बौद्ध ( Buddhism) धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांना आशिया खंडाचे ज्योती पुंज किंवा प्रकाश पुंज म्हटले जायचे (light of Asia ) गौतम बुद्धांचा जन्म इ.स. 563 मध्ये नेपाळमधील कपिलवस्तू येथील लुंबिनी नावाच्या शहरांमध्ये झाला होता. त्यांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ होते. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धोधन व आईचे नाव महामाया असे होते. त्यांच्या आईचा मृत्यू त्यांच्या जन्मानंतर सातव्या दिवशी झाला होता. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ त्यांची सावत्र आई प्रजापती गौतमी ने केला होता.
लहानपणापासून गौतम बुद्धांची अध्यात्माकडे ओढ होती. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह यशोधरा बरोबर करून दिला होता. पुढे काही दिवसातच त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव राहुल असे होते. ते ज्यावेळी जन्मले होते त्यावेळीच एका ऋषींनी त्यांची भविष्यवाणी केली होती. त्यामध्ये असे सांगितले होते की,तुमचा मुलगा मोठा होऊन एक संन्याशी होईल. हे ऐकून गौतम बुद्धांचे वडील राजा सिद्धोधन फार नाराज झाले. कारण त्यांना वाटत होते की, मोठे होऊन माझ्या मुलाने राजा बनावे. तेव्हा सिद्धोधन यांनी ठरवले की त्याला कुठलेही दुःख दिसू द्यायचे नाही म्हणजे तो वैराग्याच्या दिशेने जाणार नाही.
म्हणून त्यांनी त्यांच्या राजमहालामध्ये अशी व्यवस्था केली होती की, त्यांच्या विवाहापर्यंत त्यांनी म्हाताऱ्या माणसाला पाहिले नव्हते, आजारी माणसाला पाहिले नव्हते, कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू पाहिला नव्हता, आणि कोणत्याही संन्याशाला सुद्धा पाहिले नव्हते.
परंतु लग्नानंतर ते एकदा राज महालातून बाहेर पडले आणि आपल्या साम्राज्या मध्ये फिरण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या या भ्रमण काळात व्यक्ती व्यवस्थेच्या वरील चारही गोष्टींना पाहिले. सगळ्यात अगोदर त्यांनी अशा एका व्यक्तीला पाहिले की तो काठी घेऊन चालत होता. तेव्हा त्यांनी आपल्या सारथीला विचारले की हा व्यक्ती असा का चालत आहे.
तेव्हा त्यांच्या सारथीने सांगितले की हा व्यक्ती वयोवृद्ध झाला आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या सारथीला विचारले की काय मीही वृद्ध होईल? सारथीने उत्तर दिले की हो युवराज प्रत्येक जण एक ना एक दिवस वृद्ध होणार आहे. त्यानंतर त्यांनी एका आजारी माणसाला पाहिले. पुढे त्यांनी एका मेलेल्या व्यक्तीस पाहिले. त्यानंतर त्यांना कळाले की माणसे मरतात देखील. तेव्हा त्यांनी आपल्या सारथीला विचारले की काय मी पण मरेल? सारथी ने उत्तर दिले हो युवराज जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस मरण अनिवार्य आहे. त्यानंतर त्यांनी चौथ्या अशा एका व्यक्तीला पाहिले की ते समाधी लावून बसलेले होते. तेव्हा त्यांनी सारथीला विचारले की हे काय करत आहेत.
सारथीने उत्तर दिले की हे संन्यासी आहेत. हे ईश्वराचे नामस्मरण करत आहेत जे करून त्यांना त्यांच्या दुःखापासून मुक्ती मिळेल.
अशा प्रकारे या चारही प्रकारच्या माणसाच्या स्थिती पाहून गौतम बुद्धांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि ते संन्याशी स्वरूपाकडे आकर्षित झाले. मग पुढे त्यांनी संसारीक समस्यांनी व्यथित होऊन वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला. ज्याला बौद्ध धर्मामध्ये “महाभिनिष्करमण “ असे म्हणतात.पुढे गौतम बुद्ध ज्ञान मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागले. असे भ्रमण करत असताना त्यांना अलार कलाम भेटले. त्यांनाच गौतम बुद्धांनी आपले पहिले गुरू करून घेतले.
पुढे त्यांनी अलार कलाम यांच्याकडून सांख्य दर्शनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर महात्मा बुद्ध ने आपल्या पाच मित्रांसोबत सारनाथ अरण्यात कित्येक वर्षे तपचर्या केली. परंतु त्यातूनही त्यांना काही ज्ञान मिळाले नाही. त्यानंतर महात्मा बुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी बिहार मधील गया येथे गेले. तेथे कठीण तपचर्येनंतर वयाच्या 35 व्या वर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री निरंजना नदीकाठी पिंपळवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून पिंपळाच्या झाडाला बौद्धि वृक्ष असे म्हणतात. पुढे ज्ञान प्राप्तीनंतर त्यांना सिद्धार्थ बुद्ध असे नाव पडले. आणि त्या ठिकाणाला बोधगया असे नामकरण झाले.
सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपला प्रथम उपदेश “सारनाथ” या ग्रंथातून दिला.ज्याला बौद्ध ग्रंथात “धर्मचक्र प्रवर्तन” असे म्हणतात. हा उद्देश त्यांनी पाली भाषेत दिला होता. पुढे त्यांनी आपले सर्वाधिक उपदेश कौशल देशाची राजधानी “श्रावस्ती”मध्ये दिले. त्यांनी त्यांच्या उद्देशांमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे सत्य कथन केले होते. ते म्हणजे
1) संसार दुःखाने भरलेला आहे. 2) प्रत्येक दुःखाचे काही ना काही कारण आहे. 3) सर्व दुःखाचे सर्वात मोठे कारण इच्छा आहे.आणि 4) या इच्छेवर नियंत्रण आणता येते. तसेच
बौद्ध धर्माचे त्रिरत्न आहेत – 1) बुद्ध 2) संघ आणि
3) धम्म.
हे त्रिरत्न म्हणजेच बुद्धम् शरणम् गच्छामि, संघम शरणम् गच्छामि आणि धम्मम शरणम् गच्छामि. महात्मा बुद्धांचे परम अनुयायी बिंबिसार, प्रसेनजित आणि उदयिन हे होते. हे राजा होते आणि महात्मा बुद्धांचे ते प्रमुख अनुयायी होते. बुद्धांचे अनुयायी दोन भागांमध्ये विभाजित केलेले होते. पहिला म्हणजे “भिक्षुक” आणि दुसरा “उपासक”. भिक्षुक मध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करणारे आणि संन्याशी असणारे होते. तसेच उपासक मध्ये गृहस्थ जीवन जगणारे परंतु बौद्ध धर्म स्वीकारणारे होते. तसेच बौद्ध धर्मात सामील होण्यासाठी कमीत कमी पंधरा वर्षे वय असणे गरजेचे होते.
अशा या बौद्ध धर्मात जन्माचे प्रतीक कमळ आणि सांड , गृह त्यागाचे प्रतीक घोडा, ज्ञानाचे प्रतीक पिंपळ वृक्ष म्हणजे बौद्ध वृक्ष, निर्वांणचे प्रतीक पदचिन्ह आणि मृत्यूचे प्रतीक स्तूप आहे. पुढे वयाच्या 80 व्या वर्षाच्या अवस्थेत गौतम बुद्धांचे इ.स.483 मध्ये कुशीनगर मध्ये निधन झाले. या दिवसाला “महापरिनिर्वाण”असे म्हणतात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शरीराचे अवशेष भारतातील विशेष आठ जागेवर स्थापित करून तेथे स्तूप निर्माण केले गेले. जसे की, राजा सम्राट अशोक ने तयार केलेला सांचीचा स्तूप.
पुढे महात्मा बुद्धांच्या मृत्यूनंतर बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी चार बौद्ध सांगिती चे आयोजन केले गेले. पहिली इ. स.483 ला राजगीर मध्ये राजा अजातशत्रू आणि पुरोहित महाकश्यप असताना, दुसरी इ.स. 383 ला वैशाली मध्ये राजा कालाशोक आणि पुरोहित सबाकामी असताना, तिसरी इ.स. 255 ला पाटलीपुत्र मध्ये राजा अशोक आणि पुरोहित मोगलीपुत व तिस्स असताना आणि चौथी पहिल्या इ. स. मध्ये कुंडलवन मध्ये राजा कनिष्क आणि पुरोहित वसुमित्र व अश्वघोष असताना झाले होते
बौद्ध धर्माचे दोन भाग हिनयान आणि महायान –
त्यानंतर चौथ्या बौद्ध सांगिती नंतर बौद्ध धर्म “हीनयान “आणि “महायान” या दोन भागांमध्ये वाटला गेला. या दोन्ही भागांमध्ये लोक पुढे आपापल्या पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करू लागले. पहिला हिनयान हे बौद्ध धर्माचे प्राचीन रूप आहे. आणि महायान हे बौद्ध धर्माचे नवीन रूप आहे. हिनयान वाले बौद्ध धर्माचा कठीण मार्ग अवलंबतात आणि हे निर्वांण प्राप्ती करू शकतात. म्हणजेच मोक्षप्राप्ती मिळू शकतात. परंतु हा कठीण मार्ग असल्यामुळे फार कमी लोक निर्वाणप्राप्ति करू शकतात. तर महायान मार्ग सरळ आणि सोपा मार्ग आहे. या मार्गाने जास्तीत जास्त लोक निर्माण प्राप्ती करू शकतात.
हीनयान गौतम बुद्धांना अलौकिक गुणप्राप्त पुरुष मानतात. आणि महायान गौतम बुद्धांना भगवान मानतात. त्याचप्रमाणे हीनयान वाले लोक बुद्धांच्या प्रतीकांची पूजा करतात आणि महायानवाले बुद्धांच्या मूर्तीची पूजा करतात. तसेच हीनयान लोकांचे ग्रंथ पाली भाषेत रचलेले आहेत आणि महायान लोकांचे ग्रंथ संस्कृत भाषेत रचलेले आहेत. तसेच हीनयान कर्माने धर्मावर विश्वास करतात तर महायान परोपकारावर म्हणजेच दुसऱ्यांना मदत करण्याच्या पुण्य कामावर विश्वास करतात. त्याचप्रमाणे हिनयान वाल्यांचा प्रचार प्रसार लंका, ब्रह्मा,कंबोडिया आदी देशांमध्ये झाला.तर महायान वाल्यांचा प्रचार प्रसार चीन,तिब्बत, जापान, कोरिया अशा देशांमध्ये जास्त झाला. अशा प्रकारे हीनयान आणि महायान यामध्ये फरक आहे.
बौद्ध धर्माचे साहित्य –
त्रिपिटक – हे बौद्ध धर्माचे साहित्य मूळ पाली भाषेत रचलेले असून हे तीन प्रकारचे आहेत. म्हणून याला त्रिपिटक असे म्हणतात.
1) विनयपिटक – यामध्ये भिक्षू किंवा भिक्षीनी यांच्या आचरणाविषयीचे नियम आहेत.
2) सूत-पिटक – यामध्ये बौद्ध धर्माचे उपदेश संकलित केलेले आहेत.
3) अभीधम्म पिटक – यामध्ये बौद्ध धर्माच्या प्राथमिक व्याख्या दिलेल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग कथावस्तू हा आहे.
जातक कथा – हे बौद्ध धर्माचे साहित्य मूळ पाली भाषेत रचलेले असून यांची संख्या 549 इतकी आहे. यामध्ये बुद्धांच्या पूर्व जन्माच्या कथा आहेत.
बुद्ध चरित्र – बौद्ध धर्माच्या या साहित्याची रचना संस्कृत भाषेत झालेली असून अश्वघोष यांच्याद्वारे हे महाकाव्य तयार केले गेले आहे. याला बौद्ध धर्माचे रामायण असे सुद्धा म्हणतात.
धम्मपद – बौद्ध धर्माच्या या साहित्याला बौद्ध धर्माची गीता म्हटले जाते. हे साहित्य पाली भाषेत रचलेले आहे.

बौद्ध धर्म हा एक शांतता आणि अहिंसा वादी धर्म आहे. या धर्माची तत्वे खूप चांगली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांना बौद्ध धर्माची शिकवण आवडली. म्हणून त्यांनी नागपूर मध्ये दीक्षाभूमी येथे 14 आक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला . बाबासाहेबांसोबत त्यांच्या अनेक अनुयायांनीही बौद्ध धर्म स्वीकारला ,त्यात फक्त दलितच नाहीत तर अनेक उच्च जातींचे हिंदूही होते. आणि ही घटना त्यांच्या मृत्यूच्या फक्त एक आठवडा घडली होती. त्यानंतर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार वेगाने झाला.

जगातल्या अनेक देशांत विशेष करून आशिया खंडात बुद्धाचे मोठमोठे पुतळे पाहायला मिळतात. थायलंड मध्ये सर्वात जास्त बौद्ध धर्मीय लोक राहतात. फार पूर्वी बौद्ध धर्माचा प्रसार हा अफगाणिस्तान पासून तर थेट जपान पर्यंत झालेला आढळतो. अफगाणिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असले तरी तेथेही बौद्ध लेणी आढळून आली आहेत. आपल्या कडे अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजे, घारापुरी येथे बौद्ध लेणी पाहायला मिळतात. चीन मध्येही असा प्रकारची लेणी आहेत. ही लेणी म्हणजे शिल्प कलेचा सुंदर नमुना आहे.
या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्षुक आपली साधना करत आणि त्याचबरोबर लेणी कोरण्याचे कामही चालू असे. या लेण्या म्हणजे मानवनिर्मित आश्यर्यच आहे आणि त्या आता जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली आहेत.