इस्लाम धर्म | Islam Religion

इस्लाम धर्माचा ( Islam Religion ) उगम हा सातव्या शतकात म्हणजेच सध्याच्या सौदी अरेबिया येथून झाला. हळू हळू त्याचा प्रसार आसपासच्या अरब देशांत होऊन पुढे तो अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात येऊन पोहचला. एवढेच नव्हे तर तो पुढे आशिया खंडातील बांगलादेश इंडोनेशिया, मलेशिया या देशांत जाऊन पोहचला. काही अंशी चीन, नेपाळ आणी आफ्रिका मध्येही या धर्माचा प्रसार झालेला आढळून येतो. ख्रिश्चन धर्मानंतर जगात मुस्लिम धर्म हा दुसऱ्या क्रमांकाचा असून सध्या इस्लाम धर्म हा जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारा धर्म आहे. जगात सुमारे 57 इस्लामिक देश आहेत.

इस्लाम हा शब्द मूळ अरबी भाषेतील असून असलम या शब्दापासून तयार झाला आहे. याचा भावार्थ ईश्वरापुढे नतमस्तक होणे असा सांगितला जातो.  मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिहाद ही मुस्लिमांची मुख्य शिकवण असून कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये प्रमुख मानल्या जातात. शिया आणि सुन्नी असे दोन मुख्य धर्म प्रवाह मुस्लिम धर्मात आढळतात तसेच मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची प्रमुख धर्म स्थळे आहेत या धर्मातील रितिरिवाज हे अन्य धर्मापेक्षा वेगळे आहेत. इस्लाम धर्म हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. इस्लाम धर्म अनेक देशांत जरी पसरला असला तरी नमाज पढण्याची पद्धत आणि शब्द मात्र तेच आहेत , त्यात काही बदल झालेला आढळत नाही.

पूर्वी अरबी लोक कबिला मध्ये राहायचे आणि सर्वसामान्य जीवन जगायचे. प्रत्येक कबिला मध्ये आपले देवी देवता होते. त्यांना ते पुजत असायचे. या कबीलाचे नेतृत्व त्याकाळी शेख नावाचा एक मोरक्या करत होता. ज्याचे कर्तृत्व परिवारिक संबंधावर असायचे .जास्त करून बुद्धिमत्ता, व्यक्तिगत साहस आणि उदारता यांद्वारे तो हे करत होता. साधारणपणे सहाव्या शताब्दीच्या सुरुवातीला ह्या कबीलांनी व्यापारातून आपले व्यवसाय तयार केले. याचा सर्वात जास्त परिणाम पश्चिम अरबच्या मध्य भागी पाहावयास मिळाला.

त्याला हिजाज असे म्हटले जायचे. इस्लाम मध्ये प्रमुख दोन स्थान मानले जातात एक म्हणजे “मक्का” ( Makka ) की जे पैगंबर महम्मद यांचे जन्मस्थान आहे  आणि दुसरे “मदिना” ( Madina ) म्हणजे पैगंबर महम्मद यांचे ध्यानाचे  ठिकाण . मक्का आणि मदिना हे दोन्ही अरबच्या मध्यभागी आहेत. त्यानंतर काही लोकांनी शहराच्या दिशेने वाटचाल केली. मग हे लोक शेती आणि व्यापार करून आपले जीवन जगायला लागले. मक्का हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे व्यापारी केंद्र असण्याच्या बरोबरच एक मुख्य धार्मिक स्थळ होते.

इस्लाम धर्माची सुरुवात सातव्या शताब्दी मध्ये अरब प्रांतात झाली होती. या धर्माचे संस्थापक आणि प्रवर्तक हजरत महम्मद साहेब हे होते.इ. स.612 च्या आसपास त्यांनी स्वतःला खुदा किंवा अल्लाह चा दूत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आणि अल्लाह द्वारे सांगितलेल्या मार्गाने चालायचे असे सांगण्यास सुरुवात केली. असे सांगितले जाते की महम्मद साहेब ने पंधरा वर्षापर्यंत एका गुहेत राहून चिंतन आणि मनन केले होते. त्यानंतर त्यांना अल्लाहचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यांनी 45 वर्षाच्या एका खालीजा नावाच्या  विधवा स्त्री बरोबर धर्मप्रचार करण्याची सुरुवात केली होती. सांगितले जाते की ही महिला विश्वामधील एक अशी महिला होती की, तिने महम्मद साहेब यांच्या नवीन इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. त्यानंतर महम्मद साहेब ने खालीजा सोबत विवाह केला होता.

इस्लाम धर्माच्या स्थापनेनंतर महम्मद साहेब ने सारे जीवन खुदाचे संदेश आणि इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी व्यतित केले.
त्यावेळी महम्मद साहेब ने इस्लाम धर्माची एक नियमावली तयार केली होती. त्या अगोदर अरब मधील लोक प्राचीन अरबी धर्माचे पालन करत होते. मक्का मध्ये कोणतेही स्थायी राज्य किंवा शासन त्यावेळी नव्हते. येथील लोकांना नशा करणे, जुगार खेळणे अशा अनेक वाईट सवयी होत्या. त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा स्थीरता  नव्हती. तसेच त्यांचे जीवन नेहमी वादग्रस्त असायचे. महम्मद साहेब ने अरब मधील प्रचलित अंधविश्वास आणि तीनशेपेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती पूजनाची घोर निंदा केली होती. तसेच या सर्व मूर्ती काबा मध्ये ठेवल्या होत्या. ते सांगायचे की आपल्याला फक्त अल्लाह चे पूजन केले पाहिजे.

इस्लाम धर्माच्या सूरवातिला महम्मद साहेब यांच्या मक्का मध्ये त्यांचे पूजन विशिष्ट वेळी केले जायचे. महम्मद साहेब यांचा धर्म हा प्राचीन अरबी धर्माच्या विरोधात होता. तेथील लोकांच्या मक्का मधील देव देवतांना अपमानित केल्यामुळे लोकांना फार वाईट वाटले होते. हे लोक इस्लाम या नवीन धर्माला मकाच्या समृद्धी, प्रतिष्ठा आणि विकासाचे विरोधक मानू लागले. त्यामुळे काही लोकांनी महम्मद साहेब ची खूप चेष्टा केली आणि त्यांना कडक विरोध केला.

तेव्हा महम्मद साहेब यांना त्यांच्या पुढे शरणागती पत्करावी लागली होती. महम्मद साहेब च्या यात्रेला हिजरा असे म्हटले जायचे आणि त्या दिवसापासून मुसलमानांची हीजरी कॅलेंडर ची सुरुवात झाली. ही घटना 24 सप्टेंबर 622 मधील आहे. महम्मद साहेब ने खुदा ला केंद्र स्थानी ठेवून मदिना मध्ये आपल्या एका राज्याची स्थापना केली होती. ते तेथील प्रथम मुस्लिम शासक होते परंतु कधीही त्यांनी आरब प्रांतातील नेता असल्याचा दावा केला नाही. त्यांच्या शासनाचा आधार “कुरान “होते. महम्मद साहेब ने मदिना मध्ये इस्लाम धर्माचे एक व्यवस्थित स्वरूप तयार केले होते. त्याबरोबरच त्यांनी आपल्या विरोधांबरोबर कट्टर मुकाबलाही केला होता.

इस्लाम धर्मात दोन ग्रंथ सर्वात प्रमुख मानले जातात. पहिला कुराण आणि दुसरा हदीस .कुरान ( kuran ) मध्ये महम्मद साहेबांना खुदा ने दिलेले ज्ञान संग्रह आहे आणि हादिसा मध्ये स्वतः महम्मद साहेब ने दिलेल्या संदेशांचा संग्रह आहे. महम्मद साहेब आपल्या धर्माच्या विरोधकांना युद्ध आणि राजनीतीचा उपयोग करून हटवत असायचे. मदिना वरील कुरेशांच्या आक्रमणानंतर तीन युद्ध झाले होते आणि या तीनही युद्धामध्ये महम्मद साहेबांचा विजय झाला होता. नंतर हे कुरेश कबीलाचे शासक म्हणून बसले होते. अशा प्रकारे महम्मद साहेब यांनी इस्लामचा प्रचार केला त्यामुळे त्यांना नेहमी पैगंबर म्हटले जायचे. त्यांनी कधीही शासकीय कुठल्या पदाचा स्वीकार केला नाही. पुढे इ.स. 632 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हजरत महम्मद यांनी आपल्या पाच शिष्यांना मुख्य पाच शिकवणी दिल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने विश्वास ठेवला पाहिजे की, अल्लाह एक मात्र पूजनीय आहे आणि पैगंबर महम्मद हे अल्लाहाचे पैगंबर आहेत. दुसरे म्हणजे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला दिवसातून पाच वेळा नमाज पाडणे अनिवार्य आहे. तिसरे म्हणजे निर्धनांना दान केले पाहिजे. चौथे म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्याने रमजानच्या महिन्यांमध्ये रोजा धरला पाहिजे. पाचवे म्हणजे प्रत्येक मुसलमानाने आपल्या जीवनामध्ये एकदा तरी हाजयात्रा ( Hajyatra ) केली पाहिजे.

पैगंबर महम्मद ने आपला कोणीही उत्तराधिकारी तयार करून ठेवला नव्हता. म्हणून त्यांच्या जनसमुदायाने त्यांच्या मृत्यूनंतर अबू बक्र ला त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्याला “खलिफा” असे म्हणतात. हजरत महम्मद नंतर खलिफा ने इस्लाम धर्माचा पुढे जोरात प्रचार प्रसार केला आणि इस्लाम धर्म वाढवला. त्याच्या नेतृत्वाने नंतर मिस्र,इराक, इराण, आणि सिरीया अशा अनेक देशांमध्ये इस्लाम धर्म वाढवला. इस्लामने इतिहासात सर्वात जास्त वर्ष शासन केले.

पुरातन काळात मुस्लिम राजाला सुलतान तर राणीला सुलताना म्हणत असत .या राजांना अनेक राण्या आणि मुलं असत . मुस्लिम कॅलेंडरला हिजरी कॅलेंडर म्हणतात आणि ते चंद्राच्या गतीवर आधारित आहे. ईद ( Eid ) हा मुस्लिम धार्मियांचा मुख्य सण आहे आणि तो वर्षातून दोनदा असतो. छोटी ईद (ईद उल फित्र) ही ईद रमजानच्या महिन्यात असते म्हणून त्याला रमजान ईद म्हणतात. या महिन्यात मुस्लिम लोक उपवास करतात, त्याला रोजा असे म्हणतात. दिवसभर पाणीही प्यायचे नाही असा कडक नियम आहे. संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर खायला परवानगी असतें. तर दुसरी ईद ही मोठी म्हणजे कुर्बानी ईद किंवा बकरी ईद असते. या ईदला ( ईद उल आदा) असेही म्हणतात. अजूनही बाकीचे काही छोटे सण आहेत. बिर्याणी, शीरखुर्मा, कबाब हे पदार्थ मुस्लिमांमध्ये आवडते पदार्थ आहेत. तसेच मेहंदी, सुगंधी अत्तर, गुलाब, हुक्का या गोष्टी सुद्धा त्यांना खूप आवडतात.

अरबी देश हे सगळे वाळूकामय प्रदेश आहेत तेथे झाडें खूप दुर्मिळ आहेत त्यामुळे मरण पावल्यानंतर माणसांना जमिनीत पुरले जायचे. इस्लाम धर्म अनेक देशांत वाढत गेला तेथे झाडेही भरपूर प्रमाणात आहेत परंतु मृतदेह जमीनीत पुरण्याची प्रथा तशीच राहिली. हराम आणि हलाल या दोन गोष्टी इस्लाम धर्मात महत्वाच्या म्हणल्या जातात. हलाल म्हणजे ज्या गोष्टी धर्माला अनुसरून आहेत. तर हराम म्हणजे ज्या गोष्टी धर्माला मान्य नाहीत किंवा धर्माच्या विरुद्ध आहेत. उदा. दारू, जुगार, धूम्रपान, अंगावर टॅटू काढणे, चोरी, कर्ज काढने, विवाह पूर्व किंवा विवाह बाह्य संबंध ठेवणे, किंवा गैर मुस्लिम व्यक्ती बरोबर विवाह करणे इ.या गोष्टी हराम आहेत.

मुस्लिम धर्मात अनेक धार्मिक कार्यें ही मौलवी आणि इमाम च्या हस्ते होतात तसेच मस्जिद, दर्गा ही त्यांची धार्मिक स्थळें आहेत. पूर्वी इस्लाम धर्मात स्त्रियावर खूप बंधने होती. बुरखा पद्धत, तीन तलाख, बहू पत्नीत्व अशा काही गोष्टी होत्या आणि शिक्षणापासून स्त्रिया वंचित होत्या. जसं जसे जग बदलत गेले तसें इस्लाम धार्मियांनीही हळू हळू तो बदल स्वीकारला. स्त्रियांना शिक्षण मिळू लागले. स्त्रिया नोकरी व्यवसायात आल्या. वरील बऱ्याच प्रथा काही प्रमाणात कमी झालेल्या आहेत. लहानपणी मुलांची सुंता करणे हा प्रकार मुस्लिम धर्मात रितिरिवाजप्रमाणे होतो पण काही लोक ते करणे टाळतात.

पूर्वी भारतामध्ये खूप हिंदू मुस्लिम दंगे होत असत. दोन्ही धर्मामध्ये कायम तणावाचे वातावरण राहत असे परंतु दिवसेंदिवस ही परस्थिती बदलत आहे. भारतामध्ये अनेक हिंदू मुस्लिमांच्या धार्मिकस्थळा ला भेट देतात तसेच अनेक मुस्लिम हिंदूंच्या सण आणि उत्सवात सहभागी होतात. हल्ली काही मुस्लिम कीर्तनकारही दिसू लागले आहेत आणि त्यांचे कीर्तनही लोक आवडीने ऐकतात. तसेच अनेक मुस्लिम गायकांनी हिंदू देवी देवतांच्या प्रार्थना आणि गाणी गायली आहेत.

Leave a Comment