श्री क्षेत्र पंढरपूर | Pandharpur

 महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर ( Pandharpur ) एक तालुका आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी पंढरपूर जवळ गेल्यानंतर अर्धचंद्राकृती आकार घेते म्हणून या नदीला पंढरपूरला चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपूर तालुक्याला प्राचीन काळात पुंडलिकपूर असेही म्हणत.मध्ययुगीन कानडीशिलालेखात त्याचा“पंढरी“असाही उल्लेख आहे. अकराव्या ते बाराव्या शतकात यादव राजांनी पंढरपूरच्या विठ्ठल … Read more

श्री क्षेत्र तुळजापूर | Shri Kshetra Tuljapur

तुळजापूर (Tuljapur) हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेले असून धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्ह्याचा तो एक तालुका आहे. माता तुळजाभवानीचे मंदिर असलेले हे तुळजापूर ( Tuljapur ) महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यापासून सुमारे  19  किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर या जिल्ह्याच्या शहरापासून 42 किलोमीटर दूर आहे. इतिहास आणि पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानलं जातं. तर काहींच्या मते … Read more

श्री क्षेत्र पैठण | Paithan

 महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण (Paithan) हे तालुक्याचे ठिकाण असून दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे शहर  वसलेले आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या या शहराचे पूर्वीचे नाव “प्रतिष्ठान“असे होते आणि ही पूर्वी सातवाहन राजाची राजधानी होती तर ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानात मोडत होते. तसेच पैठण हे संस्कृत भाषेचे व्यासपीठ होते. … Read more

श्री क्षेत्र गाणगापूर | GANGAPUR

कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपुर तालुक्यात भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाकाठी गाणगापूर ( Gangapur ) हे गाव आहे. श्री दत्तात्रय महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाला दत्तधाम म्हणतात. तसेच या मंदिराचे नाव श्री दत्त निर्गुण असेही आहे.या ठिकाणी श्री गुरुदेव दत्तांचा  दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते.म्हणून ते एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थ … Read more

श्री क्षेत्र अक्कलकोट | Shri Kshetra Akkalkot

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि  कर्नाटक सीमेवर अक्कलकोट ( Akkalkot ) हा एक तालुका आहे. सोलापूर पासून 40 किलोमीटर असलेले हे शहर इतिहास काळात छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा गादीसोबतच उदयास आले. छत्रपती शाहूंचे मानसपुत्र राजे फत्तेहसिंह हे या संस्थानाचे पहिले राजे 1707 च्या काळामध्ये होऊन गेले. या काळातील त्यांचा किल्ल्यासारखा दिसणारा जुना राजवाडा अक्कलकोट गावामध्येच आहे. … Read more