एकादशी महात्म्य | Ekadashi Mahatmya

हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ समजले जाणारे व्रत म्हणजे “एकादशी व्रत” ( Ekadashi Mahatmya ) होय . त्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेनंतर सुरू झालेल्या पक्षातला म्हणजे त्या पंधरवड्यातील अकरावा दिवस एकादशी येतो. एकादशी व्रताची देवता म्हणजे या जगाचे पालन पोषण करणारे भगवान “श्री हरी श्रीविष्णू” आहेत. या जगातील सर्व सुखं प्राप्त करण्यासाठी एकादशीचे व्रत केले जाते. अनेक लोक हे व्रत करतात परंतु त्यांना या व्रताचे फायदे मिळत नाहीत.

हे सर्व या व्रताचे नियम न पाळल्यामुळे होते. रुखमांगत राजाने एकादशीचे व्रत करून आपले अख्खे नगर वैकुंठाला नेले होते. तर या व्रतामुळे आपल्या एकट्या जीवाला वैकुंठप्राप्ती मिळणार नाही का ? अशा प्रकारचे महान एकादशीचे व्रत कसे करावे? एकादशी नेहमी द्वादशी युक्त असावी. म्हणजे कॅलेंडरवर आपणाला दोन एकादशी दिसतात. पहिल्या एकादशीला स्मार्त एकादशी असे म्हणतात. तर दुसरी एकादशी भागवत एकादशी नावाने लिहिलेली असते. अनेक लोकांना समजत नाही की कोणत्या एकादशीचे व्रत करावे. अनेक लोक चुकून स्मार्त एकादशीचे व्रत करतात. हिंदु धर्मशास्त्रात असे सांगितले आहे की जेव्हा जेव्हा दोन एकादशी सलग

येतील तेव्हा पहिली एकादशी जी दशमीला जोडलेली आहे तिला वृद्ध एकादशी असे म्हणतात. हीच एकादशी स्मार्त नावाने ओळखली जाते. ही एकादशी साधू, संन्यासी, संत,तपस्वी, ऋषीमुनी अशा महान लोकांसाठी असते. आणि त्यानंतर येणारी भागवत एकादशी वैष्णव भक्त अर्थात संसारीक लोकांसाठी असते. अर्थात आपल्यासाठी भागवत एकादशी हीच सर्वश्रेष्ठ होय. एकादशीचे व्रत हे आदल्या दिवसापासून सुरू होते. अर्थात आपले आचरण हे आदल्या दिवसापासूनच शुद्ध असावे. तसेच आपल्या आहारामध्ये सात्विक पदार्थ असावेत. एकादशी व्रत करणाऱ्या भक्ताने दशमीला एक वेळ भूक्त राहावे. म्हणजे दशमीच्या दिवशी एकच वेळ

जेवण करावे व त्यानंतर दशमीची रात्र व्यतीत झाल्यानंतर एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे प्रातःकाळी चार वाजता उठावे व स्नानादी आटपून व्रताचा संकल्प करावा. तसेच या दिवशी अधिकाधिक हरी नामाचा जप, भगवत कथा,प्रवचन,कीर्तन करून भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करावा. एकादशी तिथीला अन्न खाणे वर्ज असते. त्यामुळे अनेकांना प्रश्न असतो की काय खावे. तसेच शास्त्रामध्ये व्रताच्या दिवशी काय खावे असे अनेक निर्देश दिलेले आहेत. त्यापैकी क्रमाने शक्य असेल तर फक्त वायुग्रहण करावा.

म्हणजे “निर्जल” राहणे. वायुसेवनाने शक्य नसेल तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे. नाहीतर फक्त पाणी प्यावे. तेही शक्य नसेल तर जल किंवा दूध प्यावे. म्हणजे “निराहार” राहणे. त्यानीही शक्य नसेल तर फक्त फळे खावीत. अशा पद्धतीने आपण उपवास करू शकतो. मात्र याचा अर्थ असा नाही की सगळ्या पदार्थांचे भरपूर भोजन करावे.एकादशी उपवासाचे व्रत करत असताना कमीत कमी अन्नधान्य आणि कडधान्य वर्ज करावेत. अशा प्रकारे आपण एकादशीचे व्रत करू शकतो. एकादशीच्या दिवशी दिवसा निद्रा आणि मैथुन या गोष्टी टाळाव्यात. तसेच काम,क्रोध,लोभ यांचाही त्याग करावा आणि रात्री जागरण करून हरिनामाचा जप, हरिनाम संकीर्तन करावे.

दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारना वेळ असते म्हणजे एकादशी व्रत सोडण्याची वेळ असते. तेव्हा भगवंताला नैवेद्य दाखवून तो प्रसाद आपण ग्रहण करावा आणि एकादशी व्रत सोडावे. तुकाराम महाराज सांगतात “करविता व्रत्त अर्धे पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती l”एकादशी व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त करायचे असेल तर एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पाने तोडू नयेत. तसेच गो मातेची अधिकाधिक सेवा करावी. या दिवशी गाईला कधीही मारू नये किंवा गाईला वाईट बोलू नये. एकादशीच्या दिवशी “ओम नमो भगवते वासुदेवाय,” “ ओम नमो नारायणा “ यासारख्या भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या मंत्रांचा अधिकाधिक जप करावा.

अगदी चालता बोलता वेळ मिळेल तेव्हा जप करत राहावा. असे केल्याने नक्की इच्छित फळ मिळते तसेच पितृदोष नाहीसा होतो. या सोबतच आपला एखादा गुरु मंत्र किंवा आपणास आवडणारा मंत्र, ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्या देवतेचा मंत्र चालता बोलता म्हणत राहावा. हिंदू धर्मात सांगितले आहे की जे लोक एकादशी व्रत आणि उपवास करताना परंतु त्याच दिवशी कोणाची तरी निंदा करतात, शिव्या देतात, चोरी करतात अशा लोकांना एकादशी व्रताचे फळ न मिळता दोष लागतात. आणि चुकून जर आपणाकडून असे घडले

तर आपण सूर्य देवाचे दर्शन करावे आणि त्यांना माफी मागावी असे केल्याने हा दोष निघून जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करू नये किंवा कोणत्याही जीवाला कष्ट पोहोचु नये किंवा त्रास देऊ नये. या दिवशी झाडू मारणे आणि पोच्या मारणे या सुद्धा गोष्टी हिंदू धर्मात वर्ज सांगितल्या आहेत. जेणेकरून किडा मुंग्यांची हत्या होणार नाही. मात्र कलयुगात हे शक्य नाही, परंतु कमीत कमी झाडू मारताना किंवा साफसफाई करताना नजरेला दिसेल एवढा तरी किडा – मुंगी

मारली जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. एकादशी हे एकमेव व्रत आहे की ज्याचे उद्यापन आपण कधीही करू शकतो. अशी मान्यता आहे की उद्यापण केल्यानंतरही आपल्याला एकादशी व्रताचे फायदे होतात. इतका या व्रताचा महिमा मोठा आहे. cजर चातुर्मास चालू असेल तर एकादशी व्रताचे उद्यापन करू नये. भगवान श्रीहरी श्री विष्णू चातुर्मासातील चार महिन्याच्या काळात शयन करतात. चतुर्मास म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत असतात तो चार महिन्यांचा काळ.

श्रावण, भाद्रपद, आश्विन, आणि कार्तिक हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय. याच्यातुर्मासात भगवंत झोपलेले म्हणजे चिरनिद्रेत असल्याने आपण एकादशीचे उद्यापन करू शकत नाही. एकादशीचे उद्यापन करण्यासाठी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे एकादशीच्या उद्यापणात सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे 24 प्रकारचे नैवेद्य भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आपण अर्पण करावेत. त्यामुळे हे उद्यापन नक्की सफल होते.

तसेच उद्यापणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होम हवन. होम हवन अनेक जण एकादशीच्या दिवशी करतात ही अत्यंत चुकीची बाब आहे. हे होम हवन एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला करायचे असते. एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंना जास्तीत जास्त पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात. जसे की पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगांची वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई इत्यादी. तसेच जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा, आराधना करते त्या व्यक्तीच्या

जीवनात दरिद्रता अर्थात गरिबी कधीच येत नाही. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र कधीही तोडू नयेत. श्रीविष्णुना तुलसी पत्र अर्पण करण्यासाठी आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवावेत व देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुलसी पत्र नक्की ठेवावे. त्याशिवाय भगवान नैवेद्य ग्रहण करत नाहीत.

Leave a Comment