा येथील अस्सी घाटात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या तारीख आणि स्थानाबाबतीत निश्चितता आढळत नाही.

Leave a Comment