भक्त सूरदास ( Bhakta Surdas Maharaj ) यांना भक्तिमार्गाचे सूर्य समजले जाते. कारण त्यांच्या भक्ति मार्गामुळे मनुष्यामध्ये भक्तीभावाचा संचार झाला. भगवान श्रीकृष्णाचे सर्वात मोठे भक्त म्हणून सूरदास यांचे नाव घेतले जाते. भक्त सूरदास महाराज यांचा जन्म काहींच्या मते इस 1478 मध्ये मथुरा आग्रा महामार्गावरील रूणकता गावी झाला होता. तर काहींच्या मते इस 1535 मध्ये दिल्लीच्या साहि नावाच्या गावात सारस्वत ब्राह्मण गरीब परिवारात झाला होता.
त्यांच्या सूरसागर ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांचे अवलौकिक वर्णन केले गेले आहे. त्यामुळे ते फार प्रसिद्ध झाले. त्यांच्या अपार कृष्ण भक्ती बरोबर काव्यरचना आणि गायनामुळे ते फार प्रसिद्ध होते. त्यांच्या हिंदी साहित्यामुळे आजही ते प्रख्यात हिंदी कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सुरसागर ग्रंथामधील भ्रमरगीत साहित्यिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो.ते जन्मताच आंधळे असल्यामुळे हळूहळू त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे अचानक एक दिवशी त्यांनी आपले घर सोडून काही दिवस आग्र्याजवळील ऋणकता येथे जाऊन राहिले. त्यानंतर पुढे वल्लभाचार्य यांच्याबरोबर गोवर्धनला गेले.
गोवर्धन जवळच्या चंद्र सरोवर जवळ पार्सोली येथे ते राहू लागले. सूरदास आपल्या अंतर्ज्ञानाने सर्व भगवान लीला जाणत असत. तसेच त्यांच्या महात्म्याचे आपल्या तसेच त्यांच्या महात्म्याचे आपल्या काव्यातून ते वर्णन करत असत. गुरु वल्लभाचार्य यांच्यामुळे त्यांचा कृष्ण भक्ती रस वाढला होता.
एकदा असेच सूरदास आपल्याच नादात रमत गमत कुठेतरी चालले होते. रस्त्यामध्ये एक कोरडी विहीर होती त्यांना ती दिसलीच नाही. हलगर्जीपणामुळे ते त्या विहिरीत पडले. विहिरीत पडलेले सूरदास सात दिवस विहिरीत होते त्यांना कोणीही पाहिले नाही. विहिरी मध्ये ते भगवंताची प्रार्थना करत होते.
सात दिवसानंतर श्रीकृष्ण लिलेने ते विहिरीच्या बाहेर आले. ते आंधळे असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांना विहिरीतून बाहेर काढले परंतु तरीही ते कृष्णाचे दर्शन घेऊ शकले नाहीत म्हणून फार दुःखी झाले.
असेच एक दिवस ते बसल्या जागेवर काहीतरी विचार करत होते. त्यावेळी त्यांना राधा आणि श्रीकृष्ण यांची काही बातचीत ऐकू आली. भगवान श्रीकृष्णाने राधा राणी यांना सांगितले की पुढे जाऊ नको नाहीतर सूरदास आपले पाय पकडेल. परंतु राधा देवीने भगवान श्रीकृष्णांचे ऐकले नाही ती सूरदास जवळ गेली. आणि सूरदास यांना म्हणाली माझे चरण तुम्हाला दिसत आहेत का.
सूरदास नाही म्हणताच राधा राणी ने त्यांचे हात स्वतःच्या चरणावर ठेवले व सूरदास यांची चरणस्पर्शाची इच्छा पूर्ण केली. परंतु सूरदास यांच्या हाताने राधा राणीचे पैंजण निसटले व सूरदास यांच्या हातात आले. राधा देवीने तिचे पैंजण सुरदास यांना मागितले परंतु सूरदास म्हणाले मला काय माहित तुमचेच आहेत हे. जर कोणी दुसरे आले आणि मला पैंजण मागु लागले तर मी काय सांगू. परंतु मी जर तुम्हाला पाहू शकलो तर मी तुमचे पैंजण देऊन टाकेल. राधा देवी आणि कृष्ण हसू लागले. आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण आणि राधादेवीने सूरदास यांना दृष्टी प्रदान केली व त्यांना आपले दिव्य दर्शन घडवून दिले.
त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण आणि राधा देवीचे दृश्य त्यांच्या डोळ्यात कायमचे साठवून राहिले. सूरदास यांची कठोर एकनिष्ठ भक्ती देवापर्यंत पोहोचली होती. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि राधा देवी त्यांना म्हणतात. सूरदास तुझी आम्ही इच्छा पूर्ण करू तुला आमच्याकडे काय मागायचे आहे ते माग. सूरदास म्हणाले मी जे मागेल ते तुम्ही मला देणार नाहीत देवा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तुझ्यासाठी माझ्याकडे काहीही अदेय गोष्ट नाही. सूरदास देवाला वचन मागतात खरच देणार का देवा.
देव म्हणतात होय खरंच देणार. सूरदास म्हणतात ज्या डोळ्यांनी मी तुम्हाला पाहिले आहे त्या डोळ्यांनी मी हा संसार पाहू इच्छित नाही. देवा माझी दृष्टी पुन्हा नष्ट करा. फार मोठ्या काळानंतर दृष्टी येऊन सुद्धा परत दृष्टी नष्ट व्हावी अशी इच्छा मनी बाळगणारा सूरदास यांच्यासारखा अलौकिक व्यक्तीत्व असणारा धनी कोणी नसेल. सूरदास यांच्या मनात भगवान श्रीकृष्ण शिवाय दुसऱ्या कोणालाही आणि कुठल्याही सौंदर्याला जागा नव्हती. त्यांचे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आणि राधा देवीचे मन गहिवरले.
परंतु सूरदासला भगवंत पूर्णपणे जाणत होते. म्हणून लगेच काही क्षणात सूरदास यांचे डोळे पुन्हा दृष्टीहीन झाले. श्रीमद् भागवत मध्ये भगवान श्रीकृष्ण दूर्वास यांना सांगतात की, ज्याने स्वतःला माझ्याकडे सोपवले आहे तो मला सोडून ना ब्रह्मपद, ना देवराज इंद्रपद, ना सम्राट बनण्याची इच्छा, ना स्वर्गातील देव तसेच त्याची कुठलीही मोठे भोग भोगण्याची इच्छा नाही.
मोठमोठ्या सिद्धी आणि मोक्षाची सुद्धा त्याला इच्छा नाही. सूरदास फक्त दररोज गोवर्धन मध्ये श्रीनाथ यांचे दर्शन करून त्यांना रोज नवीन नवीन पदे ऐकवत असत. पुढे एकदा त्यांचा अंतिम समय जवळ आल्याची चाहूल त्यांना लागताच त्यांनी फक्त श्रीनाथ यांच्या मंगला आरतीचे दर्शन घेतले. आणि श्री कृष्णाच्या मंदिराच्या ध्वजाला प्रणाम करून चौथऱ्यावर बसून गोस्वामी ( Goswami ) आणि श्रीनाथ यांचे ध्यान करू लागले. त्यावेळी श्री कृष्ण मंदिरात कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात सुरदास नाही हे पाहून गोस्वामी बिठुलनाथजीने इतर आठ छात्र कवींना सांगितले आज पुष्टी मार्गाचे जहाज जाणार आहे.
ज्यांना जे पाहिजे असेल ते त्यांच्याकडून घ्या. सर्वांना समजले आणि गोस्वामी सहित सर्वजण सूरदास यांच्या जवळ आले. गोस्वामि यांनी त्यांना आपले चित्त कुठे आहे हे विचारल्यानंतर सूरदास यांनी उत्तर दिले मी राधा राणी यांचे वंदन करत आहे. ज्यांच्यावर नंद नंदन अर्थात श्रीकृष्ण फार प्रेम करतात. असे सांगितले जाते की सूरदास यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात आपले आराध्य भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी राधा राणी यांना प्राप्त करून गोलोक प्राप्त केले. म्हणून त्यांना गोस्वामी असे म्हणतात.
गीतेच्या बाराव्या अध्यायातील आठव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, हे अर्जुन तू आपल्या मनाला माझ्यामध्ये स्थिर कर. तसेच तुझी बुद्धी सुद्धा फक्त माझ्यामध्ये लाव. असे केल्याने तू निश्चित रूपाने माझ्या मध्ये वास करशील. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेऊ नकोस. संत सूरदास यांच्या सुरसागर ( SurSagar ) या ग्रंथाचे नवीन प्रकाशन इस 1950 मध्ये वाराणसीच्या नागरी प्रचारिणी सभेने केले.
तसेच पुढे इस 2015 मध्ये सुरसागर ग्रंथाचे हावर्ड विद्यापीठाने इंग्लिश भाषांतर करून प्रकाशन केले. संत सूरदास यांच्या सुर सागर ग्रंथ व्यतिरिक्त सूरसारावली, साहित्य लहरी, नल दमयंती असे अनेक ग्रंथ आणि काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांचे लिखाण हिंदी आणि ब्रज भाषेत आढळून येते. भगवान श्रीकृष्णांचे उत्कट भक्त असलेले संत सूरदास यांची अतुट कृष्ण भक्ती आणि समाजातील वाईट गोष्टी न पाहण्याची इच्छा मानवाला विशेष बोध देते.