कबीर महाराज अत्तार | Kabir Maharaj Attar

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांपासून ते संत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक महान संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद,अनेक अनावश्यक रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी व शिक्षणाचे महत्त्व सर्वसामान्यांना पटावे म्हणून समाज प्रबोधन केले. याच परंपरेत जन्माने मुस्लिम असलेले ( Kabir Maharaj Attar ) कबीर महाराजांचे वडील महम्मद महाराज अत्तार यांनी पदार्पण केले होते. महम्मद महाराजांचे वडील म्हणजेच कबीर महाराजांचे आजोबा हुतात्मा बाबू गेनू यांचे अंगरक्षक होते.

कबीर महाराजांचे वडील महम्मद महाराज अत्तार ( Mahammad Maharaj Attar ) कीर्तनातून नेहमी सांगतात की, मी कोणत्या जातीचा आहे हे पाहू नका मी महाराष्ट्राच्या मातीचा आहे हे पहा.कबीर महाराजांचे वडीलही कीर्तनकार आहेत त्यामुळे त्यांच्या मुलीचे विवाह जमविण्यास त्यांना बऱ्याच अडचणी आल्या होत्या. वडील कीर्तनकार असल्यामुळे लग्न मोडत होती. महम्मद महाराज आत्तार नेहमी पांडुरंगाला विचारायचे की कारे देवा! तुझे नाव घेतो म्हणून असे आहे का? परंतु महम्मद महाराज साधनायुक्त कीर्तनकार असल्यामुळे पांडुरंगाच्या कृपेने आणि त्यांची सर्व अपत्य सुशिक्षित असल्यामुळे लवकरच त्यांनी सर्वांची लग्न करण्यात यश मिळवले.

ती कठीण वेळ निघून गेली. महम्मद महाराजांच्या चारही मुलींची लग्न होऊन त्या चांगल्या घरी नांदायला गेल्या. कबीर महाराजांच्या बहिणींना योग्य वर मिळून त्यांचे लग्न झाले. कठीण परिस्थितीत प्रपंच उभा केलेल्या नूर महंमद महाराज आत्तार यांनी पुढे आपला मुलगा कबीर महाराज आता याला अध्यात्मिक शिक्षणासह कीर्तनाचे धडे दिले. लहानपणापासूनच महम्मद महाराज अत्तार यांना भजन कीर्तनाची आवड लागलेली होती. प्रवचन आणि कीर्तनातून मिळणारे बोध त्यांच्या मनाला रुचत होते.

धर्मभेद आणि विषमता नाहीशी करणे व त्यासाठी जनजागृती करणे यासाठीच भारुड, भजन, प्रवचन, कीर्तन या सर्व गोष्टींचा जन्म झाला हे त्यांना लवकरच उमगले. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारकरी सांप्रदायाच्या परंपरेतून आपण फार मोठे कार्य करू शकतो हे समजल्यानंतर नूर महम्मद आत्तार महाराजांनी या सेवेत ठणकावून प्रवेश केला होता. तसेच आपला मुलगा कबीर महाराज आतार यालाही लहानपणापासूनच त्यांनी अध्यात्मिक धडे देण्यास सुरुवात केली होती.

वडिलांप्रमाणेच कबीर महाराजांनीही कीर्तन सेवा देण्यास सुरवात केली आणि त्यात ते चांगलेच यशस्वी झाले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या कीर्तनाची मागणी आणि लोकप्रियता वाढत होती. रुबाबदार उंच बांधा, काळीभोर दाढी आणि तुफान वकृत्व कला अवगत केलेल्या कबीर महाराजांनी पांढरे धोतर, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, डोक्यावर पांढरा फेटा व अंगात जॅकेट असा त्यांचा पेहराव असतो. उंच आणि गोड आवाज, प्रपंचातील उदाहरणे देऊन प्रबोधन करण्याची कला तसेच इतिहासाचे सखोल ज्ञान यामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश व तेलंगणा राज्यात त्यांनी अनेक कीर्तने केली.

हरिभक्त परायण कबीर महाराज हे त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे वारकरी संप्रदायामध्ये आहेत. जन्माने मुस्लिम असलेले हभप कबीर महाराज आत्तार यांचे वडील नूर महम्मद महाराज अत्तार आणि त्यांचे गुरु होते वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर तसेच कबीर महाराज आत्तार यांचे गुरु वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे होते. ज्ञानेश्वरी आणि मुक्ताई अशा दोन मुली कबीर महाराजांना आहेत .संपूर्ण आत्तार कुटुंब माळकरी व शाकाहारी आहे.परंतु ते जसे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे नियम पाळतात.

त्याप्रमाणेच मुस्लिम सणांच्या दिवशी जसे ईद-ए-मिलाद, बकरी ईद, रमजान ईद अशा कार्यक्रमाला आवर्जून जातात व नमाज पठण करतात. त्यांच्या मते जात आणि धर्म या पलीकडचे काम संतांचे आहे. कबीर महाराज नेहमी सांगतात “माणुसकी” हीच सर्वश्रेष्ठ जात आहे. कबीर महाराज आत्तार यांनी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात पडताळणी विभागात काही काळ नोकरी केली. त्यानंतर त्यांनी खेड शिवापूर येथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काही काळ नोकरी देखील केली. त्यांनी बीसीए चे संपूर्ण शिक्षण घेतले होते परंतु त्यांच्यातील कीर्तनकला व प्रवचन कला उत्कृष्ट असल्यामुळे त्यांचा जास्त कल या प्रवचन आणि कीर्तन सेवेकडेच होता.

त्यामुळे वय वर्ष 22 असताना 2013 मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे अध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेतले. त्यांनी अनेक महान संतांच्या अभंगावर कीर्तन केले असून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पोवाडे म्हटले.आजही त्यांच्या कीर्तनामध्ये ते थोडा वेळ का होईना परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रबोधन करतात.

छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर प्रबोधन करत असताना उपस्थित भक्तांच्या अंगावर शहारे येतील असा त्यांचा आवाज आणि बोध असतो. कबीर महाराज आतार यांच्या मुलींची नावे ज्ञानेश्वरी आणि मुक्ताई अशी आहेत तसेच त्यांची टोपण नावे त्यांनी मीरा आणि साईमा अशी ठेवलेली आहेत. कबीर महाराज आत्तार यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवीत करण्यात आले आहे. सोशल मीडियामुळे त्यांची कीर्तने आणि प्रवचने लोकं देश विदेशात पाहू लागली आहेत आणि त्यामुळे ते अजूनच लोकप्रिय होत गेले . त्यांनी तरुणपणात या क्षेत्रात घेतलेली झेप अगदी प्रेरणादायी ठरलेली आहे.

जातीभेदाच्या भिंती ओलांडून त्यांनी केलेली प्रवचन व किर्तनसेवा महाराष्ट्रासह अनेक राज्यात पोहोचली आहे. आत्तापर्यंत कबीर महाराज अत्तार यांनी हजारो प्रवचन आणि किर्तनाच्या माध्यमातून कुप्रवृत्तीवर घाला घातला आहे. कबीर महाराजांचा जन्म जरी मुस्लिम धर्मात झाला असला तरी लोकांनीं त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे .आज महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांमध्ये कबीर महाराज आत्तार यांचे नाव घेतले जाते. सध्या कबीर महाराज आणि त्यांचे वडील हे दोघेही गावोगावी कीर्तने करीत असतात महम्मद महाराज अभिमानाने पोराचे कौतुक करतात तर कबीर महाराज गर्वाने आपल्या बापाने दिलेले धडे गिरवतात. कबीर महाराजांच्या बहिणींनाही त्यांच्या या कीर्तनकार भावाचा अभिमान आहे.

1 thought on “कबीर महाराज अत्तार | Kabir Maharaj Attar”

Leave a Comment