चक्रधर स्वामी | Chakradhar Swami

गुजरात मध्ये कलयुगात स्वामी श्री चक्रधर स्वामींचा ( Chakradhar Swami ) उभयदर्शी अवतार झाला. त्यांचा हा अवतार गुजरात मध्ये एका राजघराण्यात झाला होताcआणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन महात्मपंथी म्हणजे महानुभव पंथाची स्थापना केली. सुमारेआठशे वर्षांपूर्वी गुजरात मध्ये बडोद शहरी मल्लदेव नावाचा राजा राज्य करत होता.या मल्लदेवाच्या पोटी पुत्र संतान नसल्यामुळे त्याने खंबायत येथील शंख राजाचा पुत्र श्रीसिंह यास दत्तक घेतले होते. हा दत्तक पुत्र वयाने लहान असल्यामुळे मल्लदेवाने आपल्या अंतसमयी प्रधान विशाळदेव यांच्याकडे राज्याची सर्व सूत्रे सुपूर्त करून आपला इहलोकी शेवटचा निरोप घेतला होता.

विशाळ देवाने श्रीसिंह मोठा होईपर्यंत व्यवस्थित राज्यकारभार चालवला आणि श्रीसिंह मोठा झाल्यानंतर राज्याची सर्व सूत्रे त्याच्या स्वाधीन केली. पुढे हा श्रीसिंह राजा फार पराक्रमी निघाला. परंतु त्याचा यादवांशी लढाई करत असताना यादव शिंघणाचा सेनापती खोलेश्वर याच्या हातून मृत्यू झाला. या खोलेश्वरची समाधी अंबाजोगाई येथे आहे. विशाळ देवांना पुत्र संतान नव्हते परंतु श्री दत्तात्रय प्रभूंच्या वरप्रसादाने त्यांना मालन देवी पासून शके 1117 मध्ये पुत्र झाला होता.त्याचे नाव त्यांनी हरिपाळदेव असे ठेवले होते.

तेव्हा हरिपाळ देवाचे जातक वर्णन करण्यास अनेक योगी महात्मे आणि कथडीनाथही आले होते. कथडी नाथाने , हा मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी मरेल व त्याच्या मृत शरीरात कोणीतरी योगी पुरुष प्रवेश करून राज्याचा उपभोग घेईल असे भविष्य वर्तवले होते. तेव्हा विशाळदेव म्हणाले की महाराज कोणीतरी हे शरीर घेण्यापेक्षा तुम्हीच हे शरीर घ्या ना! तेव्हा कथडी नाथ तथास्तु म्हणून निघून गेले. पुढे हरिपाळ मोठे होऊन त्यांच्यात ज्ञानवृद्धी झाली व ते थोर झाले. त्यांच्या अंगी नैसर्गिक पुरुषार्थ होता.

पुढे शके 1138 मध्ये भडोचवर शिंघणाने स्वारी केली होती.त्या मोहिमेत हरिपाळ देवाने त्यांना पराभूत करून शेवटी तह करून परस्परात शांती आणली होती. त्यानंतर परत शके 1141 मध्ये सिंघनाने राजपुतांच्या धोलका राज्यावर स्वारी केली असताना त्यामध्ये हरिपाळ देवाने सहभाग घेतला होता. तेव्हा मराठी व राजपूत यांच्यात तह होऊन युद्ध संपले होते. या युद्धानंतर कथडी देवाने वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे हरिपाळ देवाचा वयाच्या पंचविसाव्या वर्षी म्हणजे शके 1142 मध्ये भाद्रपद 2 रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधी समयी त्याच्या अंगावरील वस्त्र हलू लागले व हरीपाळ देवाच्या तोंडावरील वस्त्र बाजूला होऊन हरिपाळ देवाचे मुख दिसू लागले. हरिपाळ देवाच्या निर्जीव शरीरात फलटणच्या श्री चक्रपाणी अवताराने प्रवेश केला होता.

चक्रपाणी हे हरिपाळ अवतार झाले होते. परंतु हरिपाळ देव पूर्वीचे नसल्यामुळे विशाळ देवाचे मन दुःखी झाले होते. जिवंत झालेल्या हरिपाळ देवाला पालखीत बसून मिरवणूक काढण्यात आली व राजवाड्यात आणले.पूर्वीच्या हरीपाळ देवात आणि सध्याच्या हरिपाळ देवात काहीच बदल वाटत नव्हता. थोडक्यात कथडी नाथाने वर्तवलेल्या भविष्यानुसार सर्व काही घडले होते. हरिपाळ देवाच्या प्रवृत्तीचा मुख्य गुण म्हणजे गोपाळाची शपथ वाहने, जुगार खेळणे, पत्नीवर अपार प्रेम करणे इत्यादी चक्रपाणी अवतारात दिसत होते.

त्यानंतर हरिपाळ देवाला त्यांची पत्नी कमलदेवी पासून मुलगा झाला. त्याचे नाव महिपाळ असे ठेवण्यात आले. चक्रपाणी यांना ज्या कार्यासाठी अवतार घेतला होता ते कार्य होत नसल्याने हरिपाळ अवतारात त्यांचे मन रमत नव्हते. पुढे हरिपाळ देवाने रामटेक यात्रेला जाण्याचा हट्ट धरला होता. शत्रूच्या भीतीमुळे विशाळ देव त्यांना परवानगी देत नव्हते परंतु अधिकच्या हट्टापायी त्यांनी हरिपाळला यात्रेस जाण्यास परवानगी दिली होती. हरिपाळ देव म्हणजे चक्रपाणी हे भडोच येथे बारा वर्ष व सहा महिने राहिले.

विशाळ देवाच्या परवानगीने हरिपाळ देव रामटेक ला जाण्यास निघाले. तेव्हा विशाळ देवाने त्यांच्याबरोबर काही लष्कर दिले. तेव्हा हरिपाळ देवाने शके 1154 मध्ये घरदार सोडले. तो विश्वपती विश्वधर्म प्रतिपादन करण्यासाठी घराबाहेर पडला होता. पुढे पुढे जात असताना हरिपाळ देव थोडे थोडे सैन्य माघारी पाठवत होते.महाराष्ट्रातील रिद्धीपुर येथील देऊळवाडा येथे हरिपाळ देवा बरोबर फक्त दोन सेवक राहिले होते. त्यांनाही त्या रात्री तेथेच सोडून साधा पोशाख करून हरिपाळ देव रिद्धीपुर येथे चैत्र शुद्ध 15 शके 1155 रोजी आले. तेव्हा रिद्धपूर येथील रांधवन हाटात म्हणजे खानावळीच्या बाजारपेठेत श्री गोविंद प्रभूंची आणि चक्रपाणि अवतार हरीपाळ देवाची भेट झाली. तेव्हा त्यांच्याकडून हरिपाळ देवाने अनुग्रह घेतला.

यावेळी श्री गोविंद प्रभूंनी हरिपाळ देवाचे “श्री चक्रधर” असे नाव ठेवले. यावेळी हरिपाळ देवाने आपली पूर्वीची वस्त्रे उतरून डोक्याला दोन हाताचे आणि कमरेला चार हाताचे वस्त्र गुंडाळले आणि ते रिद्धीपुर येथून निघाले. या विदेह अवस्थेत स्वामी फिरत फिरत सातपुडा पर्वतावर म्हणजे सालबर्डी च्या डोंगरात गेले. तेथे ते बारा वर्षे राहिले. तेथील त्यांच्या मुक्कामात रसिक रक्षण व मुक्ताबाई या दोन लीळा प्रमुख यांची भेट झाली. त्यानंतर चक्रधर स्वामी काटोलला गेले. तेथे चक्रपाणी अवताराचे शिष्य उधळीनाथ राहत होते. त्यांच्याकडून चक्रधर स्वामींनी अपूर्ण विद्या पूर्ण करून ते वरंगल येथे आले.

तेथे काही दिवस राहून ते रिद्धीपुरला गोविंद प्रभूंच्या भेटीला आले. पुन्हा स्वामी सिंदूजर्नी व लोणार प्रांतात बारा वर्षे राहिले. या काळात शके 1181 मध्ये लोणार येथे कृष्णदेव यादव राजाशी त्यांची भेट झाली. कृष्ण देवा बरोबर त्यांचा धाकटा भाऊ महादेव होता. या महादेवाला त्यांनी प्रथमच दर्शन दिले. त्यानंतर स्वामी विंझीगोंडवाडा, भोगराम, भंडारा, आळजापुर, नांदेड, लिंबगाव, गोपचोंडी, राहेर, वडनेर, वासनी, पातुर, वेळ बन,आलेगाव,अंजनी,इत्यादी गावी फिरून मेहकरला पावसाळ्यापूर्वी ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी आले.

तेथे अष्टमीचा सण साजरा करून सोमवती निमित्त बोनुबायांच्या विनंतीवरून भाद्रपद मासात लोणार येथे आले. तेथे एक महिना राहून परत मेहकर ला गेले. तेथे तीन महिने राहून सिंहस्थ पर्व निमित्त बोणुबाया सहित रावस गावाहून पैठणला आले. पैठणला स्वामींचा एकांक काळ होता. पैठणला स्वामींचा एकांकि काळ 31 वर्षे नऊ महिन्यांचा होता. त्यानंतर काही दिवसातच स्वामी उदास स्थितीत गेले. नदीवर जाऊन स्वतःच्या हाताने पाणी प्यायचे, पायात चप्पल न घालता फिरायचे, डोक्यावरचे केस अडकले तर ते तसेच उभे राहायचे, भिक्षा हातावर घेऊ लागले, खडकावर भोजन ठेवून जेवायचे, स्वामींची ही उदास मूर्ती कोणाबरोबरही बोलत नसे. न बोलल्यामुळे गुमीदेव, त्यांचे गोरे अंग पाहून गोमटादेव, आणि अपुरी वस्त्र पाहून नग्न देव असे लोक म्हणायचे.

उदास झालेले स्वामी जेव्हा भंडारा येथे गेले तेव्हा निळभट्ट भांडारकरांनी त्यांना आग्रह पूर्वक शास्त्र सांगण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून स्वामींनी त्यांना ज्ञान संपादन केले व छदोबाला ही ईश्वरा विषयी बोध दिला. याशिवाय अनेकांना प्रेम, शक्ती, आणि विद्या प्रदान केली. त्यांच्या एकांकिकाळात एवढेच कार्य त्यांच्याकडून झाले. पुढे ते पैठणला आल्यावर त्यांनी नागुबाईला विद्या प्रदान केल्यानंतर हळूहळू त्यांची उदासीनता आणि मौन कमी झाले. त्यानंतर हंस राजा, बाईसा, चांगदेव भट असे चांगले शिष्य त्यांच्या सानिध्यात राहू लागले. एकांकी काळात चक्रधर स्वामींनी भारत भ्रमण केले होते.

त्यांची पैठण ही योग भूमी आता कर्मभूमी झाली होती. आणि त्यांचे मोक्षाचे दरवाजे उघडे झाले होते. जनसामान्यांना वैदिक धर्माचे महत्त्व प्रतिपादन करून शके 1186 मध्ये पैठणला पौष पौर्णिमेच्या दिवशी जटा,दाढी, मिशी यांचे मुंडन करून महाराजांनी संन्यास घेतला. येथूनच त्यांच्या जीवोद्धारण कार्यास प्रारंभ झाला. महाराजांनी महाराष्ट्रात आठ वर्षे चार महिने एक दिवस प्रचारकार्य केले. त्यांच्या पूर्वार्ध व उत्तरार्ध काळात त्यांनी एकूण आठ दिवाळी केल्या. महाराज एकांतातून बाहेर आल्यानंतर त्यांना पुष्कळ शिष्य परिवार मिळाला. त्यांनी महाराष्ट्रातील आठ वर्षाच्या काळात साध्या मराठी भाषेत व्यावहारिक व धार्मिक तत्वे सांगितली.

त्यांचे निरूपण दुसऱ्या धर्माचा द्वेष न करणारे व अहंकार मुक्त असायचे. स्वामींनी आपल्या तत्त्वज्ञानात जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार गोष्टी नित्य व अनादीच्या असल्याचे सांगितले. स्वामींनी घरदार सोडल्यापासून चाळीस वर्षे महाराष्ट्रभर पायी हिंडून ज्ञानदानाचे महान कार्य केले. त्याशिवाय अनेकांना स्थित्यानंद आणि विद्यानंद दिला. तसेच अनेक चमत्कार कार्य करून दाखवले. परंतु ईश्वर भक्ती हाच मोक्षाचा मार्ग असल्याचे ते सांगायचे. पैठण मधील स्वामींचे कार्य काहींना रुचत नसायचे. म्हणून स्वामी बेलापूरला गेले. बेलापूर मध्ये त्यांनी आपल्या पश्चात शिष्यांनी कसे राहावे व नागदेववादी राहण्यासाठी मार्गदर्शन केले.

तसेच नागदेव भट्ट यांना आचार्य पद प्रदान करून त्यांना श्री गोविंद प्रभूंच्या सानिध्यात राहण्याचा सल्ला दिला. तेथून निघून मुक्काम दर मुक्काम करत ते रिद्धपूर जवळील दाभेरी येथे आले. तेथे आपला शिष्य परिवार गोविंद प्रभूंच्या स्वाधीन करून ते सातपुडा पर्वत ओलांडून उत्तरेकडे आले. तिकडे अद्यापही ते विद्यमान असल्याचे सांगितले जाते. चक्रधर स्वामी यादवांच्या काळात एकूण 52 वर्षे दक्षिण भारतात होते.

महानुभाव पंथ हा कृष्ण भक्ती करणारा आहे. कृष्ण हा एकच देव ते मानतात. महानुभाव पंथाचे चार नियम आहेत त्यात शरणागती,प्रसादसेवा, मूर्तीध्यान,नामस्मरण यांचा समावेश होतो.

Leave a Comment