अत्यंत लोकप्रिय, लाखो लोकांचे श्रद्धास्थान, जागृत आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple मुंबई ) मुंबईच्या प्रभादेवी परिसरात क्षत्रिय राजा ययाती याच्या कुळात आगरी समाजातील लक्ष्मण विठू पाटील आणि देऊबाई पाटील यांनी इस 1801 मध्ये दोनशे वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. मुंबईतील बाणगंगा संकुलातील गणेश मूर्ती आणि श्री सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्ती सारख्याच असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे या दोन्हीही मूर्ती एकाच कारागिराने घडवल्याचा पुरावा मिळतो. पुढे विसाव्या शतकामध्ये याच छोट्या मंदिराचे रूपांतर प्रशस्त भव्य मंदिरात करण्यात आले. भगवान श्री गणेशाच्या प्रख्यात मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर आणि येथील गणेश मूर्ती नवसाला पावणारे असल्याचे सांगितले जाते. येथील गणपतीची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे देश विदेशातील तसेच महाराष्ट्र राज्यातून अनेक भक्त या गणपतीच्या दर्शनासाठी जातात. मुंबईतील लोकांचे तर हे ग्रामदैवत म्हणायला काही हरकत नाही.
या मंदिराची एवढी मान्यता आहे की अनेक मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील दिग्गज कलाकार मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. या सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची एक खास कथा आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये तेथील लाकडी दरवाजांवर तसेच मंदिराच्या खांबावर अष्टविनायक गणपतीच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. तसेच गर्भ भागातील आतील बाजूस सोन्याचा मुलामा दिलेला आहे. गर्भगृहामध्ये मध्यभागी संगमरवरी दगडाची सुंदर गणेश मूर्ती असून मंदिराच्या बाजूने घुमट बांधलेला आहे. मंदिराच्या घुमटावर दिलेले कलर दर तासाने बदलतात व संध्याकाळच्या वेळी घुमट रंगीबेरंगी दिसतो.
मंदिर परिसरामध्ये एक हनुमान मंदिर आहे. येथे भक्तांसाठी वेगवेगळ्या गणेशपूजा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मंदिरात दिल्या जाणाऱ्या देनग्या, अनेक प्रकारचे कार्यक्रम व सवलती आणि नियम श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मार्फत नियंत्रित व आयोजित केले जाते. अंदाजे शंभर ते दीडशे लाख रुपयांच्या देणग्या या ट्रस्टला मिळतात. त्यामुळे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ट्रस्ट पैकी एक समजले जाते.

आपण नेहमी पहात आलेलो आहोत की गणपतीच्या मूर्तीची सोंड ही नेहमी डाव्या बाजूला असते. परंतु सिद्धिविनायक मंदिरातील गणपती मूर्तीची सोड उजव्या बाजूला म्हणजे सिद्धपीठ आहे. त्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक मंदिर असे म्हणतात. या मंदिराची मान्यता एवढी आहे की भारताबाहेर सुद्धा मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला ओळखतात. त्यामुळे दररोज येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिरातील गणपती मूर्ती स्थापित केलेली सिद्ध मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या बाहेर प्रसाद आणि पूजेचे साहित्य मिळते. येथे अनेक फुले आणि हारांची दुकाने आहेत. तेथे चप्पल किंवा शूज आपण ठेऊ शकतो. त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर टोकन घेऊन शूज जमा करण्याची व्यवस्था सुद्धा आहे. मंदिरात फोटो काढण्यास परवानगी नाही , तसेच येथे दर्शन घेण्यासाठी कुठल्याही पासची आवश्यकता नसते. सरळ आपण लाईन मध्ये नंबरला लागून दर्शन घेऊ शकतो. दर्शनासाठी मंदिर पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत भक्तांसाठी उघडे असते. दोन ते तीन तास लाईन मध्ये राहिल्यानंतर आपणास सहज दर्शन मिळते. दुपारी आणि शनिवारी येथे भक्तांची गर्दी कमी असते.
येथे दररोज वेगवेगळ्या वेळेला आरती होते. आरतीच्या वेळा असलेली लिंक गुगल वर उपलब्ध आहे. मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या गणेश मूर्ती विकत मिळतात. जर भक्तांना जवळील इतर काही ठिकाणी फिरायचे असेल तर येथे एलिफंटा केव्ह, गेट ऑफ इंडिया तसेच जुहू बीचवर जाऊ शकतात. मुंबईमध्ये फिरण्यासाठी तशी अनेक ठिकाणे आहेत. चांगल्या वातावरणामध्ये ऋतूनुसार जर आपणास येथे यायचे असेल तर सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम असतो. या काळात मुंबईमध्ये थंड वातावरण असते.
मुंबईच्या सिद्धिविनायक दर्शनाला जाण्यासाठी विमान, जहाज, रेल्वे, एसटी बसेस आणि खाजगी वाहनाने सहज जाता येते. एसटी बसेस ने जायचे असल्यास मुंबई सेंट्रल एसटी स्टँडवर उतरावे लागते. पुणे किंवा नाशिक वरून आपणास जायचे असल्यास दादर ASAID बस स्टॅन्डला उतरावे लागते. तेथून मंदिराकडे जाण्यासाठी अनेक ऑटो रिक्षा असतात. ट्रेनच्या माध्यमातून आपणास जायचे असल्यास मुंबई सेंटर रेल्वे स्टेशनला किंवा छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशनला उतरून दोन्ही रेल्वे स्टेशन पासून ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी मिळतात. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये ओला,उबेर प्रवास फॅसिलिटी लगेच मिळते.
जर आपण विमानाने प्रवास करू इच्छित असाल तर सिद्धिविनायक मंदिराकडे येण्यासाठी छत्रपती शिवाजी एअरपोर्ट पर्यंत विमानाने आपण येऊ शकतो. येथे डोमेस्टिक इयर पोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट असे दोन एअरपोर्ट आहेत. आपण आपल्या पद्धतीने कोणत्याही एअरपोर्टवर उतरू शकता. ते सिद्धिविनायक मंदिर पासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर आहे. एअरपोर्टच्या बाहेरून आपणास टॅक्सी,ऑटो रिक्षा, आणि ओला उबेर गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी मिळतात.

सिद्धिविनायक मंदिराला जाण्यासाठी आपण लोकल ट्रेनचा ही वापर करू शकता , त्यासाठी दादर किंवा परेल रेल्वे स्टेशनला उतरून तेथून इतर वाहनाने जाता येते. येथे मुक्कामी राहण्यासाठी जवळच असलेल्या हॉटेलवर राहू शकता तसेच आपणास मुंबईतील इतर काही प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्थळे पाहायची असल्यास जुहू बीचवर असलेल्या हॉटेल्सवर आरामात आपण राहू शकता, तसेच लक्झरी हॉटेल्स मध्ये राहायचे असल्यास 5,000 ते 30,000 पर्यंतचे रूम्स येथे उपलब्ध असतात.
आपल्या बजेटनुसार आपण कोठेही राहू शकता. त्याचप्रमाणे सर्वांना माहीत आहे की मुंबईमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था जवळच सहज होऊ शकते. त्यामुळे अनेक भक्त येथे दर्शनासाठी येण्यासाठी उत्सुक असतात. तसेच मुंबईतील अनेक दर्शनीय आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात.