महाराष्ट्रातील गंगा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या नंतर सर्वात लांब नदी म्हणून कृष्णा नदीचा नंबर लागतो. त्याचप्रमाणे नद्यांच्या खोऱ्या ची तुलना केली असता गोदावरी, सिंधू आणि गंगा नदी नंतर चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी कृष्णा नदी ( Krishna River ) आहे.
दख्खनच्या पठारावर कृष्णा नदीला कृष्ण वेणी म्हणून ओळखली जाते. कृष्णा नदीची एकूण लांबी एक हजार चारशे किलोमीटर असून महाराष्ट्रात तिची लांबी 282 किलोमीटर आहे.महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यामध्ये सिंचनासाठी प्रमुख स्रोत म्हणून कृष्णा नदी ओळखली जाते.दक्षिण भारतातील जुन्या महाबळेश्वर मध्ये कृष्णा,कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. म्हणून तेथे एक पंचगंगा नावाचे एक मंदिर आहे.
कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे जोर गावाजवळ होतो. तसेच ती पूर्वेकडे वाहत जाते. कोयना नदी सुद्धा जवळपास तिथेच उगम पावते परंतु सुरुवातीला उत्तरेपासून दक्षिणेकडे वाहत जाते नंतर पूर्वेकडे जाऊन कृष्णा नदीला मिळते. थोडक्यात कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्या एकाच ठिकाणाहून निघतात परंतु कराडला त्या एकमेकांना एकत्र मिळतात.
कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाला प्रीतीसंगम ( Pritisangam ) असे म्हणतात. कोयना नदी ( Koyana river ) संपूर्ण महाराष्ट्रात आहे तसेच या कोयना नदीवर फार मोठे धरण असून त्या धरणाला शिवसागर असे म्हणतात.
कोयना नदी मुळे संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध झाला आहे म्हणून तिला लाईफ लाईन ऑफ महाराष्ट्र असे म्हणतात. संगमानंतर पुढे कृष्णा नदी तिच्या उगम स्थानापासून सुमारे एक हजार तीनशे किलोमीटर अंतर पार करत थेट आंध्र प्रदेशातील राजा महेंद्र येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
तिचा महाराष्ट्र मध्ये प्रवास पुढील प्रमाणे होतो.वाई,भुईज, माहुली, सातारा, कराड ,औदुंबर सांगली, नरसोबाची वाडी मार्गे ती कर्नाटक राज्यात प्रवेश करते. कृष्णा नदीला पुढे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उगम पावणारी वारणा नदी सांगली मध्ये हरिपूर येथे मिळते. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक वेरळा नावाची नदी खटाव, विंचूर, वडूज येथून वाहत जाते आणि कृष्णा नदीला सांगलीमध्ये ब्रह्मनाळ या ठिकाणी मिळते.
कोल्हापूर येथील पंचगंगा नदी म्हणजे कुंभी,कासारी, सरस्वती ,भोगावती, आणि तुलसी या पाच नद्यांचा एकत्र प्रवाह नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीला येऊन मिळतो. तसेच कोल्हापूरमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा एकत्रित प्रवाह म्हणजे दूधगंगा आणि वेदगंगा नावाच्या दोन नद्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर कृष्णा नदीला मिळतात. दूधगंगा नदीवर काळंबा नावाचे एक धरण आहे.
2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदा हे धरण कोरडे पडले होते.तसेच घटप्रभा आणि मलप्रभा या दोन नद्या कृष्णा नदीला जाऊन मिळतात. घटप्रभा नदीला दोन उपनद्या आहेत एक म्हणजे हिरण्यकेशी आणि दुसरी म्हणजे मार्कंडेय. कृष्णा नदीची महत्वाची उपनदी म्हणून भीमा नदी समजली जाते. भीमा नदी कृष्णेला डावीकडून येऊन कर्नाटक आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर मेहबूबनगर येथील श्री संगमावर मिळते. या श्री संगमाला निवृत्ती संगम असेही म्हणतात.
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ( Bhimashankar ) येथे उगम पावणारी भीमा नदी पुढे पंढरपूरला गेल्यानंतर तिला चंद्रकोर आकार मिळतो म्हणून तिला पंढरपूर मध्ये चंद्रभागा असे म्हणतात. या भीमा नदीला पुण्यामध्येच उगम पावणाऱ्या इंद्रायणी आणि मुळा, मुठा या नद्या येऊन मिळतात. लोणावळ्यामध्ये उगम पावणाऱ्या इंद्रायणी नदीवर पानशेत येथे वाळवण धरण बांधलेले आहे. तसेच मुळा नदीवर मुळशी डॅम बांधलेला आहे. मुळा नदीला महत्त्वाच्या दोन पवना आणि मुठा या उपनद्या येऊन मिळतात.
लोणावळ्यामध्ये महत्त्वाचा आकर्षणाचा पॉईंट पवना डॅम असतो. हे पवना धरण पवना नदीवर बांधलेले आहे. मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा पुण्यातील संगमवाडी येथे संगम होतो. पश्चिम घाटात उगम पावणारी मुठा नदीची महत्वाची उपनदी आंबी नदी आहे. या आंबी नदीवर पानशेत धरण बांधलेले आहे आणि या पानशेत धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयाला तानाजी सागर तलाव असे म्हणतात.
तसेच या मुठा नदीवर खडकवासला धरण बांधलेले आहे. संगमवाडी पासून मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह भीमा नदीला जाऊन मिळतो. मग पुढे भीमा नदी श्री संगम येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. श्री संगम पासून पुढे कृष्णा नदीला बऱ्याचशा उपनद्या येऊन मिळतात जसे की, तुंगभद्रा नदी, मुशी नदी आणि इतर काही नद्या कृष्णा नदिला येऊन मिळतात. शेवटी ही कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. साताऱ्यातील महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिरापासून ते बंगालच्या उपसागरात पर्यंत कृष्णा नदीचा प्रवास अशा प्रकारे आहे.
कृष्णा नदीच्या ( Krishna river ) खोऱ्यात कोळसा, लोखंड, चुनखडी, तेल, वायू, डोलोमाईट, लॅटराईट, हिरे, युरेनियम तसेच इतरही अनेक प्रकारची खनिजे सापडतात. कृष्णा खोऱ्यामध्ये हत्ती सोन्याची खान, कोल्लूर हिरे खान, नालगोंडा युरेनियम खान, डोनी मलाई लोहखान, येल्लांडू कोळसा खान, कुद्रेमुख लोह खान, जगया पेठा खाणी, असे अनेक प्रकारचे प्रसिद्ध खनिज साठे आहेत. तसेच कृष्णा काठचे कृष्णा वन्यजीव अभयारण्य फार प्रसिद्ध आहे. तसेच कृष्णा खोरे वनस्पती आणि प्राणी संपत्तीने समृद्ध आहे.
खारफुटीचे जंगल म्हणून कृष्णा वन्यजीव अभयारण्याला घोषित करण्यात आलेले आहे. कृष्णा खोऱ्यामध्ये श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प, भद्रा अभयारण्य, गुडावी पक्षी अभयारण्य, पखाल वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, मृगवन राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, राणी बेन्नूर काळवीट अभयारण्य, शेट्टी हल्ली वन्यजीव अभयारण्य अशी अनेक वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य आहेत.
त्याचप्रमाणे कृष्णा नदी खोऱ्यात इथी पोधला धबधबा, गोकाक धबधबा, मलेला धीर्धम, गोडचिना मलालकी धबधबा असे अनेक मोठे धबधबे आणि मोठ्या दर्या आहेत. तसेच कृष्णा नदी हिंदू धर्मामध्ये पूजनीय असून नदीकाठी अनेक आकर्षणाचे केंद्र आणि मंदिरे आहेत.वाई येथे महागणपती मंदिर आहे.
सांगली जवळ नरसोबाची वाडी दत्त अवतार, अंकलखोप औदुंबर,कर्नाटक मधील यदूर तीर्थक्षेत्र, वीरभद्र मंदिर, विजय वाड्यावर दुर्गा मंदिर, सांगवी जवळील मल्लिकार्जुन म्हणजेच श्री शैल्यम मंदिर आणि रामलिंग मंदिर, अमरेश्वर स्वामी मंदिर, नरसिंह मंदिर, नलगोंडा चे वडापल्ली मंदिर दत्त मंदिर आणि संगमेश्वर मंदिर तसेच तेलंगणा राज्यांमध्ये ही कृष्णाकाठी काही मंदिरे आहेत.
तसेच भिलवडी येथील कृष्णा घाट फार प्रसिद्ध आहे. कृष्णा पुल, सांगलीचा इर्विन ब्रिज आणि अंकली पूल, ब्रिटिशांनी बांधले ला उगर रेल्वे पूल, सौंदत्ती पूल आणि रायबाग, बागलकोट येथील बाल गली पूल, रायचूर मध्ये ब्रिटिशांनी बांधलेले सिरत ए जुदी पूल असे बरेच नवीन पूल आणि काही दळणवळणासाठी ब्रिटिशांनी बांधलेले जुने भक्कम पूल बांधलेले आहेत. त्याचप्रमाणे हिप्परगी, अलमट्टी, भीमा, जुराला,श्री शैल्यम, नागार्जुन, सुंकेसुला,पुलीचिंतला असे अनेक बंधारे कृष्णा नदीवर आहेत.