हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नवरात्र उत्सव ( Navaratri Festival ) हे एक महत्त्वाचे पर्व समजले जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येतात .जसे की, माघ,चैत्र,आषाढ,आणि आश्विन या महिन्यांमध्ये येणाऱ्या नवरात्री ,परंतु अश्विन महिन्यातील नवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे . पंचांगानुसार, दरवर्षी चैत्र महिन्यात वसंत ऋतु मध्ये वसंतिय किंवा दुसरा आश्विन मास मध्ये शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते.
नवरात्र हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नऊ रात्रींचा वेळ असा समजला जातो.म्हणून नवरात्रीचा उत्सव 9 दिवस चालतो आणि या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी-नवमी तारखेला कन्या पूजन केल्यानंतर, दशमी तिथीला म्हणजेच दहाव्या दिवशी”दसरा” साजरा केला जातो. नवरात्रोत्सव हा देवी अंबेचे (विद्युत) चे प्रतीक आहे. वसंत ऋतूची म्हणजेच शरद ऋतूची सुरुवात हा हवामान आणि सूर्याच्या प्रभावांचा महत्त्वाचा संगम मानला जातो. माँ दुर्गेच्या उपासनेसाठी या दोन वेळा पवित्र मानल्या जातात. सणाच्या तारखा चंद्राच्या कॅलेंडरनुसार ठरवल्या जातात.
दुर्गा मातेची भक्ती आणि उपासना करण्यासाठी नवरात्र हा अतिशय शुभ काळ मानला जातो .ही उपासना प्रागैतिहासिक काळापासून म्हणजे वैदिक काळापूर्वीपासून चालत आलेली आहे. ऋषींच्या वैदिक काळापासून, नवरात्रीच्या काळात भक्ती पद्धतींचे मुख्य स्वरूप गायत्री साधना आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या शक्तीपीठे आणि सिद्धपीठांवर मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते. मातेच्या सर्व शक्तीपीठांना वेगवेगळे महत्त्व आहे. पण आईचे रूप एकच असते. जम्मू कटराजवळ वैष्णो देवीची स्थापना झाली आहे. तर काही ठिकाणी तिची चामुंडाच्या रूपात पूजा केली जाते. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये नैना देवीच्या नावाने मातेची जत्रा भरते, तर सहारनपूरमध्ये शाकुंभरी देवीच्या नावाने मातेची मोठी जत्रा भरते.
याचप्रमाणे महाराष्ट्रातही देवींची सर्व शक्तीपीठे आणि इतरही देवींच्या मंदिरे असलेल्या गावी दरवर्षी नवरात्रीला यात्रा भरतात. तसेच घरोघरी देवीची पूजाअर्चा केली जाते व घटस्थापना केली जाते.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीला कलश किंवा घटाची स्थापना केली जाते. शास्त्रानुसार कलशाची स्थापना शुभ मुहूर्तावरच करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून देवीचे व्रत करतात आणि कलशाची स्थापना करण्यापूर्वी मातीने भरलेल्या भांड्यात सात प्रकारचे धान्य शिंपडावे किंवा त्या मातीत मिसळावे या मातीच्या वर पाण्याने भरलेला कलश स्वतः ठेवावा.
तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीला कलश किंवा घटाची स्थापना केली जाते. आणि कलशात सुपारी, फुल आणि एक रुपयाचे नाणे टाकून कलशावर स्वस्तिक बनवतात.कलशाच्या वरच्या भागात कलवा बांधतात. नंतर कलशावर अशोक किंवा आंब्याची पाने ठेवतात.यानंतर लाल कपड्यात नारळ गुंडाळतात आणि कलशाच्या वर स्थापित करतात .अशा रीतीने घटस्थापना पूर्ण झाल्यावर प्रथम श्रीगणेशाचे व नंतर सर्व देवी-देवता व दुर्गा देवीचे आवाहन करून पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळा घटाला अर्पण करतात.तर शारदीय नवरात्त्रीचा शेवट नऊ दिवसांपूर्वी बसवलेला घट आणि दुर्गा देवीच्या प्रतिमेचे विसर्जन करून केला जातो.तसेच काही ठिकाणी दहाव्या दिवशी एक कार्यक्रम म्हणून महिषासुराच्या पुतळ्याचा वध करून केला जातो.
अनेकांना एवढेच माहीत असते की नवरात्री म्हणजे देवीचा पूजा पाठ सप्ताह. परंतु नवरात्र म्हणजे काय? नवरात्र उत्सव कधी आणि का साजरा झाला होता. तसेच या सणाचे महत्व जाणून घेताना अनेक विषय आपल्या लक्षात येतात. अनेक वर्षांपासून आपण नवरात्र उत्सव साजरा करत आलेलो आहोत आणि नवरात्रीचे व्रत करत आलेलो आहोत. देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये गरबा आणि दांडिया खेळून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. तसेच पश्चिम बंगाल मध्ये हा उत्सव त्यांच्या मुख्य सणातील उत्सव मानला जाऊन तेथे फार मोठमोठ्या देवींच्या मूर्ती अलंकारयुक्त सजवल्या जातात. आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो.
काही ठिकाणी रात्रीच्या वेळी देवीची आरती करून गरबा,दांडिया यांसारखे खेळ खेळून रोज आनंद व्यक्त करतात.तसेच अनेक ठिकाणी अनेक भक्त माता दुर्गा देवीचा नऊ दिवस उपवास करून व्रत पाळतात. तर अनेक लोक उपवास करण्याबरोबरच नऊ दिवस पायामध्ये चप्पल न घालता अनवाणी फिरत असतात. त्याचप्रमाणे देवीचे अनेक भक्त देवीच्या नऊ अवतारांचे पूजा पठण करतात. याबरोबरच दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळी, आई वडील आणि गुरु यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. तसेच लहान मुले घरोघरी जाऊन वरिष्ठांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात.
तसेच बाहेरगावी असणारे लोक आपल्या जन्मगावी जाऊन हा उत्सव साजरा करतात. तसेच घरोघरी नवीन कपडे खरेदी केले जातात तर अनेक जण वेगवेगळे पेहराव करून दांडिया खेळात सामील होतात. त्यामुळे देशभरात या शारदीय नवरात्री उत्सवाला रम्य रूप मिळालेले आपण पाहतो. या नवरात्र उत्सवाची कहानी किंवा नवरात्री संबंधित एक पौराणिक कथा आहे. महिषासुर नावाचा एक फार मोठा शक्तिशाली राक्षस होता. त्याला अमरत्व मिळवण्याचा लोभ झाला होता. म्हणून त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली होती. आणि नंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला दर्शन दिले.
तुला जो पाहिजे तो वर माग असे म्हणाले. महिषासुराने स्वतः अमर होण्याचा वर मागितला. त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले की या पृथ्वीतलावर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरणार असतो हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे जीवन आणि मृत्यू सोडून तुला जो पाहिजे तो वर मी देईल. हे ऐकून महिषासुर म्हणाला की ठीक आहे प्रभू परंतु मला तुम्ही असा वर द्या की माझा मृत्यू कोणत्याही देवाच्या हातून,कोण्यत्याही आसुराच्या हातून, आणि कोणत्याही मानवाच्या हातून होऊ नये असा वर त्याने मागितला. महिषासुराचा असा वर ऐकून ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि निघून गेले.
त्यानंतर महिषासुर राक्षसांचा राजाच झाला आणि त्याने देवांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देवी देवतांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि सर्व देव घाबरून एकत्र आले आणि भगवान शिव शंकरांकडे गेले. परंतु महिषासुराला ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू कोणी देवाकडून, राक्षसाकडून आणि माणसाकडून होणार नव्हता.त्यामुळे भगवान विष्णू आणि शिवशंकर देवांना काहीही मदत करू शकले नाही. मग महिषासुरापासून वाचण्यासाठी सर्व देवांनी भगवान विष्णू आणि देवी आदिशक्तीचीही फार उपासना केली. त्यानंतर त्यांच्या शरीरातून एक एक शक्ती निघाली आणि सगळ्यांच्या शक्तीतुन एक दुर्गा देवीचे रूप तयार झाले. आई दुर्गा देवीला पाहून महिषासुर तिच्याकडे आकर्षित झाला. तसेच त्याने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्तावही ठेवला.
देवीने लग्नाला विरोध करून सुद्धा महिषासुर ऐकत नव्हता. मग आई दुर्गादेवीने त्याच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला कि, माझ्यासोबत लढत असताना तू जिंकला तर मी तुझ्याशी लग्न करेल. महिषासुराने हे मान्य केले आणि लढाई सुरू झाली. आणि ही लढाई नऊ दिवस सुरू होती. आणि याच लढाईत दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. म्हणून दुर्गा देवीला “महिषासुरवर्धिनी”असे नाव पडले तेव्हापासून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
खूप सुंदर लेख आहे 👌