महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, इथे अनेक संतांनी विविघ ग्रंथ आणि अभंग लिहिले आहेत. अध्यात्मामध्ये ते एक उच्च दर्जाचे ज्ञान आहे, परंतु ते वाचायला आजकाल कोणाकडे एवढा वेळ नाही. हीच माहिती आम्ही थोडक्यात ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी.
पंढरीची वारी ही वेबसाईट पूर्णपणे आध्यात्माला वाहून निर्माण केलेला एक प्लॅटफॉर्म आहे की, जेथे आपल्याला वारकरी सांप्रदाय, वारी, दिंडी, पालखी, संत चरित्र, तीर्थ क्षेत्रे, ग्रंथ अशा विविध विषयांवर माहिती वाचायला मिळून आपल्या ज्ञानात भर तर पडेलच पण आध्यात्मिक गोडीही वाढेल. आशा आहे की हे संकेतस्थळ आपल्या अपेक्षा पूर्ण करील आणि आपल्याला आध्यात्मिक वाचनाचा आनंद देईल.