आदिमाया शक्तीची एकूण 51 शक्तिपीठे आहेत. त्यातील 50 शक्तिपीठे आपल्या भारत देशात आहेत तर 51 वे एक शक्तीपीठ ( Hinglaj Mata Temple Balochistan ) पाकिस्तानच्या बलुचिस्तान मध्ये आहे. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तान मध्ये जवळजवळ 460 हिंदू मंदिरे होती. त्यांनी सर्वची सर्व हिंदू मंदिरे पाडून टाकली. परंतु हिंगलाज माता मंदिराला कोणीही हात लावला नाही. कारण हे हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मीय लोकांचे श्रद्धास्थान आहे.
तसेच पाकिस्तान मधील शिवाहरकराय, शारदा पीठ आणि हिंगलाज माता मंदिर अशा महत्त्वाच्या तीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. एप्रिल महिन्यामध्ये या देवीची भव्य यात्रा भरते. जवळजवळ तीन ते चार लाख हिंदू आणि मुस्लिम लोक या यात्रेला गर्दी करतात. पाकिस्तान मधला हा सगळ्यात जुना प्राचीन उत्सव मानला जातो. या उत्सवासाठी फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक येतात. हे देवस्थान बलुचिस्तानच्या लसबेला जिल्ह्यातील हिंगोल राष्ट्रीय उद्यानात मध्ये हंगलुज नदीच्या काठी मकरांद टेकडीच्या भागात एका दरीत आहे.

हे मंदिर पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मीयांसाठी एक आस्था केंद्र आहे, तेवढेच मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे.
हे जगातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते. दरवर्षी लाखो लोक येथे देवीची पूजा करतात. पाकिस्तानच्या निर्मिती पूर्वी भारतातून लाखो भाविक येथे जात होते. हिंगलाज माता मंदिर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. परंतु आजच्या घडीला येथे जर जायचे असेल तर आपल्याला पाकिस्तान सरकारची परवानगी म्हणजे व्हिसा लागतो. हिंगलाज माता उत्सवाला म्हणजेच यात्रेला कराची येथून सुरुवात होते. पाकिस्तान मधील मुस्लिम समाज या यात्रेला नानीचा हज असे म्हणतात.
हिंगलाज माता यात्रेला गेल्यानंतर आपणास आपण पाकिस्तान मध्ये आहोत असे अजिबात जाणवत नाही. कारण या देवीचा उत्सव संपूर्ण हिंदू पद्धतीप्रमाणे साजरा होतो. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा हिंगलाज माता मातेची बरीच मंदिरे आहेत. परंतु हिंगलाज मातेचे मूळ स्थान हे बलुचिस्तान आहे. कोल्हापूर मधील गडहिंग्लज आणि बलुची स्थान मधील माता हिंगलाज मंदिर याची एक रहस्यमय कथा आहे. एकदा दक्ष राजाने फार मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाला स्वतःच्या जावयाला म्हणजेच भगवान शंकराला निमंत्रण दिले नव्हते परंतु शंकराची पत्नी माता सती आपल्या पित्याच्या घरी या यज्ञाला उपस्थित राहिल्या. भगवान शिव शंकराने सांगितले होते जाऊ नको तरी त्या यज्ञाला गेल्या.
राजे,महाराजे, देवी, देवता, ऋषी,मुनी असे सर्व दक्ष राजाच्या यज्ञाला हजर होते. हे सर्व पाहून दक्ष राजाने भगवान शिव शंकराचा सर्वांसमोर अपमान करण्यास सुरुवात केली. याचा देवी सतीला फार राग आला आणि तिने या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची अहुती दिली. ही बातमी कळताच येथे आल्यानंतर हे दृश्य पाहून भगवान शिवशंकर फार क्रोधित झाले. तसेच भगवान शिव शंकर सतीचा हा अर्धा जळलेला मृत देह घेऊन पृथ्वीतलावर भटकू लागले. ज्याने हे विश्व निर्माण केले ती सृष्टीच येथे थांबली होती.
म्हणून भगवान विष्णू देवाने या सतीच्या देहाचे आपल्या सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले. त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी सतीच्या देहाचा तुकडा पडला त्या त्या ठिकाणी शक्ती पीठ तयार झाले. पाकिस्तानमधील बलुचिस्तान मध्ये सध्याच्या हिंगलाज माता मंदिराच्या ठिकाणी सती देवीचे शिर पडले होते. त्यामुळे हे शक्तिपीठ तयार झाले. तसेच अशीही एक कथा सांगितली जाते की परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निष्क्रिय केली होती. त्यावेळी त्यातून वाचलेले अनेक क्षत्रिय या ठिकाणी जाऊन मातेला शरण आले होते.
त्यावेळी हिंगलाज मातेने त्यांचे संरक्षण केले होते. तसेच एका कथेत असे सांगितले जाते की प्रभू रामचंद्राने ज्यावेळी रावणाचा वध केला होता त्यावेळी प्रभू राम हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी गेले होते. तसेच या ठिकाणी प्रभू रामाने यज्ञ केला होता. त्याचप्रमाणे असेही सांगितले जाते की, या मंदिरात गुरु गोरक्षनाथ यांनी जाऊन देवीचे दर्शन घेतले होते. एवढेच नव्हे तर भारत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी नेहमी या देवीच्या दर्शनासाठी जात होते.
हिंगलाज माता मंदिराच्या ( Hinglaj Mata Temple ) ठिकाणी नवरात्र उत्सव फार मोठा साजरा होतो. नवरात्रीमध्ये भारतातून तसेच परदेशातून सुद्धा लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. व येथे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. असा अनेकांचा विश्वास आहे. देवीची मनोभावे पूजा आणि भक्ती केल्याने पूर्वजन्मीची पापेही नष्ट होतात व जीवन समृद्धी मिळते , अशी भाविकांची श्रद्धा आहे. हिंगलाज माता मंदिर परिसरामध्ये भगवान शिव शंकर मंदिर, गणपती मंदिर, काली माता मंदिर अशी हिंदू मंदिरे ही आहेत.
तसेच या हिंगलाज मातेचे महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक अशा अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. याचे कारण म्हणजे पाकिस्तान, इराण, बलुचिस्तान येतील हिंग विकणारे व्यापारी भारतात येत असत. याच व्यापाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते जायचे त्या त्या ठिकाणी हिंगलाज मातेची मंदिरे बांधली. तसेच राजस्थान मध्ये हिंगलाज गड आहे, कर्नाटक मधील गुलबर्गा मध्ये हिंगलाज देवीचे मंदिर आहे.
अशा नावावरून कोल्हापूर मध्ये देवीचे गडहिग्लज असे नाव पडले. भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान कट्टर मुस्लिम वाद्यांनी साडेचारशे हिंदू मंदिरे पाडली होती. त्यावेळी हे हिंगलाज मातेचे मंदिर पाडण्याचाही प्रयत्न झाला होता. परंतु हिंदु मुस्लिम ऐक्य इथे दिसत असल्यामुळे हे मंदिर ते पाडू शकले नाहीत. याच देवीचे स्वरूप म्हणून राजस्थानमध्ये तनोट माता मंदिर जैसलमेर पासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. भारत पाकिस्तान युद्धामध्ये हे मंदिर पाडण्याचा मोठा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांनी मंदिर पाडण्यासाठी फेकलेले 500 बॉम्ब अचानक निकामी झाल्याचे सांगितले जाते.
आजही ते पाचशे बॉम्ब या मंदिराच्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवलेले आहेत.आजही येथे हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्माचे लोक तीनोट देवीच्या दर्शनासाठी जातात. बलुचिस्तान मधील हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानची राजधानी कराची पासून वायव्य दिशेला 250 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच अरबी समुद्रापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा हिंग्लज देवीची मंदिरे आहेत. तसेच या देवीच्या नावावरून महाराष्ट्रात काही गावे सुद्धा आहेत जसे की उस्मानाबाद मध्ये हिंगलजवाडी, हिंगणा, हिंगोली अशा नावांची गावे आहेत.