जगामध्ये जनसंख्येनुसार सर्वात मोठा तिसऱ्या नंबरचा धर्म म्हणून हिंदू धर्म ( Hindu Religion ) मानला जातो. या धर्माचे अनुयायी आशिया खंडात अनेक देशात पाहिले जातात. नेपाळ आणि भारतामध्ये हिंदू धर्माचे लोक जास्त प्रमाणात आढळतात. फार पूर्वी आग्नेय आशिया पर्यत या धर्माचा प्रसार झालेला आढळतो. इंडोनेशिया, मलेशिया ,कंबोडिया, इ देशांनी प्राचीन हिंदू मंदिरे आजही आहेत.
जगात प्रत्येक धर्माला कोणीतरी संस्थापक आहे पण हिंदू धर्म नेमका कोणी स्थापन केला हे सांगणे अवघड आहेत, इतका हा धर्म प्राचीन आहे. या धर्माचे मूळ नाव सनातन धर्म होते. ऐतिहासिक साक्षतेनुसार या धर्माच्या उत्पत्तीचा इतिहास सिंधू संस्कृतीच्या अगोदरचा मानला जातो. साधारणतः 15000 वर्षांपूर्वी या धर्माची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. ज्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली त्या ऋषींनी आणि त्यांच्या परंपरागत असलेल्या ऋषींनी या हिंदू धर्माची स्थापना केली आहे.
ज्यामध्ये ब्रह्म विष्णू,महेश,अग्नि,आदित्य, वायू आणि अंगीराचे नाव विशेष करून यामध्ये घेतले जाते. त्याबरोबर यामध्ये सुरुवातीच्या सप्त ऋषींची नावेही घेतली जातात. तसेच हजारो वर्षांपूर्वी ज्यांनी वेद ऐकवले त्यांना हिंदू धर्माचे संस्थापक मानले जाते. हिंदू धर्म वेदांच्या वाचीक परंपरेचा परिणाम आहे. श्रीकृष्णाने देखील गीतेमध्ये सांगितले आहे की जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल तेव्हा तेव्हा मी परत पृथ्वीवर धर्म पुनर्रर्स्थापनेसाठी जन्म घेईल.
हिंदू धर्मामध्ये ईश्वराला एक अनंत शक्ती मानली जाते. की जो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे. ईश्वर एकच असून त्याला ब्रह्म म्हटले आहे. हिंदू धर्मामध्ये अन्य धर्मापासून वेगळेपण आहे. हिंदू धर्मात देवी,देवता, भगवान अनेकांना ईश्वर मानले जाते तसेच नदी, सागर, वृक्ष, पर्वत, चंद्र, सूर्य, धरती, वायू, अग्नी इ नैसर्गिक घटकांनाही पुजले जाते. परंतु ब्रह्म ही सत्य आहे असे म्हटले जाते आणि त्यापासून मोठे कोणीच नाही. ब्रह्मानंतरच त्रिदेवांची सत्ता मानली जाते. त्यानंतर अन्य देव आणि आसुरांची सत्ता म्हणतात, असुरांनंतर पितरांची. आणि पितरानंतर मानवाची सत्ता मानली जाते..
हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव मानले जातात पण खरे पाहिले तर आपल्याला अडीचशे ते पाचशे पर्यंत ही देवांची नावे सांगता येणार नाहीत कारण कोटी या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. संस्कृत मधील कोटि या शब्दाचा अर्थ , प्रकार असा होतो. म्हणजेच आपल्याकडे 33 प्रकारचे मुख्य देव आहेत. त्यामध्ये 11 रुद्र, 12 आदित्य , 8 वसु ,1 प्रजापती ,1 इंद्र असे प्रकार आहेत .प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे. प्रत्येकावर वेगवेगळा कार्यभाग सोपवलेला आहे. हे सगळे मिळून 33 आहेत .हिंदू धर्मामध्ये गाईला अतिशय पवित्र मानले जाते आणि गायीच्या पोटामध्ये हे 33 कोटि देव असतात असेही मानले जाते.
हिंदू धर्म मोक्षावर आधारित आहे. ब्रह्मांडात असंख्य आत्मे असून जे शरीर धारण करून जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत आहेत आणि आत्म्याचे अंतिम लक्ष मोक्ष आहे. मोक्ष फक्त भक्ती, ज्ञान आणि योग साधनेनेच प्राप्त केला जातो. हेच सनातन तत्व आहे. हे तत्त्वज्ञान आपणास ईश्वर,आत्मा, ब्रह्मांड, पुनर्जन्म आणि कर्माच्या सिद्धांताबद्दल सांगते. 84 लक्ष योनी नंतर मानव जन्म मिळतो असा हिंदू धर्म मानतो त्यामुळे हिंदू धर्मामध्ये मानव जन्माला अनन्य साधारण महत्व आहे.
आपले पाप , पुण्य आणि कर्म यावर आधारित मनुष्यजन्म अवलंबून असतो व त्यानुसार मानवाचे आयुष्य ठरले जाते. हस्तरेषा , कुंडली. जन्मतारीख , चेहरा पाहून त्या व्यक्तीचे जीवनमान व त्यातील ठळक गोष्टी सांगता येतात . यासाठी अनेक ऋषीमुनींनी त्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ते मानवी जीवनासाठी मार्गदर्शक ठरत आहेत . महर्षी पतंजलीचे योगसूत्र हे योगदर्शनाचे प्रथम व्यवस्थापन आणि एक वैज्ञानिक अध्ययन आहे.
हिंदू धर्मात तप आणि साधना करून अनेक सिद्धी प्राप्त होतात अशी मान्यता आहेत. पुरातण काळी अनेक ऋषीमुनींना या सिद्धी प्राप्त होत्या आणि त्यातून ते अनेक चमत्कार करत असत. जसे की, वाचासिद्धी, दूरदर्शन सिद्धी, दूर श्रवणसिद्धी, परकाया प्रवेश, संकल्प सिद्धी अशा अनेक प्रकारचा सिद्धी होत्या . त्याचा उपयोग ते जनकल्याणासाठी करत असत. आपल्या सिद्धींच्या आणि ज्ञानाच्या जोरावर या ऋषीमुनींनी गुरु, बुध, शुक्र ,मंगळ, शनि मंगळ चंद्र इ ग्रहांचा शोध हजारो वर्षांपूर्वी लावलेला आहे. एवढेच नाही तर राशी, ग्रहण, नक्षत्र, प्रत्येक ग्रहाची फिरण्याची गती, अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत.
आयुर्वेदामध्ये अनेक रोगांची लक्षणे आणि त्यावरील निदान त्यांनी लिहून ठेवलेले आहे. एकाच रोगावर अनेक प्रकाची औषधे सांगितली आहेत. अनेक प्रकारच्या वनौषधी आणि त्यांचे उपयोग सांगितलेले आहेत. कामशास्त्र, स्थापत्य, योगशास्त्र यावरही भरपूर लेखन केले गेलेले आहे.
आता आपण हिंदूंच्या प्रमुख ग्रंथाविषयी पाहू. हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथाला दोन भागांमध्ये वाटले आहे. ज्यामध्ये पहिले श्रुती आणि दुसरे विश्रुती सांगितले जाते. श्रुतीमध्ये वेद येतात आणि विश्रुतीमध्ये पुराण, महाभारत,रामायण येते. आणि विश्रुती , श्रुती अगोदर येते. हिंदूंचे धर्मग्रंथ वेद आहेत , की जे चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद आणि वेदांचे सार हे उपनिषद आहेत. उपनिषदाचे सार गीता आहे.
धर्मग्रंथ केवळ श्रुतीलाच मानले जाते , विश्रुतीला नाही. आणि वेदांमध्येही सुरुवातीला ऋग्वेदच आहे. ऋग्वेदनंतर यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेदाची निर्मिती झाली. ऋग्वेद हा हिंदूंचा एकमात्र धर्मग्रंथ आहे. त्यानंतर उपवेद येतात. जसे ऋग्वेदाचा आयुर्वेद. यजुर्वेदाचा धनुर्वेद. सामवेदाचा गंधर्ववेद आणि अथर्ववेदाचा विस्थापत्य वेद. असे क्रमाने मुख्य वेदांचे उपवेद येतात.
हिंदू धर्मात अनेक पवित्र ग्रंथ आहेत. उदा. गीता, गुरुचरित्र, शिवलीला अमृत, रामायण, नवनाथ ग्रंथ, गरुड पुराण इ या ग्रंथांच्या वाचण्याने सुद्धा मानवी जीवनात कल्याण झालेले आढळते. तसेच हनुमान चालिसा, रामरक्षा, गणेश स्तोत्र, श्री सूक्त यांच्या वाचण्यानेही अनेक अडचणी दूर होऊन मानवी मनास बळकटी मिळते. तसेच अनेक प्रभावी मंत्र सुद्धा आहेत उदाहरणार्थ गायत्री मंत्र, शनि मंत्र , मृत्युंजय मंत्र इत्यादी.
हिंदू धर्म जसा पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो तसेच भूत, प्रेत, पिशाच्च, करणी, भानामती काळी जादू यावरही विश्वास ठेवतो. याचे दाखले पुरातण काळातही पाहायला मिळतात आणि आजही काही प्रमाणात अशा गोष्टी ऐकायला मिळतात. काही क्रूर प्रथा हिंदू धर्मात होत्या परंतु जनजागृती आणि सरकारच्या हस्तक्षेपामुळे त्या बंद झाल्या आहेत. उदा. सतीची चाल, नरबली, बालविवाह, विधवांचे केशवपन इ.
हिंदू धर्मात दान, पुण्यालाही फार महत्त्व आहे. पुराणांमध्ये अन्नदान,वस्त्रदान, धनदान, विद्यादान यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. वेदांमध्ये तीन प्रकारचे दाता सांगितले आहेत. उत्तम, मध्यम आणि निमतम. हिंदू यज्ञा विषयी पाहिले तर यज्ञाचे पाच प्रकार पडतात. ब्रह्म यज्ञ,देव यज्ञ,पितृ यज्ञ, वैश्वदेव यज्ञ, अतिथी यज्ञ. हिंदू धर्मामध्ये जीवन जगण्याच्या पद्धतीवर भर दिलेला आहे. या जीवन पद्धती चार पुरुषार्थ आणि चार आश्रमावर आधारित आहेत. चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, कर्म,काम आणि मोक्ष आहेत.
आता आपण हिंदू धर्मातील सिद्धांताचा विषय पाहू. हिंदू धर्मात अनेक सिद्धांत आहेत परंतु 10 सिद्धांत मुख्य मानले जातात. 1) षट कर्म सिद्धांत ( नित्य,नैमित्य,काम्य, निष्काम्य, संचित किंवा निषिद्ध )2) पंच ऋण सिद्धांत ( देव,ऋषी, पितृ, अतिथी किंवा जीव ऋण 3) पुरुषार्थ सिद्धांत( धर्म,अर्थ,काम,मोक्ष ) 4) अध्यात्मवाद सिद्धांत 5) अमर आत्मा सिद्धांत 6) ब्रह्मवाद सिद्धांत 7) आश्रम सिद्धांत ( ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यास ) 8) मोक्ष मार्ग सिद्धांत 9) व्रत किंवा संध्यावंदन सिद्धांत10) अवतारवाद सिद्धांत तसेच हिंदू धर्मामध्ये अनेक सांप्रदाय आहेत. प्रत्येक सांप्रदाय एका विशिष्ट देवतेला मानतो आणि भक्ती करतो. हिंदू धर्मामध्ये प्रार्थनेचेही काही प्रकार आहेत , जसे की पूजा,आरती, भजन, कीर्तन, पूजन, प्रवचन, ध्यान साधना इत्यादी.
हिंदू तीर्थांमध्ये चारधाम,बारा ज्योतिर्लिंग,अमरनाथ, कैलास नाथ सरोवर, बावन्न शक्तिपीठे, आणि सप्तपुरी यात्रेचेही महत्त्व आहे. आयोध्या, मथुरा, काशी,जगन्नाथ, आणि प्रयाग तीर्थांमध्ये सर्वोच्च आहेत. प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाणे गरजेचे आहे. पुराणामध्ये उल्लेख केलेल्या देवांच्या मंदिराला मंदिर मानले जाते. कुठल्या बाबांच्या समाधी किंवा इतर ठिकाणाला मंदिर मानत नाही. मंदिराचा अर्थ आहे मनापासून दूर एक ठिकाण. मंदिरामध्ये संध्या उपासना केल्या जातात.
हिंदू धर्म हा एक शांतवादी धर्म आहे आणि एक चांगली जीवन पद्धती आहे. येथे धर्म पालन आणि आचरणावर जबरदस्ती केली जात नाही. प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. इतर धर्मियांना धर्म परिवर्तनसाठी आग्रह केला जात नाही. स्वतःच्या मर्जीने कोणीही हिंदू धर्म स्वीकारू शकतो किंवा सोडू शकतो कुणालाही त्याचे बंधन नाही. एकंदर हिंदू धर्म हा पूर्वीपासूनच एक महान धर्म आहे आणि तो कायम राहील.