मराठवाड्यातील पैठण जवळील आपेगाव या ठिकाणी बाराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ. स. १२७५) रोजी झाला होता. काही अभ्यासकांनी आणि संशोधकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj ) सहा पूर्वजांची माहिती मिळवलेली आहे. त्यावरून त्यांचे सहावे पूर्वज हरिहर पंत सांगितले जातात. त्याचप्रमाणे अनुक्रमे रामचंद्र पंत,गोपाळ पंत,त्रिंबक पंत,गोविंद पंत, आणि ज्ञानेश्वरांचे वडील हे विठ्ठल पंत असा क्रम सांगितला जातो. तसेच ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्र्यंबक पंत सांगितले जातात.
ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्रिंबक पंत हे इ. स.1129 मधील असून ते यादवांच्या राज्यात संपूर्ण बीड परगण्याचे सुभेदार होते. त्यांचा धाकटा मुलगा हरिहर पंत हा यादवांच्या सैन्यामध्ये मृत्यू पावल्यामुळे त्र्यंबक पंतांना वैराग्य आले होते. आणि त्याच दरम्यान त्यांची गोरक्षनाथांशी प्रत्यक्ष भेट झाली होती. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांचा त्यांनी अनुग्रह घेतला आणि आपेगाव या गावांमध्ये सध्या त्यांची समाधी पाहायला मिळते. पुढे कुलकर्णी पद चालवणाऱ्या गोविंदपंत या त्यांच्या मुलाने गहिनीनाथांकडून दीक्षा स्वीकारली. विठ्ठल पंत हे ज्ञानेश्वरांचे वडील होते.
त्यांच्या पूर्वजांवरून ज्ञानदेवाचं कुटुंब हे सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या सुखी कुटुंब होते असे समजते.परंतु विठ्ठल पंतांच्या अंगी बालपणापासूनच वैराग्य असल्यामुळे एक दिवस विठ्ठल पंत हे तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले आणि तीर्थयात्रा करत असताना आळंदी गावी त्यांचा एक मुक्काम झाला.त्या मुक्कामादरम्यान त्यांना त्यांची सहधर्मचारीनी रुक्मिणी म्हणजे ज्ञानदेवांच्या आई भेटल्या. म्हणजे त्यावेळी त्यांच्या सासर्यांनी त्यांना पाहिलं आणि या तेजस्वी पुरुषाला आपण आपली मुलगी दिली पाहिजे असे त्यांच्या मनामध्ये आलं. मग त्यांनी त्यांची चौकशी केली.
चौकशी केल्यानंतर आपली मुलगी त्यांना दिलीच पाहिजे असा त्यांचा निश्चय झाला. परंतु विठ्ठल पंतांनी लग्नास नकार दिला. माझ्या सध्या असे मनात नाही असे ते म्हणाले. परंतु विठ्ठल पंतांचे सासरे म्हणाले की,मला रात्री विठ्ठलांनी स्वप्नात येऊन सांगितले आहे की तुम्ही याला मुलगी द्या. पांडुरंगाने दिलेल्या स्वप्नांमुळे विठ्ठल पंतांनी त्या मुलीचा स्वीकार केला. विवाह झाल्यानंतर ते म्हणाले मी तीर्थयात्रेवर आहे आणि पुढे पंढरपूरला जायचे आहे. पंढरपूर वरून आल्यावर मी परत रुक्मिणीला घेऊन जातो.
सासरे म्हणाले ठीक आहे मीही पंढरपूरला येतो. मग सहपरिवार सर्वजण पंढरपूरला आले. विठ्ठलाच्या दर्शनानंतर परत विठ्ठलपंत आळंदीला आले आणि पत्नीला घेऊन आपेगावला गेले.पुढे काही दिवसानंतर त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबात मूळचेच वैराग्य असताना अशा परिस्थितीत कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचे वैराग्य वाढले मग हे सर्व पाहून त्यांचे सासरे सिद्धेश्वर पंत त्यांच्याकडे भेटण्यास आले आणि त्यांना म्हणाले की येथे तुमचा निर्वाह होणे शक्य नाही म्हणून ते त्यांना आळंदीला घेऊन गेले.
सिद्धेश्वर पंत यांच्याकडे आळंदी आणि चाकण सह 24 गावांचे कुलकर्णी पद होते. आळंदीला आल्यानंतरही बरेच दिवस त्यांना मूलबाळ नव्हते. विठ्ठल पंतांच्या पदरी मूळचेच वैराग्य असल्यामुळे आणि त्यात मूलबाळ नाही म्हणून त्यांनी संन्यास घेण्याचा विचार केला. त्या काळात पत्नीला विचारल्याशिवाय संन्यास घेता येत नसे. ते सातत्याने पत्नीला विचारत होते आणि एक दिवस बेसावधपणे रुक्मिणीच्या तोंडातून होकार गेला आणि हीच आज्ञा समजून विठ्ठल पंत काशीला गेले. काशीमध्ये त्यांनी एका आश्रमामध्ये श्रीपाद या गुरूंचे शिष्यत्व स्वीकारले. आणि संन्यास स्वीकारला.एकदा जेव्हा विठ्ठल पंत यांचे गुरु आळंदी दर्शनाला गेले होते.तेव्हा त्यांची रुक्मिणीशी भेट झाली तेव्हा त्यांनी तिला “पुत्र सौभाग्यवती भव “असा आशीर्वाद दिला.
मग तिने सांगितले की माझे मालक नाही ते संन्यास घेऊन कुठेतरी गेले आहेत त्यांनी तिच्यासोबत विचारपूस केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडे येऊन ज्या मुलाने संन्यास घेतला तो हाच असावा. मग त्यांनी सिद्धेश्वर पंताला काशीला नेहून श्रीपाद यांनी त्यांना दरडावून विचारले की तू मला खोटे का सांगितले आणि म्हणाले की तू परत जा आणि संसार कर मी रुक्मिणीला मुल होण्यासाठी आशीर्वाद देऊन आलेलो आहे.गुरुची आज्ञा आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद वाया जाऊ नये म्हणून विठ्ठल पंत परत आळंदीला आले. पुढे त्यांना दोन अडीच वर्षांच्या फरकाने निवृत्तीनाथ,ज्ञानदेव, सोपान, आणि मुक्ताबाई अशी चार आपत्ये झाली.ज्ञानदेवांचा जन्म 1296 मध्ये सांगितला जातो.
त्यावेळी विठ्ठल पंतांना वाळीत टाकलेले होते. गावाबाहेर नदी काठी झोपडी बांधून तेथे ते राहत होते. वाळीत टाकल्यामुळे त्यांनी गावातील लोकांशी संपर्क ठेवायचा नाही,बोलायचे सुद्धा नाही आणि त्यांच्याशी कसलाच व्यवहार करायचा नाही. अशी गावाकडून त्यांना वागणूक मिळत होती. अशा परिस्थितीत त्या एकांताचा विठ्ठल पंतांनी इतका उपयोग करून घेतला की त्या एकांतामध्ये आपल्या या छोट्या मुलांकडून संपूर्ण विद्याशास्त्र त्यांनी पारंगत करून घेतले. त्यामुळे इतक्या लहान वयातच ज्ञानेश्वरांचा अध्यात्मिक अभ्यास झाला. त्यांचा अध्यात्मिक अभ्यास पूर्ण होईपर्यंत त्यांच्या कुटुंबाला कोणाचाही त्रास नव्हता.
तसेच त्यांच्या वडिलांनी तोपर्यंत सर्व तीर्थयात्रा केलेल्या होत्या. परंतू मुलांच्या मुंजेचे वय झाल्यामुळे आणि समाजाने त्यांना वाळीत टाकल्यामुळे ते व्यथित होते. ते कशालाच विरोध करत नव्हते. धर्मशास्त्राप्रमाणेच आहे ना मग माझे मी भोगतो असे ते म्हणायचे. एकदा पश्चाताप म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन त्रंबकेश्वर च्या डोंगराला प्रदक्षिणा घातल्या. पुन्हा परत आल्यानंतर मुलांच्या मुंजेचा प्रश्न मांडला.
मला वाळीत टाका परंतु माझ्या मुलांना पदरात घ्या असे ते विनवणी करायचे परंतु त्यांना शेवटी सांगण्यात आले की तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल तुम्ही संन्यास घेऊन पुन्हा संसार उभा केला आहे त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला देहांताचे प्रायश्चित्त स्वीकारावे लागेल.एका रात्री विठ्ठल पंतांनी रुक्मिणीला सोबत घेऊन गंगेत उडी मारून दोघांनीही देहांत प्रायश्चित्त स्वीकारले. आपली मुले मुक्त होण्यासाठी त्यांनी हे केले. परंतु त्यानंतरही आळंदीतील ब्रह्मवृद्धांनी त्यांच्या मुलांना मुंजेची परवानगी दिली नाही. परत ते म्हणू लागले विठ्ठल पंतांनी त्यांच्या कर्माचे प्रायश्चित्त भोगले आहे. तुम्हाला मुंजेचा अधिकार मिळू शकत नाही.
हवे तर तुम्ही पैठणला जाऊन तेथील धर्मपिठांचे संमती पत्र घेऊन या मग आम्ही तुमची मुंज करू. चौघे पैठणला जाऊन तेथील धर्म पिठाचे धर्मगुरू यांना त्यांनी प्रमाणपत्राची विनंती केली परंतु त्यांनीही त्यांना परवानगी दिली नाही.उलट त्या चौघांची तेथील लोकांनी चेष्टा करण्यास सुरुवात केली. ज्ञानदेवाच्या तोंडून त्यांच्या ज्ञानाप्रमाणे सर्वांनभोंवती ईश्वर असतो, तुम्ही असे करू नये. असे वाक्य येताच तेथील ब्रह्मवृंद असे म्हणाले की तू म्हणतोस ना सर्वांमध्ये ईश्वर असतो तर एक रेडा चाललेला असताना त्याच्याकडे बोट दाखवत या रेड्यांमध्ये ईश्वर आहे का? असा ज्ञानदेवांना प्रश्न केला. ज्ञानदेव म्हणाले हो आहे की.
ते म्हणाले तो वेध म्हणेल का? ज्ञानदेव म्हणाले हो म्हणेल की. आणि या कथेत सांगितल्याप्रमाणे तेथेच ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या तोंडून वेद वधून घेतले. आणि त्यानंतर त्या धर्मविद्यापीठामधून त्यांना मान्यता मिळाली की तुम्ही देव आहात परंतु तरीही तुम्हाला ब्राह्मणांमध्ये येण्याची मान्यता दिली जाऊ शकत नाही. आणि त्यांना तरीही मुंजी करण्याची परवानगी नाकारली.
पुढे ज्ञानदेवांनी पैठण मध्ये राहूनच काही दुर्मिळ पोथ्यांचे अध्ययन केले. पुढे कीर्तन प्रवचने केली. नंतर हळूहळू ज्ञानेश्वरांची कीर्ती वाढू लागली. हा सगळा ऐवज घेऊन भावंडासोबत ज्ञानेश्वर परत आळंदीला निघाले. त्यांच्यासोबत एखाद्या दिंडी सारखा प्रचंड समुदाय पैठणहून निघाला. मग त्यांची ही वाढलेली कीर्ती पाहून अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले. त्यांनी रेड्याच्या तोंडून एकमुखी वेद वधून घेतल्याची चर्चा सर्वत्र पसरली. आणि त्यांच्याविषयी जनजागृती झाली. त्यानंतर हळूहळू त्यांच्या भावंडांची कीर्तने, प्रवचने, विद्वत्ता,व्याख्याने याचीही कीर्ती पसरली. ते जेव्हा पैठण वरून अहमदनगर मधील नेवासा या ठिकाणी आले तेव्हा तिथे आणखीनच मोठा जनसमुदाय जमायला लागला.
त्यावेळी लोकांनी संत ज्ञानेश्वरांना सांगितले की तुम्ही आमच्यासाठी कीर्तने, प्रवचने करा आणि तिथेच पहिल्यांदा “ज्ञानेश्वरीचा “ जन्म झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा येथेच लिहिला असून त्या ग्रंथाची निर्मिती तेथील त्यांच्या मंदिरात झाली आहे. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो पैशांचा खांब आजही तेथे आहे . ज्ञानेश्वरी प्रमाणेच त्यांनी “अमृतअनुभव “हा ग्रंथही तेथेच लिहिला होता. त्याच ठिकाणी ज्ञानदेवांनी प्रवचने, कथा, कीर्तने करता करता ग्रंथ लिखाण केले आणि अजूनच ज्ञानदेवांची कीर्ती वाढत गेली. कालांतराने ते आळंदीच्या प्रवासाला निघाले.
प्रवासात जुन्नर तालुक्यातील आळेफाटा नावाचे एक गाव आले त्या आळेफाटा गावी त्यांचा एक शिष्य ज्या रेड्याच्या तोंडून वेद वधवले होते त्या रेड्याला घेऊन आला होता. तो रेडा आळेफाटा याच ठिकाणी मृत्यू पावला आणि त्या रेड्याची समाधी या ठिकाणी अजूनही आहे. पुढे आळंदीला पोहोचेपर्यंत ज्ञानदेवांची कीर्ती खूप वाढलेली होती.
हे सर्व बघून जुन्या काही मान्यताप्राप्त लोकांना सहन होत नव्हते. म्हणून असे लोक त्यांच्या द्वेश करत होते. तेथे चांगदेव नावाच्या हट्टयोगी यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिले होते. त्या पत्राचे उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी “चांगदेव 65 वी” नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच चांगदेवांनी ज्ञानेश्वराला आपलं ऐश्वर्य किंवा दबाव दाखवण्यासाठी वाघाच्या पाठीवर बसून आणि हातात सापाचा चाबूक घेऊन भेटण्यासाठी गेले होते. आणि तेथेच ज्ञानेश्वरांनी त्यांचे गर्वहरण करण्यासाठी निर्जीव भिंत चालवली. आणि चांगदेवांचे गर्वहरण झाले मग चांगदेव 65 वी चे लिखाण पूर्ण झाले.
पुढे ज्ञानेश्वरांना पूर्ण भारताची तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. परंतु या तीर्थयात्रेसाठी कुणीतरी संत मिळावा म्हणून त्यांनी सोबत नामदेवांना घेतले. नामदेव म्हणायचे की मला फक्त पंढरपुर पुरेसं आहे. मला बाकीचे तीर्थ पाहण्याची गरज वाटत नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांना पूर्ण जग दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. तेथेच दोघांची समाज आणि परिस्थितीच्या परिवर्तनावर चर्चा झाली. ज्ञानेश्वर ज्ञानाचे देव होते तर नामदेव नामाचे देव होते. पुष्कळदा ज्ञानेश्वरांनी नामदेवांच्या भक्तीचे मोठेपण मान्य केले होते. एका कथेत सांगितले जाते की नामदेवांना राजस्थानच्या वाळवंटामध्ये तीर्थयात्रा करत असताना एकदा खूप तहान लागली होती. जवळ तिथे एक विहीर होती परंतु पाणी फार तळाला होते आणि पाणी काढण्यासाठी पोहराही तिथे उपलब्ध नव्हता.
आता काय करायचे म्हणून ज्ञानदेवांनी मुंगीचे रूप धारण करून विहिरीत गेले. पाणी पिऊन ते वर आले पण नामदेव म्हणाले की मी काय तुमच्यासारखा हट्टयोगी नाही. मग नामदेवानी ईश्वरनामाचा धावा केला. तोपर्यंत विहीर काठोकाठ पाण्याने भरून आली व नामदेव विहिरीतील पाणी प्याले. यावरून ज्ञानदेवांचा हट्टयोग आणि नामदेवांची भक्ती कोणालाही जमणार नाही असे समजते. तेथून आल्यावर त्यांनी पंढरपूर मध्ये माउंद घातलं. तेथील ब्रह्मवृंदांना त्यांनी जेवायला घातले. तसेच या दोघांनी पंढरपूर मध्ये चांगल्या संघटनेची निर्मिती केली.
पुढे आळंदीला माघारी आल्यानंतर सगळीकडे मुस्लिमांची आक्रमणे होत होते. त्याचवेळी अल्लाउद्दीनचे आक्रमण झाले. आणि हिंदूंची सगळी सत्ता रसातळाला गेली. त्यावेळी रामदेव यादव नावाचा राजा होता परंतु तो फार कर्तृत्ववान नव्हता. त्याच्याकडे अमाप संपत्ती असूनही त्याला त्याचे कर्तृत्व दाखवता येत नव्हते. त्यामुळे अल्लाउद्दीनला फार तो प्रतिकार करू शकला नाही. आणि राज्य रसातळाला गेले. हे सगळे पाहिल्यावर ज्ञानदेव आणखीनच उदास झाले. आणि कलियुग पाहण्याची त्यांची इच्छा नाहीशी झाली. असे म्हणून त्यांनी आपले अंतिम ध्येय संपलेले आहे. तसेच आपली सगळी कामे पूर्ण झालेली आहेत.
देशभर तीर्थयात्रा झाल्या. ग्रंथ निर्मिती झाल्या. आता या पृथ्वीतलावर शिल्लक राहून तरी काय करायचे म्हणून त्यांनी त्यांचे बालपण गेलेले गाव, त्यांचे आजोळ असलेले गाव, ज्या ठिकाणी पूर्वी अलंकापुरी शिवपिठ होते. तसेच नाथ संप्रदायाचे केंद्र म्हणजे निळकंठ असलेले गाव “आळंदी “या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेण्याचे ठरवले. आणि त्यांचे वय 21 वर्षे 3 महिने आणि 5 दिवस असताना कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ. स. १२९६, गुरुवार या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली.