ज्ञानेश्वरी ग्रंथसार | Dnyaneshwari Granthsar

 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ( Sant Dnyaneshwar Maharaj ) म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या अपार कार्यकर्तुत्वाने सकल संत जनांमध्ये माऊली या यथार्थ नावाने गौरवण्यात आलेलं अद्वितीय नाव. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी” अवघाची संसार सुखाचा करीलl आनंदे भरील तिन्ही लोकll असं म्हणत आपल्या अमृतवर्षी शब्दांनी अमोघ वाणीने ज्ञानदेवांनी संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य भरले. भगवद्गीता हा समस्त हिंदूंचा पथदर्शी धर्मग्रंथ आहे.

परंतु संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे तो सर्वसामान्यांना समजू शकत नव्हता. गीतेचे हे अमूल्य तत्त्वज्ञान सर्वस्रोत व्हावं, तुम्हा आम्हाला सहजगत्या उमजाव या उदात्त हेतूने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी तत्कालीन मराठी भाषेत ही गीता अनुवादित केली.ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari ) हा ग्रंथ एकदा वाचून उमजत नाहीत. प्रत्येक वेळेस वाचून झाल्यावर आपल्या तो नव्याने समजतो आणि नवीन काहीतरी ज्ञानात भर पडत राहते. माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि आधुनिकीकरणामुळे आज जग खूप जवळ आले आहे.

त्यामुळे Globle village ही नवीन संकल्पना रूढ झाली आहे पण माऊली ज्ञानेश्वरांनी 13 व्या शतकातच ही संकल्पना मांडली होती. हे विश्वची माझे घर | ऐसी जयाची मती स्थिर | किबहुना चराचर |आपणची जाहला | या ओवीतून त्यांनी विश्वबंधूत्वाची संकल्पना मांडली आहे. संपूर्ण जगच आपले घर आहे असे ते म्हणतात. एवढा उदात्त विचार त्या काळी मांडणे म्हणजे त्यांना योगसामर्थ्याने पुढील भविष्य काळाची आणि मानवी प्रगतीची जाणीव झाली असावी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्याला अनेक भाषामध्ये पाहायला मिळतो.

 माऊली रचित भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीला काही अभ्यास गीतेची टीका तर काही स्वतंत्र ग्रंथ मानतात. ही झाली मतमतांतरे. परंतु भगवान श्रीकृष्णांनी धनुर्धर अर्जुनाला आणि त्रैलोक्याला केलेला उपदेश ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत सुलभतेने सांगितला हे त्रिवार सत्य आहे. वास्तविक पाहता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या, ठेचकळणाऱ्या या मराठी मुलखात सातशे वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने समतेचे बीज पेरलं. आणि साहित्य क्रांती घडवत प्रवाहाविरुद्ध जाऊन भगवत गीतेचे अनमोल तत्वज्ञान मराठी मध्ये सर्वांना सहज समजेल अशा रीतीने मांडलं.

वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ अर्थात भावार्थ दीपिका म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि हीच ज्ञानेश्वरी आपणही थोडक्यात समजून घेऊ यात. ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा ||१-१|| देवा तुची गणेशु l सकलार्थ मती प्रकाशु l म्हणे निवृत्ती दासू l अवधारी जो जी ll अशाप्रकारे सर्वांचे मूळ असलेल्या तसेच वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असनाऱ्या ओंकाराला नमस्कार करून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ केला. आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत होत नाही. आत्मा हा अमर आहे. त्यामुळे आपण विनाकारण का काळजी करता. तुम्हाला कशाची भीती आहे.

कोण तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण एक अविनाशी आत्मा आहोत.अविनाशी शरीर नाही. शरीर हे पाच घटकांनी अर्थात पंच महाभूतांनी बनलेले आहे. पृथ्वी, अग्नी, जल,वायू आणि आकाश. एक दिवस याच घटकांमध्ये आपले शरीर विलीन होऊन जाणार आहे. आज जे आपले आहे ते भूतकाळात दुसऱ्या कोणाचे तरी होते. आणि भविष्यात ते आणखी कोणाचे तरी होणार आहे. बदल हा विश्वाचा नियम आहे. आणि तो होतच राहणार आहे. जगात येताना तुम्ही काय घेऊन आलात कि जे हरवले आहे.तुम्ही काय निर्माण केलं कि जे नष्ट झाले.

जन्माला येते वेळी तुम्ही काहीच बरोबर आणले नाही. तुझ्मच्याजवळ सर्व आहे फक्त या भूमीवर असताना ते देवाकडून प्राप्त झाले आहे. तू देशील ते देवाला देईल. प्रत्येक जण पृथ्वीवर येताना रिक्तहस्त आला आहे. आणि त्याच प्रकारे तो जाणार आहे. येथे सर्व काही फक्त देवाचेच आहे. भूतकाळात जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. आता जे काही घडतंय तेही चांगल्यासाठीच घडतंय. आणि पुढेही जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणूनच झालेल्या गोष्टींसाठी रडू नका. भविष्याची काळजी करू नका फक्त आपल्या वर्तमानात जगा.आणि तिथेच लक्ष केंद्रित करा. बदल हा विश्वाचा नियम आहे.

आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करतोय. खरंच जीवन आहे? उदाहरणार्थ आपण एका क्षणी लक्षाधिश असू शकतो.तर दुसऱ्याच क्षणी आपण गरिबीकडे ओढले जाऊ शकतो. तुझे माझे लहान मोठे या कल्पना आपल्या मनामधून काढून टाका. मग सर्व काही आपले आहे. आणि आपणही सर्वांचे आहोत. ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचा घमेंड आहे,जे दांभिक आहेत, अतृप्त वासनांनी घेरलेले आहेत अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते. अफाट चिंता असते. जी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते. अशा मनुष्यांना एकच मत असते ते म्हणजे सुखाची इच्छा करणे आणि हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट आहे.

हेच लोक अनेक आशावादांनी  बांधलेले असतात आणि लोभाचे गुलाम बनतात तसेच त्यांचा पूर्ण वेळ दुसऱ्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभारण्यात ते वाया घालतात. विवेकी मनुष्य स्वार्थी बंधनापासून मुक्त आहेत. त्याचे मन ज्ञानात मग्न अर्थात ज्ञानात गुंतलेले असते. असे मनुष्य त्यांचे सर्व कार्य सेवार्थी करतात. आणि त्यांचे कर्म ही नेहमीच इतरांना विसर्जित असते. सुज्ञ व्यक्ती आयुष्याच्या द्वानंदापलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात. कोणाशी स्पर्धा न करता यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयपणे  सामोरे जातात.

माझी मृत्यूवेळी आठवण करणारा मृत्यूनंतरही माझ्याकडेच येईल यात काहीही शंका नाही. मृत्यूच्या वेळी मन ज्याप्रकारच्या विचारांनी व्यापलेले असते त्यावर आलेल्या मृत्यूचे ठिकाण निश्चित केले जाते. नेहमी माझे ध्यान करा आणि संकटांशी लढत रहा. तुमच्या मनात नेहमी चांगला हेतू ठेवा म्हणजे खरोखर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. स्वतःला फक्त सर्व समर्थ देवाकडेच समर्पित करा जो नेहमी देवाच्या समर्थनेत असतो तो नेहमी भीती,चिंता,काळजी आणि निराशा यापासून स्वतंत्र असतो. लालसा ही सर्वात विनाशकारक आहे. जी आपल्या मनात एक साहित्यिक आवड निर्माण करते.

ज्याचा नंतर एक असह्य आणि प्रचंड रागात बदल होतो. जगात धगधगत्या पापी शत्रूंचा निर्माण याच कारणामुळे होतो. ज्या व्यक्तीस कोणत्याच शंका नसतात त्याला नेहमीच आंतरदृष्टी  आणि आत्मिक शांतता लाभलेली असते. आपण जे काही करतो ते नेहमी परमेश्वराला समर्पित करण्याच्या हेतूने करा. असे कार्य जीवनात प्रचंड आनंद आणि स्वातंत्र्याचा अनुभव देईल. काहींचा गैरसमज असतो की आज माझी ही इच्छा आहे उद्या दुसरी असेल. ही सर्व संपत्ती माझी आहे  आणि लवकरच मी आणखी मिळवेल. आज मी एका शत्रूला ठार केले लवकरच मी बाकीच्यांचाही अंत करेल.मीच परमेश्वर, मीच आनंदी, यशस्वी,थोर,श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे.

पृथ्वीवर माझी तुलना दुसऱ्या कोणाशी होणार नाही. सुख आणि दुःख हे कायम नसते. ते योग्य वेळीच येते जसे हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा हे ऋतू त्यांच्या योग्य वेळीच येतात. तसेच सुखदुःख येते ज्याचा उगम आपल्या आकलन शक्तीने होतो.म्हणून आपण अस्वस्थ न होता त्यांना सहन करण्यास शिकले पाहिजे. ज्या व्यक्ती सर्व अपेक्षांपासून आणि गैरसमजांपासून मुक्त आहेत. ज्यांचं मनावर आणि शरीरावर पूर्ण नियंत्रण आहे.

त्यांच्याकडून शारीरिकरित्या कुठलेही दुष्कृत्य होणार नाही. मृत्यूच्या वेळी जर परमेश्वराचे चिंतन केले तर त्या मनुष्यास देवाच्या आत्म्यात राहण्यास जागा मिळते. अर्जुनासारखे जर मृत्यूच्या वेळी कृष्णाचे ध्यान केले तर तो कृष्णात विलीन होऊन अमरत्व प्राप्त करेल.

1 thought on “ ज्ञानेश्वरी ग्रंथसार | Dnyaneshwari Granthsar”

Leave a Comment