हाजी अली दर्गा | Haji Ali Darga

मुंबईमध्ये वरळीच्या दक्षिणेकडील समुद्रकिनारी पाण्यातील एका छोट्याशा टेकडीवर हाजी अली दर्गा (Haji Ali Darga ) म्हणजेच मस्जिद फार प्रख्यात आणि धार्मिक आहे. इस 1431 मध्ये सय्यद हाजी अली शाह बुखारी ( Sayyad Haji Ali Shah Bukhari ) यांची स्मृती म्हणून बांधण्यात आलेला हा दर्गा सध्या सुंदर इंडो इस्लामिक वास्तुकलेचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. हाजी अली शाह बुखारी यांची समाधी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आणि धार्मिक आहे. खूप वर्षांपूर्वी मुंबईमध्ये मोठा पाऊस होऊन मुंबईतील लाखो घरे पाण्याखाली बुडाली होती.

परंतु या दर्ग्याचे पाण्यामुळे काहीच नुकसान झाले नव्हते. हे सर्व हाजी अलीच्या कृपेमुळे आहे असे मानले जाते. या दर्ग्यानंतर असा समुद्रात दर्गा कोठेही निर्माण झाला नाही.दर्ग्यापर्यंत समुद्रात जाण्यासाठी येथे एक रस्ता तयार केलेला आहे. जास्त पाऊस झाल्यानंतर आणि समुद्राच्या भरती ओहोटीमुळे बऱ्याच वेळा हा रस्ता पाण्याखाली जातो. मुंबई पाहायला गेल्यावर अनेक पर्यटक या दर्ग्याला भेट देतात. या दर्ग्यात जाऊन नमाज पठण आणि सेवा केल्याने हाजी अली त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी मुस्लिम बांधवांमध्ये मान्यता आहे. इतर धर्मातील लोकांनाही हाजी अलींचे अनुभव आलेले आहेत.

उजबेकिस्तान मधील स्थान मुशहर शहरात बुखारामध्ये हाजी अली यांचा जन्म सुमारे पाचशे वर्षांपूर्वी झाला होता. लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांची खूप काळजी घेतली होती. जेव्हा ते तरुण वयात आले तेव्हा ते अल्लाहची सेवा करण्यात दंग झाले होते. एक दिवस ते त्यांच्या आईला म्हणाले की मी अल्लाह आणि त्यांचे रसूल यांची सेवा करू इच्छित आहे. तसेच लोकांना या दिशेने वळवू इच्छित आहे. तू मला तशी अज्ञा कर आणि परवानगी दे. छातीवर दगड ठेवून त्यांच्या आईने त्यांना परवानगी दिली.

त्यानंतर हाजी आली साहेब आपल्या भावासोबत उझबेकिस्तान वरून जगभर प्रवास करून हिंदुस्थानातील मुंबई येथे पोहोचले. त्यांच्या नावासोबत बखारी लावण्याचे कारण म्हणजे ते बुखारा शहरात जन्मास आले होते. मुंबईला येण्या अगोदरही त्यांनी अनेक ठिकाणी धर्माचा प्रचार करत आपल्या लीलांनी अनेकांचे समाधान केले होते. मुंबईला आल्यानंतरही हाजी अली बखारी जेथे जातील तेथे लोकांना जमा करून इस्लाम धर्माचे महत्व पटवून देत होते. त्याबरोबरच ते मोठे मुस्लिम व्यवसायिक होते. तसेच ते अल्लाह सेवा शिकवत असत. एक दिवस त्यांनी त्यांच्या भावाला सांगितले की तू आता परत बुखारा कडे जा. मी आता तिकडे येऊ शकत नाही. मला अल्लाहने त्याच्या सेवेसाठी निवडले आहे.

आता मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अल्लाहची सेवा करेल. तसेच त्यांनी अशा अनेक गोष्टी एका चिठ्ठीमध्ये लिहून आपल्या भावाजवळ ती चिठ्ठी दिली व सांगितले की हे पत्र आपल्या आईला दे.असेच एका दंत कथेनुसार हाजी अली साहब एका रस्त्याने जात होते त्याच रस्त्यावर एक महिला रडत बसली होती. तिला त्यांनी रडण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली माझ्या हातातील सर्व तेल ठेच लागून सांडून गेले. आता मी घरी गेल्यानंतर माझा नवरा मला खूप मारेल.

हाजी अली यांनी तेल सांडल्याची जागा त्या बाईला विचारली तसेच त्या जागेवर त्यांनी स्वतःची बोटे रोउन सांडलेले सर्व तेल एकत्र होऊन बाहेर आले. तिने ते तेल आपल्या भांड्यात भरून घेऊन आनंदी होऊन घरी गेली. अशा अनेक लीलांचे प्रदर्शन मुंबई मध्ये हाजी अली यांनी घडवले होते.पुढे ते मुंबईमध्ये राहू लागल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी अनेक लोकांची मदत केली. तसेच धर्म प्रचार करून लोकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. अगदी छोट्या छोट्या समस्या घेऊन सुद्धा लोक त्यांच्याकडे जात असत. तसेच लोकांच्या कौटुंबिक समस्या आणि आजारावर सुद्धा हाजी आली साहेब निरसन करत असायचे. लोकांच्या अनेक समस्या ते सोडत असत. लोकांसाठी ते अल्लाह ला दुवा मागत असायचे.

हळूहळू त्यांची ख्याती दूरवर पसरली. अनेकांना हाजी अली साहेब यांच्या लीलांचे महत्त्व पटू लागले व लोकांना त्याचे अनुभव येऊ लागले. रोज शेकडो लोक हाजी अली यांच्या दर्शनासाठी येऊ लागले.
पुढे ज्यावेळी हाजी अली यांचे मरण जवळ आले आहे असे त्यांना कळताच त्यांनी सांगितले होते की माझ्या मृत्यूचे दफन न करता माझा देह समुद्रात सोडून द्यावा. त्यामुळे जेव्हा त्यांच्या अवतार कार्याचा संपण्याची वेळ जवळ आली तेव्हा त्यांनी आपल्या खास शिष्यांना बोलावले आणि सांगितले की मी गेल्यानंतर मला कफन घाला परंतु दफन करू नका.

त्यांच्या शिष्यांनी विचारले की हुजूर मग आम्ही तुमच्या शरीराचे काय करावे. हाजी अली यांनी सांगितले की माझे मृत शरीर समुद्राच्या पाण्यात सोडून द्या. समुद्राच्या पाण्यात जिथे माझा मृतदेह थांबेल तेथे मला दफन करा. शिष्यांनी विचारले की हुजूर समुद्रात आम्ही तुम्हाला कसे दफन करू शकतो तुमचा देह तेथे बुडेल. परंतु त्यांनी सांगितले की असे काहीही होणार नाही.तुम्ही मला समुद्रात सोडून द्या मग अल्लाहच्या कुदरतचा नजारा तुम्हीच पहा. शेवटी त्यांच्या शिष्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका ताबूत त्यांचे मृत शरीर बंद करून समुद्रात सोडून दिले. सोडल्यानंतर ही पेटी समुद्रात थोडी पुढे गेली व ज्या ठिकाणी हे मृत शरीर ठेवलेले ताबूत थांबले त्या ठिकाणी खाली समुद्रात जमिनीची एक टेकडी होती.

म्हणून त्या उंच खडकाळ भागावर हाजी अली यांचा एका लहानसा दर्गा बांधण्यात आला होता. पुढे या ठिकाणी जाण्यासाठी समुद्रात रस्ता तयार करण्यात आला. तसेच या दर्ग्याचे नवीन बांधकाम करून त्याला सुबक आकार देण्यात आला. इस 1431 मध्ये सर्वप्रथम हा दर्गा बनवण्यात आला होता मुंबई महालक्ष्मी मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर हा दर्गा आहे. 600 वर्षांपूर्वीचा हा दर्गा येथील तुफान वादळी वारे,भरती ओहोटी या सर्वांपासून नेहमी सुरक्षित असतो.

इस 1960 आणि 1964 मध्ये या दर्ग्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. शेवटी 2008 मध्ये या दर्ग्याचे संपूर्ण काम राजस्थान मधील मक्राना येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये पूर्ण करण्यात आले. त्यामुळे हा दर्गा पांढरा शुभ्र दिसतो. हाजी अली दर्ग्यावर काढण्यात आलेल्या “फिजा” चित्रपटातील “पिया हाजी अली” हे गीत फार प्रसिद्ध झाले आहे. या दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळतो.

Leave a Comment