पारशी धर्माला झोरोस्ट्रिअनिसम असे दुसरे नाव सुद्धा आहे. पारशी धर्माची ( Parsi Religion ) स्थापना 3500 वर्षांपूर्वी इस्लाम धर्माच्या अगोदर इराण मध्ये झोरोस्टर यांनी केली होती. या धर्मामध्ये अहुरा मज़्दा या देवतेला महत्त्वाचे स्थान असून अग्नीला प्रमुख देवता मानले जाते. पारशी लोकांच्या देवळांना अग्यारी असे म्हणतात, त्या देवळामध्ये अग्नि प्रज्वलित करून ठेवलेला असतो. त्यांच्या कर्म कांडामध्ये अग्नीला फार महत्त्व दिले जाते. मानवाच्या मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरक या स्थानांना मान्यता आहे.
तसेच या धर्मामध्ये पृथ्वी तत्वांना पवित्र मानले जाते. दुनियेतील जनगणनेनुसार फार कमी संख्येने असलेला समुदाय म्हणजे पारशी धर्म परंतु भारत देशात सर्वाधिक पारशी धर्मीय लोक राहतात. पारशी हा शब्द पर्शिया म्हणजे आजचा इराण या एका देशाच्या नावावरून तयार झाला आहे. पारशी धर्म फार जुना असून सुद्धा दिवसेंदिवस या समुदायातील लोकांची संख्या घटत आहे. या धर्माची स्थापना झोरोस्टर यांनी प्राचीन इराण मध्ये केली होती. अनेक वर्षे इराण मधील एक ताकतवार धर्म म्हणून या धर्माची ओळख होती.
त्या काळात इराण वर याच लोकांची सत्ता होती. परंतु सध्या इराण एक मुस्लिम धर्मीयांचा देश बनला आहे. सहाव्या शताब्दी पर्यंत पारशी धर्म इराण मधील प्रमुख आणि ताकतवान धर्म म्हणून राहिला. इराण मध्ये सहाव्या शताब्दी पर्यंत परशियन लोक वाढत होते. त्यानंतर इराण मध्ये इस्लामिक क्रांती झाली. तेव्हापासून मुस्लिम धर्मामध्ये धर्म बदलण्यासाठी विरोध झाला तसेच पार्शियन लोकांना धर्मांतर करून मुस्लिम धर्मात घेतले जाऊ लागले व त्यावेळी धर्मांतरासाठी काही कडक नियम तयार करण्यात आले.
त्यामुळे लोकांवर दबाव तंत्र राहिले. धर्मांतर न करणाऱ्या पार्शियन लोकांना मारले जाऊ लागले. त्यामुळे पर्शीयन धर्मीय लोक इराण मधून इतर देशांमध्ये पलायन करू लागले. तेव्हा जास्तीत जास्त पार्शियन भारत देशात आले. गुजरात जवळील मलसाड मधून जास्तीत जास्त पार्शियन लोक मुंबईमध्ये आले. सध्याही पार्शियन लोकांची जास्तीत जास्त संख्या मुंबईमध्ये आहे. असे मानले जाते की पार्शियन लोकांच्या मेहनतीने मुंबई शहर वसले.
मुंबईमध्ये अनेक मोठ्या वस्त्या आहेत जेथे पार्शियन लोक राहतात. तसेच मुंबईमध्ये पार्शियन जेवण सुद्धा अनेक ठिकाणी मिळते. पारशी धर्मातील लोक उच्चशिक्षित असतात आणि लवकरच ते व्यवसायामध्ये प्रगती करतात. व्यवसायामध्ये मुंबईत अनेक पार्शियन लोकांची खासियत आहे. पर्शीयन धर्मातील लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याची कारणे म्हणजे त्यांच्या धर्मातील नियमावली आहे. त्यांच्यामध्ये होणाऱ्या लग्नविवाहाच्या विशेष नियमामुळे या धर्मातील लोकांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
पारशी धर्मामध्ये लग्नाच्या आधी मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या घरी जातात , एकमेकांसोबत वेळ घालवतात , एकमेकांना समजून घेतात , बाहेर फिरायला जातात आणि जर सगळ्या गोष्टी त्यांना आवडल्या तरच ते लग्न बंधनात अडकले जातात , नाहीतर ते लग्न ठरले जात नाही .ही पद्धत फारशी धर्मामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे . हल्ली इतर धर्मीय सुद्धा त्याचे अनुकरण करू लागले आहेत ,त्यालाच डेटिंग हे नाव देण्यात आले आहे .
सध्याही जवळपास 30 टक्के पारशी अविवाहित आहेत. तसेच ज्यांची लग्न झाली आहेत त्यांच्यात सुद्धा मुले न होऊन देण्याबद्दल मान्यता आहे. माहितीनुसार जर एकूण पारशी कुटुंबात वर्षाला 300 मुले पैदा झाली तर अंदाजे 800 लोक मरण पावतात. असे या धर्मातील लोकांच्या जन्म मृत्यूचे प्रमाण आहे. पारशी धर्मामध्ये प्रजनन प्रमाण 0.8% एवढे आहे. या धर्मात अजून एक नियम असा आहे की, जर पारशी धर्मातील मुलगी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीबरोबर लग्न करेल तर तिला पारशी मानले जात नाही आणि दुसऱ्या धर्मातील मुलगी पारशी धर्मामध्ये लग्न करून आली तर तिला पारशी समजले जाते.
तसेच या धर्मातील घटत्या प्रमाणामुळे मुला-मुलींना लग्नासाठी जोडीदार मिळणे कठीण जाते. त्यामुळे काही जण मजबुरीने दुसऱ्या धर्मातील मुला मुलींबरोबर लग्न करतात किंवा बहिष्काराच्या भीतीमुळे अविवाहित राहतात. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्यावर फक्त धर्म बहिष्कार नव्हे तर इतरही काही गोष्टीवर दबाव आणला जातो. सर्वात मोठा दबाव म्हणजे असे करणारे मुले आणि मुली यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला जाण्याची परवानगी नसते. अनेक धर्मांमध्ये धर्मांतर करण्यासाठी बरेच नियम घातलेले आहेत परंतु पारशी धर्मामध्ये याबाबतीत सर्वात कडक नियम आहेत. शक्यतो दुसऱ्या धर्मातील एखाद्या व्यक्तीला पारशी होण्याची इच्छा असून सुद्धा तो पारशी होऊ शकणार नाही असे नियम या धर्मामध्ये आहेत. पारशी होण्यासाठी धार्मिक शुद्धता हवी असते.
त्यामुळे दुसऱ्या कोणाला पारशी धर्म स्वीकारण्याची परवानगी नसते. दुसऱ्या धर्मा मध्ये सामील होण्यासाठी धर्म स्वीकारल्यानंतर त्या धर्मातील अटी पाळण्याची रीत असते. लग्न केल्यानंतर पारशी धर्मामध्ये लग्नानंतर दोन चरण असतात. पहिल्या चरण मध्ये नवरदेव आणि नवरी आपल्या नातेवाईकांसोबत एका लग्न कॉन्ट्रॅक्टवर सही करतात. तर दुसऱ्या चरण मध्ये सर्वांसाठी मेजवानीचा बेत आखला जातो. पुढील सर्व कार्यक्रम तीन ते सात दिवस चालतो. पारशी धर्मामध्ये विवाहाच्या कार्यक्रमाला पसंदे कदम असेही म्हटले जाते. लग्नामध्ये नवरदेव नवरीला समोरा समोर बसून तीन वेळा पसंदे कदम असा उच्चार केला जातो.
एकदा नवरदेवाला आणि एकदा नवरीला असा तीन वेळा उच्चार करून नंतर विचारले जाते की तुम्हाला हा विवाह मान्य आहे का? आणि त्यानंतरच विवाह पक्का झाला हे सांगितले जाते. तसेच या धर्मामध्ये अंत्यविधी कार्यक्रम फार वेगळ्या पद्धतीने असतो. ज्याप्रमाणे हिंदू मध्ये प्रेत जाळले जाते. इस्लाम आणि इसाई धर्मामध्ये प्रेताला पूरले जाते. तर पारशी धर्मामध्ये प्रेताला जमिनीपासून उंच असलेल्या एका टॉवर ऑफ सायलन्स वर ठेवले जाते. टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे त्याला जखमा असे म्हणतात. टावर ऑफ सायलेन्स एक बांधकामाचा उंच गोलाकार साचा असतो. त्यामध्ये प्रेताला सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवले जाते. त्यानंतर प्रेताला गिधडे आणि इतर पक्षी येऊन खातात. गिधाडांनी प्रेताला खाने हे पारशी धर्मामध्ये शुभ मानले जाते.

अंतिम संस्काराला पारशी धर्मामध्ये लाख्मी असे म्हणतात. तसेच आकाश दफन असे सुद्धा म्हणतात. पारशी समाजात प्रेताला जाळणे किंवा दफनने याला प्रकृती नाश समजले जाते. खुल्या आकाशामध्ये प्रेताला सोडण्यामागे असे कारण सांगितले जाते की मृत शरीर अशुद्ध असते. पारशी लोक पर्यावरण प्रेमी असतात त्यामुळे मृत शरीर जाळल्याने त्यांच्या मते अग्नी तत्व पवित्र असते. त्यामुळे मृत पावलेल्या अपवित्र शरीराला पवित्र अग्नीत जाळून नये व पर्यावरण हानी करू नये. यामुळे पर्यावरण प्रदूषित होते.
तसेच मृत शरीर जमिनीमध्ये पुरल्याने सुद्धा दुर्गंधी मुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच मृत शरीराचे नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन केल्याने सुद्धा पाणी दूषित होते. पारशी धर्मामध्ये पृथ्वी,अग्नी आणि जल या तत्त्वांना फार पवित्र मानले जाते. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे हल्ली गिधाडांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईमध्ये तर गिधाडे खूपच कमी आहेत त्यामुळे मुंबई मधल्या पारशी दफन भूमीमध्ये अनेक मृतदेह गिधाडांनी न खाल्ल्यामुळे तसेच पडून असतात त्यामुळे तिथे दुर्गंधी पसरलेली असते शिवाय कीटक आणि माशांचा उपग्रह होतो .या कारणांमुळे पारशी समाजाकडून अग्नी दहन हा प्रकार स्वीकारला गेलेला आहे . नुकतेच रतन टाटा यांचे निधन झाले त्यांनाही अग्निसंस्काराच देण्यात आला होता.
त्याचप्रमाणे पारसी लोकांचे जेवण सुगंधीत मसाल्यासह मोहक आणि स्वादिष्ट असते. त्यांच्या जेवनात सुक्यामेव्यासह पकवलेल्या मांसाबरोबर फलोदा, कुल्फी अशा स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असतो. भारत देशामध्ये पारशी धर्माचे फार महत्त्वाचे स्थान असून देशाच्या विकासासाठी पर्शियन लोकांचे मोठे योगदान आहे. त्यांचा अवेस्ता भाषेमध्ये लिहिलेला जेंद अवेस्ता नावाचा पवित्र ग्रंथ आहे. अवेस्ता भाषा ऋग्वेदिक संस्कृत भाषेची मुख्य अवस्था मानली जाते. पारशी धर्माच्या याच मुख्य ग्रंथामध्ये या धर्माला जोडलेले सर्व ग्रंथ सामील केले आहेत. पारशी धर्मामध्ये त्यांच्या कॅलेंडरनुसार सण उत्सव साजरे केले जातात.
तसेच पारशी धर्माचे तीन कॅलेंडर सापडतात परंतु भारतात “पारशी शहंशाली कॅलेंडर” वापरले जाते. या कॅलेंडरनुसार त्यांचे गहम्बर, खोरदाद साल, पतेती, जमशेद ए नवरोज़ हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.तसेच या धर्मामध्ये सहा ऋतू मानले जात असून प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला पारशी अनुष्ठान मानले जाते आणि त्यानंतर त्यांच्यात सुगंधीत स्नेह भोजनाचा कार्यक्रम होतो. भारत देशात अनेक प्रख्यात उद्योगपती हे पारशी धर्माचे होते. टाटा, गोदरेज, वाडिया, पूनावाला, भाभा, इराणी, मिस्त्री ,सोहनी ,गांजावाला बाटलीवाला, दारूवाला, नाडियादवाला या आडनावाचे लोक पारशी म्हणून ओळखले जातात .