हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa ) हि संत तुलसीदास यांनी लिहिली आहे . बऱ्याच वेळा आपण हनुमान चालिसा वाचतो पण आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो. हनुमान चालीसा आपल्याला पूर्णपणे समजावी म्हंणून खाली अर्थासहित दिली आहे.
।। दोहा ।।
श्री गुरु चरन सरोज रज, निज मन मुकुरू सुधारि ।
बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारि ।।
बुद्धिहीन तनु जानिके , सुमिरौ पवन कुमार ।
बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।
।। चौपाई ।।
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहु लोक उजागर ।।
अर्थ –
जय हो हनुमान, तू ज्ञानाचा आणि सद्गुणांचा सागर आहेस! जय हो कपिस म्हणजे वानर कुळाच्या राजा. तू तिन्ही जगाला प्रकाशमान करणारा आहेस .
रामदूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवन सुत नामा ।।
अर्थ –
रामदूत म्हणजे रामाचा दूत. अतुलीत बल धामा म्हणजे अमाप शक्ती असणारा. अंजनीचा आईचा पुत्र तू. आणि पवन म्हणजे हवेत उडणारा तसेच वायूचा तू पुत्र आहेस.
महावीर विक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ।।
अर्थ –
हे महावीर! तू शक्तिशाली आहेस आणि विजेसारखे लखलखनारे तुझे शरीर आहे. तू वाईट विचारांच्या लोकांना दूर करतोस आणि चांगल्या बुद्धिमत्तेच्या लोकांना तू मदत करतोस.
कंचन बरन बिराज सुवेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ।।
अर्थ –
हनुमानाच्या शारीरिक सौंदर्याचे आणि दिव्य स्वरूपाचे वर्णन यामध्ये केलेले आहे. हा श्लोक हनुमानजींच्या सोनेरी रंगाची कांचन म्हणजे कुंडलांची,त्यांच्या सुंदर वस्त्रांची, आणि त्यांच्या कुरळ्या केसांची शोभा दर्शवतो.
हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
कांधे मूंज जनेऊ साजै ।।
अर्थ –
हनुमानच्या हातात वज्र आणि ध्वजा शोभत आहे, आणि खांद्यावर मौंजी म्हणजे मूंज जनेउ सजले आहे.
शंकर सुवन केसरी नन्दन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ।।
अर्थ –
हे हनुमंत राया तुम्ही शंकराचा अवतार आहात तसेच केसरीचा नंदन म्हणजे पुत्र आहात. म्हणून तुमचे तेज आणि तुमचा प्रताप जगभर वंदनीय आहे. प्रख्यात आहे आणि पूजनीय आहे.
विद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ।।
अर्थ –
हनुमान हे प्रखंड विद्या निधान आहे. ते सर्व गुणांनी परिपूर्ण आणि अत्यंत चतुर आहेत. राम भक्ती करण्यासाठी ते फार आतुर आहेत.
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ।।
अर्थ –
हनुमंत प्रभू रामाच्या कथा ऐकण्यासाठी फार आतुर आहेत. त्यांच्या मनात राम, लक्ष्मण आणि सीता वास करत आहेत.
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
विकट रूप धरि लंक जरावा ।।
अर्थ –
हनुमंत रायांनी सीतेला दर्शन देण्यासाठी फार लहान रूप धारण केले होते तर लंका जाळण्यासाठी फार मोठे रूप धारण केले होते.
भीम रूप धरि असुर संहारे ।
रामचंद्र जी के काज संवारे ।।
अर्थ –
हनुमानाने भिमाचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांची कामे भक्त हनुमान करत होते.
लाय संजीवन लखन जियाये ।
श्री रघुबीर हरषि उर लाये ।।
अर्थ –
हनुमानाने संजीवनी आणून लक्ष्मणाला जीवदान दिले त्यामुळे प्रभू श्रीराम यांच्या हृदयात त्यांना स्थान मिळाले.
रघुपती किन्हीं बहुत बडाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ।।
अर्थ –
हनुमंत रायाच्या नितांत भक्ती मुळे आणि श्रद्धेमुळे प्रभू श्रीराम आणि त्यांची खूप प्रशंसा केली आणि हनुमानाला भरताप्रमाणे आपले बंधू मानले.
सहस बदन तुम्हरो यस गावै ।
अस कहि श्रीपति कंठ लगावै ।।
अर्थ –
प्रभू श्री रामा ने हनुमानाचे गुणगान गाताना हजारो मुखांनी तुझे गुणगान गाता येणार नाही असे म्हणत त्यांनी हनुमानाला आपल्या हृदयाशी जोडले.
सनकादिक ब्रह्मादि मुनिसा ।
नारद सारद सहित अहीसा ।।
अर्थ –
सनदीकां प्रमाणे म्हणजे सनंदन सनातन आणि सनत कुमार म्हणजेच ब्रह्मादी ऋषी व नारद, सरस्वती आणि शेषनाग सुद्धा हनुमानाच्या गुणगान गातात.
जम कुबेर दिकपाल जहां ते ।
कवि कोविद कहि सके कहां ते ।।
अर्थ –
म्हणजे मृत्यू देव यम, संपत्ती देव कुबेर आणि दिशांचे रक्षक दिगपाल यांच्यापेक्षाही हनुमान श्रेष्ठ आहेत. त्यांची स्तुती कवी आणि विद्वान सुद्धा करू शकत नाहीत.
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ।।
अर्थ –
तुमचे एवढे उपकार आहेत की तुम्ही सुग्रीवराला रामाशी भेटवून त्यांना राजा बनवले.
तुम्हरो मन्त्र विभीषण माना ।
लंकेश्वर भये सब जग जाना ।।
अर्थ –
प्रभू श्री रामाचे उपदेश विभीषणाने सुद्धा मानले म्हणून ते लंकेश्वर झाले, राजाधीश झाले.
जुग सहस्त्र योजन पार भानू ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ।।
अर्थ –
युग म्हणजे 12000 वर्षाचे सहस्र म्हणजे 1000 आणि योजन म्हणजे आठ मैल दूर असलेल्या सूर्याला सुद्धा तुम्ही गोड फळ म्हणून खायला चालले होते.
प्रभू मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लांघि गये अचरज नाहीं ।।
अर्थ –
प्रभू श्रीराम ने दिलेली अंगठी मुखात ठेवून हनुमानाने समुद्र पार केला यामध्ये विशेष वाटण्यासारखे काही नाही कारण तुमचे सामर्थ्य फार मोठे आहे.
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगमानुग्रह तुम्हरे तेते ।।
अर्थ – जगामध्ये जी काही सर्व अवघड कामे आहेत ती तुमच्या कृपेने सहज शक्य होतात.
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ।।
अर्थ –
भगवान श्री प्रभू रामाचे तुम्ही द्वारपाल आहात. तुमच्या कृपेशिवाय आम्ही प्रभू श्रीराम जवळ जाऊ शकत नाही.
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रक्षक काहु को डरना ।।
अर्थ –
तुमच्या चरणावर नतमस्तक होणाऱ्या भक्ताचे तुम्ही रक्षण करता व त्याला सर्व सुखे देता त्यामुळे इतर कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज उरत नाही.
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनहु लोक हांक ते कांपै ।।
अर्थ –
तुमची तेज किंवा वेग महाभयंकर आहे ते इतर कोणी थांबू शकत नाही. तुम्हाला तिन्ही लोक घाबरतात.
भूत पिशाच निकट नहिं आवै ।
महावीर जब नाम सुनावै ।।
अर्थ –
पूजनीय हनुमानाच्या भक्तीमुळे भुता खेताचे भय उरत नाही. तुमच्या नामस्मरणामुळे वाईट शक्ती दूर पळून जातात.
नासे रोग हरे सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत वीरा ।।
अर्थ –
हनुमानाच्या भक्तीमुळे सर्व दुःख आणि रोग नाहीसे होतात. त्यामुळे सतत हनुमान जप करावा.
संकट ते हनुमान छुडावै ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ।।
अर्थ –
जो तन, मन आणि ध्यानाने हनुमंत रायाची पूजा करतो त्याची सर्व संकटातून मुक्ती होते.
सब पार राम तपस्वी राजा ।
तिनके काज सकल तुम साजा ।।
अर्थ –
प्रभू श्रीराम तपस्वी राजे होते त्यांच्या कृपेने हनुमानाची सर्व कामे पूर्ण झाली.
और मनोरथ जो कोई लावै ।
सोई अमित जीवन फल पावै ।।
अर्थ –
नितांत श्रद्धेने जो कोणी आपल्याकडे इच्छा व्यक्त करील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
चारों जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ।।
अर्थ –
चारही युगामध्ये तुमचा प्रताप दिसतो म्हणून तुमचे यश जगप्रसिद्ध आहे.
साधु संत के तुम रखवारे ।
असुर निकंदन राम दुलारे ।।
अर्थ –
तुम्ही साधुसंतांचे रक्षक आहात आणि रामाचे लाडके भक्त आहात.
अष्ट सिद्धि नव निधि के दाता ।
अस वर दीन जानकी माता ।।
अर्थ –
तुम्ही आठ सिद्धी व नव निधींचा दाता आहात. असा वर तुम्हाला सीतामातेकडून म्हणजे जानकी माते करून मिळाला आहे.
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ।।
अर्थ –
तुमच्याकडे श्रीराम हे नामस्मरण सर्व दुःख निराकरण करण्याचे मंत्र आहे. म्हणून तुम्ही श्रीरामाचे दास आहात.
तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ।।
अर्थ –
तुमचे भजन केल्याने आम्हाला श्रीराम भेटतात. आणि जन्मोजन्मीचे दुःख आमचे नष्ट होतात.
अन्तकाल रघुबर पुर जाई ।
जहां जन्म हरि भक्त कहाई ।।
अर्थ –
मृत्यूनंतर रामधामी म्हणजे वैकुंठी जावे लागते. तुमची भक्ती केल्यामुळे तिथे सुद्धा आम्हाला हरिभक्त म्हणून ओळखले जाईल.
और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेई सर्व सुख करई ।।
अर्थ –
हनुमानाची भक्ती केली तर इतर कोणत्याही देवाची पूजा करण्याची गरज नाही. हनुमानाची भक्ती केल्याने सर्व सुखे प्राप्त होतात.
संकट कटे मिटे सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ।।
अर्थ –
जो हनुमानाचे नामस्मरण करतो त्याची सर्व दुःख किंवा संकटे नष्ट होतात.
जय जय जय हनुमान गोसाई ।
कृपा करहु गुरु देव की नाई ।।
अर्थ –
भक्त पुन्हा पुन्हा श्री हनुमान यांचा जय जयकार करतो. कारण ते भक्तांचे रक्षण करतात. पुन्हा भक्त हनुमानाला प्रार्थना करतात की एखाद्या गुरुप्रमाणे तुम्ही आमच्यावर कृपा करा.
जो शत बार पाठ कर कोई ।
छूटहिं बंदि महा सुख होई ।।
अर्थ –
जो कोणी शंभर वेळा हनुमान चालीसा चा पाठ करेल तो सर्व बंधनातून मुक्त होऊन त्याला महासुख मिळेल.
जो यह पढे हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ।।
अर्थ –
तसेच जो कोणी हनुमान चालीसा चा नियमित पाठ करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होऊन यश मिळेल. गौरी सा म्हणजे भगवान शिव शंकर याचे साक्षीदार आहेत.
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मंह डेरा ।।
अर्थ –
या काव्यातून कवी तुलसीदास म्हणतात की, मी कायमस्वरूपी रामाचा दास आहे. म्हणून हे हनुमान तुम्ही माझ्या हृदयात कायमस्वरूपी वास करा.
।। दोहा ।।
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ।।
पवन सुत हनुमान की जय । सियाबर रामचंद्र की जय ।
लाडले लखन लाल की जय । सब संतन की जय ।
जय जय जय जय जय